रसमलाई (rasmalai recipe in marathi)

Priya Kulkarni Sakat
Priya Kulkarni Sakat @cook_21066941
Pune

#फॅमिली
खरे तर माझ्या घरात सर्वांना गोड पदार्थ खायला आवडतात. बरेच पदार्थ घरी केले जातात. पण या वेळी प्रथम च सर्वांचा आवडता पदार्थ रसमलाई ट्राय केला.....आणि पहिलाच प्रयत्न यशस्वी झाला.

रसमलाई (rasmalai recipe in marathi)

#फॅमिली
खरे तर माझ्या घरात सर्वांना गोड पदार्थ खायला आवडतात. बरेच पदार्थ घरी केले जातात. पण या वेळी प्रथम च सर्वांचा आवडता पदार्थ रसमलाई ट्राय केला.....आणि पहिलाच प्रयत्न यशस्वी झाला.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२_३ लोकांसाठी
  1. 1/2पाव पनीर
  2. 1/2 लिटरदूध
  3. 1/4 वाटीड्राय फ्रूट
  4. 1 टि स्पूनसाखर
  5. पाणी
  6. 1 टिस्पुनवेलदोडे पूड
  7. एक चिमूट फूड कलर किंव्हा केसर

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम पनीर मऊ होई पर्यंत छान मळून घेणे. आणि फोटो मध्ये दाखविल्या प्रमाणे त्याचे छोटे गोळे करून,ते थोडेसे प्रेस करून त्याला पेढा सारखं आकार देणे.

  2. 2

    रबडी साठी... एका पॅन मध्ये अर्धा लिटर दूध घेऊन ते चांगले आटवून घेणे त्यामध्ये साखर,वेलदोडे पूड,केसर किंव्हा पिवळा फूड कलर आणि ड्राय फ्रूट घालावे. फोटो मध्ये दाखविले आहे. रबडी तयार.. (दूध आटवून फार घट्ट करू नये, गोळ्या मध्ये रबडी पूर्ण पणे सोक होण्या साठी). आता ही रबडी नॉर्मल तापमान मध्ये येण्या साठी ठेऊन द्यावी

  3. 3

    एका पातेल्यात १ कप साखर आणि एक कप पाणी घालून गुलाबजाम साठी बनवतो तसा पाक बनवणे. त्या उकळत्या पाकमध्ये हे गोळे १०_१५ मिनिट शिजवून घेणे. नंतर गोळ्या मधील पाणी चामच्या च्या सहायांने प्रेस करून काढून घ्यावे

  4. 4

    हे तयार झालेले रसमलाई चे गोळे रबडी मध्ये मुरण्या साठी ठेवावे. एका भांड्यात घेऊन हे सर्व ४_५ तास फ्रीज मध्ये सेट होण्या साठी ठेवावे.

  5. 5

    चार ते पाच तासानंतर ही थंडगार रसमलाई खाण्यासाठी तय्यार

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Priya Kulkarni Sakat
Priya Kulkarni Sakat @cook_21066941
रोजी
Pune

टिप्पण्या

Similar Recipes