शेवग्याच्या शेंगांचे सार

Darpana Bhatte
Darpana Bhatte @cook_19543746
Virar

वरण, आमटीत तर रोज शेंगा घालतो, जरा वेगळ्या पद्धतीचे हे सार नक्की करून बघा.
#lockdown, #stayathome,
#workfromhome, #let'scook

शेवग्याच्या शेंगांचे सार

वरण, आमटीत तर रोज शेंगा घालतो, जरा वेगळ्या पद्धतीचे हे सार नक्की करून बघा.
#lockdown, #stayathome,
#workfromhome, #let'scook

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

४जणांसाठी
  1. ३-४ - शेवग्याच्या शेंगा
  2. २-३ - हिरव्या मिरच्या
  3. १०-१२ - कोथिंबिरीच्या काड्या
  4. १०-१२ - कडीपत्त्याची पाने
  5. पाव कप खवलेला ओला नारळ
  6. मध्यम आकाराच्या लिंबाएवढा चिंचेचा गोळा
  7. २ टेबलस्पून - तेल
  8. १ टीस्पून - जिरे
  9. १ टीस्पून - राई
  10. पाव टीस्पून - हिंग
  11. अर्धा टीस्पून - हळद
  12. १ टेबलस्पून - गूळ
  13. १-१ टीस्पून - जिऱ्या-मिऱ्याची पूड
  14. चवीनुसार मीठ

कुकिंग सूचना

  1. 1

    शेंगांचे २-३"चे तुकडे करून सोलून घ्यावेत. ओला नारळ, जिरे, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर एकत्र बारीक वाटून घ्यावे. चिंच भिजत घालून त्याचा कोळ काढावा.

  2. 2

    तेल तापवून त्यात हिंग, राई, कडीपत्त्याची फोडणी करावी. त्यात शेंगा, हळद व थोडे मीठ घालून शेंगा शिजवून घ्याव्यात. शेंगा शिजल्यावर त्यात वाटण, गूळ, चिंचेचा कोळ घालून, मीठ घालावे. शेंगा शिजताना मीठ घातले असल्याने आता बेतानेच मीठ घालावे..

  3. 3

    एकदा चांगली उकळी आली, की तयार झाले शेंगांचे सार. गरमच भाताबरोबर वाढावे. शेंगात 'अ' जीवनसत्त्व, कॅल्शियम, प्रथिनं, तंतुमय पदार्थ असल्यामुळे, लोह, रक्ताची कमतरता, तसेच इतर रक्तदोषावरील आजारात हे सार अत्यंत गुणकारी आहे. यातील हिरवी मिरची वगळून हे सार बाळंतिणीस दिल्यास तिला स्तनपान व रक्तवाढीस मदत होते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Darpana Bhatte
Darpana Bhatte @cook_19543746
रोजी
Virar

टिप्पण्या

Similar Recipes