माँगो फ्रुटी (mango ffrooti recipe in marathi)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @chhaya1962

#माँगो दिवसभर बाहेर उन रणरणत य त्यात लॉक डाऊन शॉप बंद भर दुपारी काहीतरी थंडगार ड्रिंक मिळाल पाहिजे अस सारख वाटत होत तर लगेच मनात आल आंब्याच च ड्रिंक बनवु या लगेच आंबे कैऱ्या घेतल्या ( अहो आमच्या फार्मवरच्या च ताज्या ताज्या ) आणि बनवली माँगो फ्रुटी कशी ते विचारता तर चला बघुया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१०- १५ मिनटे शि
  1. १०० ग्रॅम साखर
  2. 2पिकलेले हापुस आंबे
  3. 2मध्यम आकाराच्या कैऱ्या
  4. सजावटीसाठी
  5. आंब्याची खाप
  6. बर्फ क्युब

कुकिंग सूचना

१०- १५ मिनटे शि
  1. 1

    आंबे कैऱ्या स्वच्छ धुवुन त्यांची साल काढुन तुकडे करून घ्या

  2. 2

    छोट्या कुकरमध्ये आंब्याचे व कैरीचे तुकडे साखर व २ कप पाणी घालुन गॅस चालु करून कुकरच्या २-३ शिट्टया काढा

  3. 3

    कुकर थंड झाल्यावर त्यातील पाणी वेगळे काढा व आंबा कैरीचे शिजलेले तुकडे मिक्सरच्या जारमधुन पेस्ट करून घ्या

  4. 4

    तयार आंब्याच्या पेस्टमध्ये बाजुला ठेवलेले कुकरमधील पाणी मिक्स करा व सगळी पेस्ट गाळुन घ्या (काही आंब्याचे तुकडे शिरा राहिल्या असल्यास) सर्व मिश्रण फ्रिज मध्ये १/२ तास थंड करायला ठेवा

  5. 5

    १/२ तासाने आंब्याच्या मिश्रणात थंड पाणी व बर्फ मिक्स करून काचेच्या ग्लासात सर्व्ह करा आपली माँगो फ्रुटी रेडी मस्त बर्फाच्या क्युब व आंब्याच्या खापे नी डेकोरेट करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @chhaya1962
रोजी

Similar Recipes