झणझणीत विदर्भ स्टाईल डाळ कांदा

Samidha Patade
Samidha Patade @cook_21975887

#डाळ, lockdown मुळे घरात काहीच भाजी नव्हती मग काय करणार म्हणून चण्याच्या डाळी चा वापर करून भाजी केली

झणझणीत विदर्भ स्टाईल डाळ कांदा

#डाळ, lockdown मुळे घरात काहीच भाजी नव्हती मग काय करणार म्हणून चण्याच्या डाळी चा वापर करून भाजी केली

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिटे
  1. 1 वाटीचण्याची भिजवलेली डाळ
  2. 7लसूण पाकळ्या ठेचलेल्या
  3. 2मोठे कांदे बारीक चिरलेले
  4. 1मोठा टोमॅटो बारीक चिरलेला
  5. 1/2 टेबलस्पूनमोहरी, जिर
  6. 1/2 टेबलस्पूनहिंग, हळद
  7. 1तमाल पत्र
  8. 1 चमचागरम मसाला
  9. 1 चमचाधने जिर पावडर
  10. 2 चमचेलाल तिखट
  11. 2 टेबलस्पूनफोडणी करता तेल
  12. चवीप्रमाणे मीठ,
  13. 2 वाट्या पाणी
  14. 3 टेबल स्पूनओल वाटण
  15. ओल वाटण साहित्य:
  16. 1कांदा उभा चिरलेेला
  17. 7लसूण पाकळ्या
  18. अर्धी ओल्या नारळाची वाटी खरवडलेली
  19. 1 वाटीसुखा नारळ वाटी किसलेली
  20. 1/2 इंचआलं
  21. 1 छोटा चमचातेल

कुकिंग सूचना

15 मिनिटे
  1. 1

    प्रथम चण्याची डाळ 3 तास भिजवून घ्या नंतर त्यातलं पाणी काढून टाका.

  2. 2

    कढई छोटा चमचा तेल गरम करून त्या, लसूण, ओल सुख खोबर, आलं घालून खरपूस भाजून घ्या थंड झालं की 2 चमचे पाणी घालून वाटून घ्या.

  3. 3

    आता कढईत 2 चमचे तेल घाला गरम झालं की मोहरी जिर घाला तडतडली की 1 तमाल पत्र घाला.

  4. 4

    त्यात लसूण, हिंग आणि हळद घाला.

  5. 5

    नंतर बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो घालावा व मऊ होई पर्यत परतून घ्यावा.

  6. 6

    कांदा टोमॅटो मऊ झाला की त्यात वाटलेले वाटण, गरम मसाला, धने जिर पावडर, लाल तिखट घालावे.

  7. 7

    त्यात चण्याची भिजवलेली डाळ घालावी चवी प्रमाणे मीठ आणि 2 वाट्या पाणी घालून व्यवस्थित ढवळून कढई वर झाकण ठेवून मंद आचेवर डाळ शिजू द्यावी भाजलेली असल्या मुळे 10 min शिजते.

  8. 8

    वरून बारीक चिरून कोथिंबीर घालून गरम गरम पोळी-भाकरी बरोबर सर्व्ह करावे.

  9. 9

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Samidha Patade
Samidha Patade @cook_21975887
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes