टोमॅटोचे सार (tomatoche saar recipe in marathi)

Poonam Pandav
Poonam Pandav @poonam_1984
डोंबिवली

#shr
#श्रावण स्पेशल रेसिपी
श्रावण महिन्यात रोज रोज वरण भात खाऊन कंटाळा येतोच. मग कधीतरी चटकदार आणि चटपटीत खावंसं असं सगळ्यांनाच वाटतं.
म्हणूनच चटपटीत आणि चटकदार तसेच जिभेची चव वाढवणारा टोमॅटोच सार बनवुन नक्की बघा.
रेसिपी खाली देत आहे.

टोमॅटोचे सार (tomatoche saar recipe in marathi)

#shr
#श्रावण स्पेशल रेसिपी
श्रावण महिन्यात रोज रोज वरण भात खाऊन कंटाळा येतोच. मग कधीतरी चटकदार आणि चटपटीत खावंसं असं सगळ्यांनाच वाटतं.
म्हणूनच चटपटीत आणि चटकदार तसेच जिभेची चव वाढवणारा टोमॅटोच सार बनवुन नक्की बघा.
रेसिपी खाली देत आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25 मिनटं
2लोक
  1. 4मध्यम आकाराचे टोमॅटो
  2. 1 कपकिसलेला ओला नारळ
  3. 2हिरव्या मिरच्या
  4. 3-4 कडीपत्याची पानं
  5. 3- 4 लसणाच्या पाकळ्या
  6. 1/2 इंचआल्याचा तुकडा
  7. 1 टेबलस्पूनबीट चे तुकडे
  8. 1/2 टीस्पूनलाल तिखट
  9. 1/2 टीस्पूनगरम मसाला
  10. 1/4 टीस्पूनहळद
  11. 1/4 टीस्पूनधने पूड
  12. 1/4 टीस्पूनमोहरी
  13. 1/4 टीस्पूनजिरं
  14. 3-4 चिमूटभर हिंग
  15. 4-5 टेबलस्पून तेल
  16. मीठ चवीनुसार
  17. कोथिंबीर
  18. पाणी

कुकिंग सूचना

25 मिनटं
  1. 1

    सर्वप्रथम टोमॅटो स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावेत. टोमॅटो चा वरच्या बाजूचा भाग थोडासा कापून घ्यावा व टोमॅटोला तीन ते चार सुरीने उभ्या चिरा पाडून घ्याव्यात.

  2. 2

    गॅस वर एका टोपा मध्ये पाणी गरम करून टोमॅटो चार-पाच मिनिटे उकळून घ्यावेत.

  3. 3

    टोमॅटो मऊ झाले की टोमॅटो पाण्यातून काढून घ्यावे. टोमॅटो थंड करून टोमॅटोची साल काढून घ्यावी. टोमॅटो बारीक चिरून घ्यावेत.

  4. 4

    मिक्सरच्या भांड्यामध्ये किसलेला नारळ, हिरव्या मिरच्या,आलं लसूण, बीट वाटून घ्यावे.(टोमॅटोच्या साराला लालभडक कलर येण्यासाठी येथे मी बीट वापरला आहे).

  5. 5

    मिक्सर मधून वाटण काढून घ्यावे आणि त्यात भांड्यामध्ये टोमॅटोची सुद्धा पेस्ट करून घ्यावी.

  6. 6

    कढई मध्ये तेल गरम करून जीरे, मोहरी हिंग,कढीपत्ता फोडणी द्यावी. केलेले वाटण घालावे. सर्व मसाले घालावे आणि सर्व मसाले वाटणा मध्ये छान परतून घ्यावे.

  7. 7

    नंतर त्यामध्ये टोमॅटोची पेस्ट घालावी.छान परतून घ्यावे. पाणी घालावे. मीठ व कोथिंबीर घालून झाकण लावून साराला मंद आचेवर 3ते 4 मिनटं उकळी काढून घ्यावी. आवडत असल्यास थोडी साखर घालावी. गरम-गरम टोमॅटो सार वाफाळलेल्या भातासोबत सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Poonam Pandav
Poonam Pandav @poonam_1984
रोजी
डोंबिवली
I am a food lover🍱🥘🍲🥗🍜,Youtuber🎥👩‍💻 and Home shef 👩‍🍳.I like to cook for those who have respect and love for food 😊🙏.
पुढे वाचा

Similar Recipes