आयर्नयुक्त ओट्स लाडू

Chef Aarti Nijapkar
Chef Aarti Nijapkar @cook_12274382
Mumbai

आयर्नयुक्त ओट्स लाडू हे शरीराला उपयुक्त असे लाडू आहेत ओट्स ड्रायफ्रूट खजूर मिश्रित लाडू आहेत

पुढे वाचा
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

१५ ते २० मिनिटे
२ ते ३
  1. १५० ग्रॅमओट्स
  2. १०० ग्रॅमखजूर
  3. ७ ते ८बदाम
  4. ३ ते ४अक्रोड
  5. ५ ते ६पिस्ता
  6. १/४ लहान चमचावेलची पावडर
  7. मीठ लहान चिमुटभर
  8. डेसिकेटेड कोकोनट कोटींगसाठी

कुकिंग सूचना

१५ ते २० मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम पॅन गरम करून घ्या
    मग मध्यम आचेवर ओट्स चांगले खरपूस भाजून घ्या (लालसर रंग नको)

  2. 2

    मग एका थाळीत काढून ओट्स पसरवून ठेवा तोपर्यंत गार होईल मग त्याच पॅन मध्ये बदाम, पिस्ता, अक्रोड लालसर भाजून घ्यावे व गॅस बंद करून घ्यावे

  3. 3

    दोन्ही गार झाले की मिक्सर चे भांडे घ्या त्यात भाजलेले ओट्स, बादाम, अक्रोड, पिस्ते,बिया काढलेल्या खजूर, किंचित मीठ व वेलची पावडर घालावे व मध्यमसार भरड करून घ्यावे मिश्रण एका भांड्यात किंवा ताटात काढून घ्यावे

  4. 4

    मग त्याचे मध्यम आकाराचे किंवा आवडीनुसार लाडू वळून घ्यावे सर्व लाडू वळून थाळीत ठेवा मग एका ताटात डेसिकेटेड कोकोनट पसरवून घाला त्यात लाडू घोळवून घ्या (पूर्ण लाडूला लागले पाहिजे) अश्याप्रकारे सर्व लाडू तयार करून घ्या

  5. 5

    मस्त आयर्न युक्त ओट्स लाडू तयार आहेत हे लाडू ३ ते ४ दिवस हवाबंद बाटलीत ठेवू शकता

प्रतिक्रिया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan

टिप्पण्या

यांनी लिहिलेले

Chef Aarti Nijapkar
Chef Aarti Nijapkar @cook_12274382
रोजी
Mumbai
Foodieshttps://aartinijapkar.blogspot.comhttps://www.facebook.com/aarticakes.more
पुढे वाचा

Similar Recipes