#भरलेली_मसाला_शेवंडी 🦞🌿🌶️#Stuffed_Spiced_Lobster 🦞❤️

Sneha Chaudhari_Indulkar
Sneha Chaudhari_Indulkar @angelscharm
Virar And Saphale

एडवणगावाजवळच्या कोरे गावामधून छान दर्जेदार आणि चविष्ट अशा मोठ्या आकाराच्या शेवंडी मिळतात. किंमतीला महाग पण चवीला अगदी जबरदस्त अशा ह्या शेवंडी म्हणजेच लाॅबस्टरचा एक वेगळाच चाहतेवर्ग आहे. दिसतातही आकर्षक. ह्यात काही निळसर छटेच्या शेवंडींना तर फार मागणी असते. वजनदार आणि टणक सालाच्या शेवंडी सोलून साफ करणे तसे कठीण काम. 🦞🌶️🌿 पण खवय्ये म्हटले कि हे आव्हानही सहज पेलतात.
शेवंडीचे स्टार्टर आम्ही अनेकदा बनवतो पण ह्यावेळी जोडल्या वेगळ्या पध्दतीने केले आहे. 🦞🧄🍤🌿❤️🌶️
कापताना धारधार सुरा किंवा विळीचा वापर करावा लागतो. शेवंडीच्या तोंडावरचे काटे टोचू नयेत म्हणून डोक्याचा भाग फडक्यात पकडून विळीवर कापून घ्यावेत. डोक्याच्या भागातील माती व घाण स्वच्छ धुवून काढावी. पाठीवर असलेला घाणीचा दोरा काढायचा. रस्सा किंवा अन्य रेसिपी वेळी पेरातून आडवे व बारीक तुकडे करावे. जाड साल टाकून द्यावी.🦞

चला भरलेली मसालेदार, बटर गार्लिक आणि लिंबाचा punch असलेली शेवंडी बनवुया. 😋 #सीफुड #seafood

पुढे वाचा
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

  1. 4साफ केलेल्या आणि पाठीवर उभी खोल चिर दिलेल्या शेवंडी
  2. 3 चमचेआले-लसूण-हिरवी मिरची व कोथिंबीरची पेस्ट
  3. पाव चमचा काळे मिरे पावडर
  4. एका लिंबाचा रस
  5. अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर
  6. पाव चमचा सेलम हळद पावडर
  7. बारीक चिरलेली कोथिंबीर
  8. अर्धा चमचा गरम मसाला
  9. चवीपुरते मीठ
  10. अर्धा चमचा धणा-जीरा पावडर
  11. 1 चमचाबारीक कापलेला लसूण
  12. सजवण्यासाठी/ गार्निशिंगसाठी कांदा, लिंबू, टाॅमेटो, काकडीच्या चकत्या
  13. तळण्यासाठी तेल
  14. अमुल बटर

कुकिंग सूचना

  1. 1

    शेवंडी आपल्याला अख्खी तळायची असल्याने आपण पाठीवरती खोल उभ्या चिरा पाडून पाच शेवंडी घेतल्या. आणि सालही तशीच ठेवली. एकदा स्वच्छ धुवून पाणी पुर्ण निथळले. त्यातील तीन शेवंडी डोके अलगद वेगळे करून तशाच ठेवल्या. कारण आपल्याला या भरायच्या आहेत. आणि दोन शेवंडीचे तुकडे केले. सगळ्यांमधला मांसल गोळा अगदी सहज मोकळा होतो, तो काढून बारीक तुकडे म्हणजे खीमा केला.

  2. 2

    शेवंडीच्या खीम्याला एका भांड्यामधे घेऊन त्यात मीठ, आले-लसूण-हिरवी मिरची व कोथिंबीर यांची मिक्सरमधून वाटून बारीक केलेली पेस्ट, लिंबूचा रस, गरम मसाला, सेलम हळद पावडर, बेडगी मिरची पावडर व पाव चमचा काळे मिरे पावडर एकत्रित करून व्यवस्थित लावून कालवून ठेवले. थोडा वेळ छान मॅरिनेट करून मुरवत ठेवले. गावठी लिंबूचा रस अगदीच मस्त होता.

  3. 3

    एका पॅनला गरम करून त्यात तेल व अमुल बटर टाकले. त्यावर बारीक केलेल्या लसूणाचे तुकडे, काळे मिरे पावडर ची चिमुट टाकून अगदी छान परता. त्यात हा मॅरिनेट केलेला खीमा टाकून अगदी चांगले मिसळा. गॅस मोठा ठेऊनच हे जलदरित्या करा. हवे असल्यास अजून थोडे बटर टाका. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून परता. गॅस मध्यम आचेवर ठेवून पंधरा ते वीस मिनिटे हे शिजू द्या. शेवंडीचे रिकामे कवच व डोके ह्यामधे हे मिश्रण अलगद भरा. हाताने शेवंडी दाबून घ्या. परत गॅसवर पॅनमधे तेल व बटर तापवून ह्या भरलेल्या शेवंडी खरपुस तळून घ्या.

  4. 4

    प्लेटमधे मधोमध भरलेली शेवंडी ठेवा. शेवंडीचा डोक्याचा भाग मांसल आणि मुख्यतः भरलेला भाग नीट लावून घ्या. लिंबाचा रस आणि कोथिंबीर भुरभुरवा. कांदा, काकडी, टाॅमेटोच्या गोलाकार कापांनी छानपैकी सजवा. हे भरलेल्या शेवंडीचे स्टार्टर अगदी भारीच भाव खाऊन जाते. 🦞🌿😋🧄🍤 प्रत्येक बाईटला त्या शेवंडीचा तो गार्लिक बटर फ्लेवर भलताच जबरदस्त लागतो.

  5. 5

    (Please Note: शेवंडी कशी साफ करावी:
    बहुतेक ठिकाणी कोळिणींकडे छान दर्जेदार आणि चविष्ट अशा मोठ्या आकाराच्या शेवंडी मिळतात. वजनदार आणि टणक सालाच्या शेवंडी सोलून साफ करणे तसे कठीण काम. कापताना धारधार सुरा किंवा विळीचा वापर करा. शेवंडीच्या तोंडावरचे काटे टोचू नयेत म्हणून तोंड फडक्यात पकडून विळीवर कापून घ्यावेत. डोक्याच्या भागातील माती व घाण स्वच्छ धुवून काढावी. पाठीवर असलेला घाणीचा दोरा काढायचा. रस्सा, पुलाव किंवा अन्य रेसिपी वेळी पेरातून आडवे व बारीक तुकडे करावे. जाड साल टाकून द्यावी.)

प्रतिक्रिया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan

टिप्पण्या

यांनी लिहिलेले

Sneha Chaudhari_Indulkar
रोजी
Virar And Saphale
I love cooking, experimenting in kitchen, understanding various cultures, traditions and lifestyles through their cuisines. 🥣🍲🥗🥘I am owner of spice store called The Masala Bazaar. We are manufacturing spice blends, powders, pickles, papads and variety of cooking related products since 1984. 🌶️🍋🍘🍱I enjoy writing about food with memories around it. I keep collecting knowledge around recipes from various regions. 😃- Food Memories Marinated with Love ♥️🌿🙏 by, स्नेहा चौधरी- इंदूलकरOur spice product related information is listed over here. 💁♥️🌿https://www.facebook.com/themasalabazaarstore/And here is our Official Website:www.themasalabazaar.comYou can connect on what's up for any recipe related query: 9890043675
पुढे वाचा

Similar Recipes