रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

2 तास
5 सर्व्हिंग्ज
  1. 1.5 लिटरदूध
  2. 1/2 कपसाखर (चविप्रमाणे घेणे)
  3. 1 टीस्पूनवेलची पूड
  4. आवडीनुसार ड्रायफ्रूट
  5. 5-6केशर काडी
  6. रसगुल्ला करण्यासाठी...
  7. 1 लिटर दूध पनीर साठी
  8. 1 लिटरदूध पनीर साठी
  9. 1 कपसाखर
  10. 3 कपपाणी
  11. 1लिंबू रस

कुकिंग सूचना

2 तास
  1. 1

    प्रथम 1 लिटर दूध छान तापवून घेणे. आता हे दुध नासवून घेणे. त्यासाठी एका वाटीत लिंबू रस घेऊन त्यात थोडे पाणी घालावे. आता हे मिश्रण दुधात घालावे. गॅस बारीक ठेवून दूध एकसारखे गोळा होईपर्यंत हलवत राहणे. आता गॅस बंद करावा. दूध फाटले ले दिसेल हे दूध एका सुती कापडावर काढून घेणे. त्यातील सगळे पाणी निथळून काढणे. आता या चा घट्ट गोळा तयार झालेला दिसेल. तो कापड मध्ये तसाच बंद करून वरून जड वजन ठेवावे.1/2 तास ठेवावे म्हणजे त्यातील पाणी निघून जाईल.आता हा गोळा प्लेट मध्ये काढून घेणे. व चांगले 5-7 मिनिट मळून घेणे

  2. 2

    आता या तयार पनीर मध्ये 1 चमचा कॉर्नफ्लोर घालून छान मळून घेणे. आता या पनीर चे छोटे छोटे गोल किंवा थोडे चपटे असे गोळे करून घेणे.आता गॅस वर पातेले ठेवून त्यात 3 कप पाणी व 1कप साखर घालून चासनी तयार करून घेणे. पाणी व साखर 5 मिनिटे उकळून घेणे. थोडे चिकट लागले कि गॅस बारीक करून त्यात हे तयार पनीर चे गोळेएक एक करून घालावेत. व15 मिनिटे त्यात शिजवून घेणे.

  3. 3

    मस्त असे रसरशीत रसगुल्ला तयार झाला. हे थोडे थंड होऊ देणे. तोपर्यंत गॅस वर एका पातेले मध्ये दूध आटवण्यासाठी ठेवून देणे. साधारण दूध निम्मे किंवा दुधाचा रंग बदले पर्यंत दूध आटवून घेणे. आता या दुधात आपल्या चवीनुसार साखर, वेलची पूड व ड्रायफ्रूट घालून छान दूध घट्ट होई पर्यंत आटवून घेणे. त्यात केशर काड्या दुधात भिजवून घालावेत.

  4. 4

    आता हे घट्ट दूध तयार झाले कि त्यात तयार केलेले रसगुल्ले घालावेत. तो रसगुल्ला घालताना त्यातील पाणी हलकेसे दाबून काढावे व नंतर तो रसगुल्ला दुधात सोडावेत. असे एक एक रसगुल्ला मधील गोड पाणी काढून मग घालावेत.

  5. 5

    जर आवडत असेल तर त्या दुधा मध्ये 1-2 थेंब रसमलाई इसेन्स घालावा. खूप छान चव येते. आता हे रसगुल्ले दुधा मध्ये छान 3-4 तास मुरू द्यावेत. म्हणजे रसगुल्ले छान त्या दुधात शोषले जातात. मस्त अशी रसमलाई घरी तयार होते.

  6. 6

    थंड थंड रसमलाई सर्व्ह करावी. घरी रसगुल्ले तयार करून केलेली रसमलाई खूपच चवीला अप्रतिम लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Rupali Atre - deshpande
रोजी

Similar Recipes