रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

  1. 10/12सुरमईचे पीस
  2. 1/2वाटी ओला नारळ खोवलेला
  3. पाव वाटी सुके खोबरे किसून
  4. 2कांदे चिरलेला
  5. 1मोठा टोमॅटो बारीक चिरलेला
  6. 1/2वाटी चिरलेली कोथिंबीर
  7. 2 टीस्पूनगरम मसाला
  8. 3 टीस्पूनघाटी मसाला
  9. 1/2लींबू
  10. 1/2 टीस्पूनहळद
  11. 1 इंचआले
  12. 10/12लसूण पाकळ्या

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम सुरमई स्वच्छ धुवून त्यामधे लींबू, मीठ,हळद लावून 15/20 मिनिटे मॅरीनेट करायला ठेवावे

  2. 2

    नंतर कढईत 2/3टीस्पून तेल त्यामधे कांदा,ओल खोबरे,सूक खोबरे भाजून घ्यावे नंतर त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालून टोमॅटो मऊ होई पर्यंत परतून व नंतर त्यामध्ये आल,लसूण,कोथिंबीर घालून परतून घ्यावे

  3. 3

    नंतर गॅस बंद करावा व नंतर ते सर्व थंड झाल्यावर मिक्सरमधे बारीक वाटून घ्यावे

  4. 4

    नंतर गॅसवर कढईत तेल घालून घेणे नंतर त्यामध्ये बारीक वाटून वाटलेला मसाला घालून तो तेलामधे परतून घ्यावा

  5. 5

    नंतर त्यामध्ये गरम मसाला व घाटी मसाला घालून परतून घेणे

  6. 6

    मसाला परतून झाल्यावर त्यामधे 1 ग्लास पाणी घालून त्यामध्ये मीठ घालावे व कालवणाला एक उकळी काढावी

  7. 7

    एक उकळी आली की त्यामधे सुरमईच पीस घालून त्यावर झाकण पाच मिनिटे झाकण ठेवावे

  8. 8

    पाच मिनिटांनी झाकण काढून घ्यावे व आपल सुरमईच कालवण तयार

प्रतिक्रिया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan

टिप्पण्या

यांनी लिहिलेले

Rohini Jagtap Gade
Rohini Jagtap Gade @cook_20092993
रोजी
Thane

Similar Recipes