शेवग्याच्या शेंगांचं सूप - स्वादिष्ट आणि पौष्टीक (shevgachya shengache soup recipe in marathi)

#सूप
शेवग्याच्या शेंगा सगळ्यांना आवडतात. खूप स्वादिष्ट आणि पौष्टीक असतात. आपण नेहमी शेंगा आमटीत, कढीत घालतो, भाजी करतो. पण शेंगांचं सूप करून पाहिलंत का ? खूपच चविष्ट लागतं. बनवायला फार कठीण नाही हे सूप. बघूया शेवग्याच्या शेंगांच्या सूपची रेसिपी.
शेवग्याच्या शेंगांचं सूप - स्वादिष्ट आणि पौष्टीक (shevgachya shengache soup recipe in marathi)
#सूप
शेवग्याच्या शेंगा सगळ्यांना आवडतात. खूप स्वादिष्ट आणि पौष्टीक असतात. आपण नेहमी शेंगा आमटीत, कढीत घालतो, भाजी करतो. पण शेंगांचं सूप करून पाहिलंत का ? खूपच चविष्ट लागतं. बनवायला फार कठीण नाही हे सूप. बघूया शेवग्याच्या शेंगांच्या सूपची रेसिपी.
कुकिंग सूचना
- 1
शेवग्याच्या शेंगा धुवून घ्या. २ इंच लांबीचे तुकडे करून घ्या. थोड्या पाण्यात मीठ घालून शेंगा नरम होईपर्यंत शिजवून घ्या.
- 2
शिजल्यावर शेंगा पाण्यातून काढून गार करायला ठेवा. पाणी टाकून देऊ नका. आपण ते नंतर वापरायचेय.
- 3
मूग डाळ धुवून घ्या. चिमूटभर हळद आणि शिजायला लागेल तेवढं पाणी घालून डाळ शिजवून घ्या. प्रेशर कुकर मध्ये शिजवा किंवा गॅस वर पातेलं ठेवून मऊ होईपर्यंत शिजवा.
- 4
टोमॅटो ३-४ मिनिटं उकळत्या पाण्यात शिजवून लगेच गार पाण्यात टाका. गार झाल्यावर टोमॅटो सोलून घ्या.
- 5
मिक्सर च्या भांड्यात टोमॅटो, कोथिंबीर घालून बारीक वाटून घ्या.
- 6
शिजवलेली मुगाची डाळ वेगळी वाटून घ्या.
- 7
शिजवलेल्या शेंगा उघडून चमच्याने त्याचा गर काढून घ्या.बिया असतील तर त्या पण घ्या. गर आणि बिया मिक्सरमध्ये फिरवून घ्या.
- 8
एका पातेल्यात वाटलेली मूग डाळ, टोमॅटोची पेस्ट, शेंगांचा गर आणि शेंगा शिजवलेलं पाणी घाला. मीठ घाला. आणखी साधं पाणी घालून मिश्रण हवं तेवढं पातळ करा.
- 9
मिश्रण मध्यम आचेवर ५ मिनिटं उकळा.
- 10
पळीत साजूक तूप / बटर गरम करून जिऱ्याची फोडणी करा आणि ती फोडणी मिश्रणात घाला.
- 11
ताजी मिरपूड घाला आणि मिक्स करा.
- 12
शेंगांचं चविष्ट सूप तयार आहे. गरमागरम सूपाचा आनंद घ्या.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
शेवग्याच्या शेंगांचे सूप (shevgyachya shengache soup recipe in marathi)
#कुकस्नॅप#cooksnapसुमेधा जोशी मॅडम ची अत्यंत पौष्टीक अशी शेवग्याच्या शेंगांचे सूप ही रेसिपी मी कुक स्नॅप केली आहे.मस्त झाले सूप. Preeti V. Salvi -
ड्रमस्टिक सूप (drumstick soup recipe in marathi)
#hs#साप्ताहिक सूप प्लॅनरशेवग्याच्या शेंगात,पानात, फुलात मुबलक प्रमाणात प्रोटीन,कॅल्शिअम, फायबर, व्हिटामिन्स असतात. म्हणुनच तर या झाडाला मॅजिकल ट्रि असे नाव दिले आहे. आज आपण पाहूया शेवग्याच्या शेंगांच्या सूपची रेसिपी. Shital Muranjan -
शेवग्याच्या शेंगांची भाजी (shevgyachya shengachi bhaji recipe in marathi)
#GA4#week#keyword_drumsticksशेवग्याच्या शेंगा, त्याची पानं सुद्धा खूप पौष्टिक असतात. शेंगाच सूप पण करतात.आज आपण शेंगांची भाजी करूया. Shilpa Ravindra Kulkarni -
ड्रमस्टिक सूप (drumstick soup recipe in marathi)
#hsबऱ्याचदा आपण त्या शेंगा डाळीमध्ये किंवा भाजीमध्ये घालतो. मात्र, या शेंग्याचे सूप देखील तितकेच पौष्टिक लागते. चला तर पाहुया हे सूप कसे बनवायचे...😊 Deepti Padiyar -
शेवग्याच्या शेंगांची भाजी (shevga sheng bhaji recipe in marathi)
आयरन रिच शेवग्याच्या शेंगा खूप हेल्थती असतात। त्याची भाजी पण खूप छान लागते। नक्की करून बघावी। Shilpak Bele -
शेवग्याच्या शेंगांचे डोसे
शेवग्याच्या शेंगा आपण वरणातील, आमटीतील किंवा सुकी भाजी करून खातो. सूप ही बनवतो.आज मी वेगळा पदार्थ तयार करून बघितला. तो खूपच छान झाला. तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
शेवग्याच्या शेंगांचे पौष्टिक सूप (shevgyachya shengache soup recipe in marathi)
शेवग्याच्या शेंगांमध्ये उच्च प्रतीची मिनरल्स, प्रोटीन्स आढळतात. यामुळे त्याचा आहारात समावेश करणे हे नक्कीच आरोग्यदायी ठरते.#hs Mrs. Snehal Rohidas Rawool -
ड्रमस्टिक सूप (drumstick soup recipe in marathi)
#hs #रविवार #की वर्ड--शेवगा शेंगा शेवगा शेंगा याला शाकाहारी लोकांचा मांसाहार म्हणतात..कारण nonveg मधून जेवढी ताकद शरीराला मिळते तेवढीच या शेवग्याच्या शेंगा मधून शरीराला मिळते. शेवग्याच्या शेंगांची आमटी कढी भाजी करतात त्याचबरोबर शेवग्याच्या शेंगांचे अतिशय पौष्टिक आणि चवदार असे सूपही केले जाते त्यामुळे हे सूप सर्वांनाच शरीरासाठी अतिशय उपयोगाचे आहे. मुळात सूप हे आजारी, अशक्त ,वृद्ध ,लहान मुले यांच्यासाठी उपयुक्त असा खाद्यप्रकार आहे .या मधून शरीराला ताबडतोब एनर्जी तर मिळतेच आणि पचायला हलके असते त्यामुळे पोटाला त्रासही होत नाही. सूप या खाद्यप्रकारामुळे भूक तर लागतेच त्याचबरोबर पोटही भरून पोटाला थंडावा शांतता मिळते. Bhagyashree Lele -
शेवग्याच्या शेंगांचे रायते (shevgyachya shengache raita recipe in marathi)
#GA4 #week25# शेवगाशेवगा हि एक बहुगुणी भाजी आहे हे सर्वांनाच माहीत आहे. या शेंगा अनेक भाज्यांबरोबर जोडभाजी म्हणुन वापरल्या जातात. शेवग्याच्या पानांची सुद्धा भाजी केली जाते आजकालच्या डाएट संस्कृती मध्ये तिचे महत्व खूपच वाढले आहे. खरे तर आपली जुनी पिढी हे महत्व जाणत होती त्यामुळे पूर्वी मोठया घरांच्या आवारात एक तरी शेवग्याचे झाड असायचेच. आमच्या घरी या शेंगा वाला बरोबर भाजीत, वांगे बटाटा भाजीत, मटकी बरोबर उसळी मध्ये, तुरीच्या डाळीचे फोडणीचे वरण यात हमखास वापरल्या जातात. पण आज मी जी रेसिपी दिली आहे ती माझ्या माहेरची आहे, माझी aआई बरेच वेळा करायची. आपल्या जेवणात डाव्या बाजूचे फार महत्व आहे, हे रायते अशीच एक सोपी पण चवीची तोंडी लावायला केली जाणारी रेसिपी आहे.. चला तर बघुया!!Pradnya Purandare
-
ड्रमस्टीक सुप (शेवग्याच्या शेंगा चे सुप) (drumstick soup recipe in marathi)
#sp#सुप प्लॅनर#रविवार#शेवग्याच्या शेंगा किंवा पाने किती कॅल्शियम युक्त असतात .त्यामुळे हाडांना बळकटी येऊन मजबूत होतात. म्हणून कुठल्याही स्वरुपात तुम्ही मुलांना शेंगा नाहीतर पाला खायला घालाच. Hema Wane -
ड्रमस्टिक सूप (drumstick soup recipe in marathi)
#hs# रविवार - ड्रमस्टिक सूप# मराठी मध्ये शेवगाच्या शेंगा , सहजन हिंदी मध्ये, इंग्लिश मध्ये ड्रम स्टिक.... गुजराती मध्ये सरओगेली सिंग..अशा विविध नावांनी ओळखली जाणारी शेवगा ची शेंग खूपच उपयुक्त जिचे फायदे अनेक आहेत...300 रोगांवर उपयुक्त अशी शेंगांची शेंग तिच्या पानांचा पावडर पण तेवढाच उपयुक्त कॅल्शियम ने भरलेली... बीपी, डायबिटीस ,हिमोग्लोबिन ,कॅल्शियम, हाडांच्या मजबुतीसाठी, त्वचारोग बरे करण्यासाठी अशा बरेच रोगांवर उपयुक्त अशीच शेवग्याची शेंग..गर्भवती महिलांसाठी खूपच उपयुक्त... बेबीच्या बुद्धीचा विकास करण्यासाठी तसेच गुडघ्यांच्या दुःखा यासाठी , रक्ताला शुद्ध बनवण्यासाठी, डोळ्यांचा तेज वाढवण्यासाठी, केसांची ग्रुप चांगली करण्यासाठी, पांढरी केस न होण्यासाठी, कर्करोग नष्ट करणारी ,शरीरातील उष्णता कमी करणारी, पोटातील कृमी न होऊ देणे आणि झाले असतील तर त्यांना नष्ट करण्यासाठी या सर्व करणावर उपयुक्त अशी शेवग्याची शेंग... शेवगांच्या शेंगांचे सूप पिल्याने प्रतिकारशक्ती पण वाढते... आणि आता या covid-19 च्या काळामध्ये आपल्याला इम्मुनिटी बूस्टर म्हणून शेवगांच्या शेंगांचे सूप पिणे खूप फायदेमंद आहे.... चला तर मग आपण आता शेवग्याच्या शेंगांचे सुप बघूया.... Gital Haria -
ड्रमस्टिक सूप (drumstick soup recipe in marathi)
#supesnap मी ही रेसिपी शीतल मुरंजन यांचीकेली आहे. ' ड्रमस्टिक सूप ' ( शेवग्याच्या शेंगांचे सूप ) ही रेसिपी मी थोडी मॉडिफाय केली आहे.मला व माझ्या घरातील सर्वांना आवडली. Manisha Satish Dubal -
ड्रमस्टिक सूप (drumstick soup recipe in marathi)
#hs #सूप प्लॅनर मध्ये रविवारची रेसिपी आहे ड्रमस्टिक सूप हे सूप थंडीतून घ्यायला मस्त असते. शेंगा मध्ये उच्च प्रतीचे मिनरल्स प्रोटिन्सआणि व्हिटॅमिन्स C आढळतात. ज्यांना हाय ब्लड प्रेशर, चक्कर येणे, उलटी होणे, डोळ्यांचा त्रास आहे त्यांना फार उपयुक्त आहे. तसेच हाडे व दात मजबूत होण्यास मदत होते. Shama Mangale -
शिंपल्या् व शेवग्याच्या शेंगांचे सुप (shimple shevgyachya shenga recipe in marathi)
#सूप तिसऱया म्हणजेच शिंपल्या अनेकांना आवडतात , त्यामध्ये आणखी पौष्टिकते साठी शेवगाच्या शेंगा घालून सूप बनवला.शेवगाच्या शेंगा एरवी भाजी किंवा डाळीमध्ये वापरतात. असा आणखी एक पदार्थ बनवला तर सर्वाना आवडेल Kirti Killedar -
शेवग्याच्या शेंगांची डाळ (Shevgyachya Shenganchi Dal Recipe In Marathi)
#RDRजेवण म्हटलं की डाळ ही हवीच. पण आपण गृहिणी फक्त डाळीचे किती वेगवेगळे प्रकार करत असतो! आणि आता सध्या शेवग्याच्या शेंगा मस्त मिळू लागल्या आहेत. शेंगा पण विविध प्रकाराने आपण खाऊ शकतो. डाळीतल्यातल्या शेंगा तेवढ्याच छान लागतात, आणि डाळीला एक प्रकारची विशिष्ट चव लागते. पाहूया शेवग्याच्या शेंगांची डाळ. Anushri Pai -
ड्रमस्टिक सूप (Drumsticks Soup recipe in marathi)
#hsरविवार ड्रमस्टिक सूप शेवग्याच्या शेंगा मध्ये iron, Vitamins and calcium भरपूर प्रमाणात असतं. शेवग्याच्या शेंगा सेवनाने हाडं मजबूत होतात आणि blood purify करते.शेवग्याच्या शेंगा खाल्यामुळे skin diseases मध्ये फायदा होतो. Rajashri Deodhar -
वीकएंड स्पेशल शेवग्याच्या शेंगांची आमटी (shevgyachya shengachi amti recipe in marathi)
#wdrसध्या शेवग्याच्या शेंगा खूपच छान येतायत .म्हणून आज मी वीकएंड स्पेश ल केली शेवग्याच्या शेंगांची आमटी. Pallavi Musale -
शेवग्याच्या शेंगांची कढी
#फोटोग्राफी#कढीताकाची कढी महाराष्ट्रात खूप लोकप्रिय आहे. कढी भात, कढी खिचडी हे प्रकार सगळीकडे आवडीने खाल्ले जातात. मी शेवग्याच्या शेंगा घालून कढी करते. फक्त शिजवलेल्या शेंगा नाही तर थोड्या शेंगांचा गर काढून कढीत घालते. त्यामुळे कढीला शेंगांचा छान स्वाद येतो. हे माझं स्वतःचं इनोव्हेशन आहे. Sudha Kunkalienkar -
शेवग्याच्या शेंगा बटाटा रस्सा भाजी (sevgyachya shenga batata rassa bhaji recipe in marathi)
#ट्रेडींग रेसिपी शेवग्याच्या शेंगा मध्ये कॅल्शियम चे प्रमाण भरपूर असतं तर तुम्ही शेवग्याच्या शेंगा ची रस्सा भाजी नक्की करून पहा Minal Gole -
शेवग्याच्या शेंगाची भाजी (shevgyachya shengachi bhaji recipe in marathi)
#GA4#week25#Drumstickगोल्डन एप्रिल फोर च्या पझल मध्ये Drumstickहा कीवर्ड बघून रेसिपी बनवली. शेवग्याच्या शेंगा आहारातून घेतल्या तर बरेच आरोग्यदायी फायदे आहेशेवग्याच्या शेंगा मध्ये भरपूर प्रोटीन्स आणि कॅल्शियम, विटामिन आपल्याला मिळतात दुधापेक्षाही शेवग्याच्या शेंगा मध्ये जास्त प्रोटीन आहे . ज्यांना हे माहित आहे ते आवर्जून आपल्या आहारात शेवग्याच्या शेंगा वेगवेगळ्या पद्धतीने घेतात. शेवग्याच्या शेंगाची आमटी ,डाळसांभर, मिक्स व्हेज मध्ये टाकून आहारात समावेश करतातशेवग्याच्या शेंगा आपल्यासाठी एक वरदानच आहे याच्या नुसत्या शेंगा नाहीतर याच्या पानांचा ही आरोग्यावर खूप फायदा होतो याच्या पानांपासून भाजी,सूप, ज्यूस बनून आहारात घेतात हाडे ही मजबूत होतात दातांच्या विकारांसाठी शेवग्याच्या शेंगा चांगल्या आहे .मी जी रेसिपी बनवली आहे ती आम्हाला लहानपणापासूनच आमची आई शेवग्याच्या शेंगाची पातळ भाजी भाकरी बरोबर आम्हाला बनवून द्यायची सांबर बनवायचे त्यात नेहमीच शेवग्याच्या शेंगा टाकल्या जायच्या यानिमित्ताने आहारात शेवग्याच्या शेंगा घेतल्या जायच्या. मला तर नुसता निमित्त हवा सांबर, भाज्या, आमटी बनवण्याची त्यावेळी सर्वात आधी शेवगा ची शेंग घरात येणार. मी बनवलेली भाजीबरोबर भात ,भाकरी छान लागते. तर बघूया शेवग्याच्या शेंगाची भाजी Chetana Bhojak -
शेंगा बटाटा आमटी (Shenga Batata Bhaji Recipe In Marathi)
शेवग्याच्या शेंगा यांची चव जितकी चांगली तेवढीच या शरीराला खूप पौष्टिक असतात. शेवग्याच्या शेंगांच्या झाडाच्या पानांची भाजी, फुलांची भाजी-भजी- थालीपीठ हे सर्वच अतिशय चविष्ट आहे. पण शेंगा बाजारात सध्या मुबलक प्रमाणात आहेत आणि म्हणूनच (रोजच्या जेवणात वेगवेगळ्या कालवणांच्या चवीची गरज असते) आज आपण बघूया शेंगा बटाटा हा झटपट होणारा आणि चविष्ट असा रस्सा. Anushri Pai -
ड्रमस्टिक सूप (drumstick soup recipe in marathi)
#hs शेवग्याच्या झाडाचे पाने, फुले, शेंगा सगळ्याच वस्तूचा आहारात उपयोग केला पाहिजे कारण शेवगा हा पौष्टीक आहे हयात मोठ्या प्रमाणात फायबर असते. मिनरल, प्रोटीन्स, व्हिटामिन सी त्यामुळे थकवा दुर होतो. हाडे मजबुत होतात. लोहाचे प्रमाण असल्यामुळे रक्ताची कमतरता भासत नाही. डोळ्यांचे आरोग्य सुधारते. वजन कमी होते. हृदय रोगापासुन बचाव होतो. शेंगामध्ये पोटॅशियमही असते . अशा बहुमोल शेवग्याच्या शेंगाचे पौष्टीक सुप कसे केले चला सांगते तुम्हाला Chhaya Paradhi -
शेवग्याच आंबट गोड वरण (shevgyacha ambat god varan recipe in marathi)
#GA4 #week25 कीवर्ड---शेवग्याच्या शेंगाया शेंगांची भाजी जितकी टेस्टी लागते तेवढेच वरण देखील लागते.चिंच गुळ घालून केले की बघायचे कामच नाही. Archana bangare -
शेवग्याच्या शेंगांची आमटी (Shevgyachya shengachi amti recipe in marathi)
#mlrशेवग्याच्या शेंगा मध्ये विटामिन , कॅल्शियम मुबलक प्रमाणामध्ये असते. तूरडाळ , मसूर डाळ किंवा मूग डाळीची आमटी करताना शेवग्याच्या शेंगा घातल्यानंतर त्याला मस्त चव येते त्याचा आहारात समावेश केल्यामुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारते हाडे मजबूत होतात तसेच वजन नियंत्रणात राहते. आशा मानोजी -
शेवग्याच्या पानांचे सूप (shevgyachya pananche soup recipe in marathi)
#hs #शेवग्याच्या पानांचे सूप# आज मी शेवग्याचे सूप बनवायचे ठरविले होते . परंतु शेवग्याच्या शेंगा मिळाल्या नाही. मात्र घरी असलेल्या झाडाचे पाने मिळाली. त्यामुळे मग मी शेवग्याच्या पानांचे सूप केले .खरंच छान झाले असे सूप पिणारे म्हणत होते. 😍 Varsha Ingole Bele -
पौष्टीक पालक सूप
सूप अनेक प्रकारे बनवतो आणि कमी वेळात होणारं आणि शरीराला पौष्टिक असणारे सूप सर्वाना आवडतेच...पण काही वेळा लहान मुल पीत नाहीत माझ्या मुलांसाठी मी हे सूप मी आवर्जून बनवते त्यात पालक,टोमॅटो, हिरव्या मुगाची डाळ इत्यादी साहित्य वापरून सूप बनवला आहे पाहुयात Chef Aarti Nijapkar -
शेवग्याच्या शेंगाची मसाला करी (shevgyachya shengachi masala curry recipe in marathi)
#सध्या मार्केट मध्ये शेवग्याच्या शेंगांचा सिजन चालु आहे शेंगा ह्या पौष्टीक व आरोग्यासाठी फायदेशीर आहेत चला तर शेंगाची रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
ड्रम स्टीक सूप (drumstick soup recipe in marathi)
#hsअतिशय पौष्टिक पचनशक्ती सुधारणारे, हाडे मजबूत करणारे,व्हीटामिन्स युक्त असे शेवग्याच्या शेंगांचे सूप Dhanashree Phatak -
-
आंबटवरण शेवग्याच्या शेंगा घालून (ambatvaran shevgyachya shenga ghalun recipe in marathi)
#GA4 #week25 #मी Drumsticks हा शब्द घेऊन रेसिपी केली. आता बाजारात मुबलक शेवग्याच्या शेंगा असतात, अतिशय पोष्टीक,कॅल्शियम युक्त शेंगा जरूर खाव्यात वरणात तर छानच लागतात.तर बघुयात कसे वरण करायचे ते. Hema Wane
More Recipes
टिप्पण्या (6)