मोतीपैंजण (ऊरलेल्या पोळ्या व भाताची पोटभरी न्याहारी)(leftover recipe in marathi)

नावाने चकीत झाले ना ,खरंच किती गम्मत आहे. प्रत्येक मराठी घरात हा पदार्थ आवर्जून केल्या जातो पण गावागणिक या पाककृतीला वेगवेगळी नावे आहेत ,कोणी फोडणीचा भात पोळ्या म्हणतात ,कोणी मनोरमा म्हणतात ,तुम्हाला माहिती असलेली नावे सुद्धा सांगा..
मोतीपैंजण (ऊरलेल्या पोळ्या व भाताची पोटभरी न्याहारी)(leftover recipe in marathi)
नावाने चकीत झाले ना ,खरंच किती गम्मत आहे. प्रत्येक मराठी घरात हा पदार्थ आवर्जून केल्या जातो पण गावागणिक या पाककृतीला वेगवेगळी नावे आहेत ,कोणी फोडणीचा भात पोळ्या म्हणतात ,कोणी मनोरमा म्हणतात ,तुम्हाला माहिती असलेली नावे सुद्धा सांगा..
कुकिंग सूचना
- 1
प्रथम पोळ्या कुस्करून घ्याव्या,मोकळा भात व पोळ्यांचा कुस्करा एकत्र करावा.आता कढईमध्ये तेल घेऊन गरम झाल्यावर जिरे, मोहरी,बडीशेप इत्यादी ची फोडणी करावी.त्यानंतर शेंगदाणे,हिरवी मिरची, कढीपत्ता इत्यादी घातल्यानंतर हिंग, हळद, तिखट, मीठ घालावे.
- 2
यानंतर एकत्र केलेला कुस्करा व भात घालून हलवत रहावे. झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यावी. दोन ते तीन मिनिटांनी यामध्ये लिंबाचा रस व साखर ॲड करावी, व पुन्हा एक मिनिटासाठी झाकण ठेवावे.आता गॅस बंद करून गरमागरम सर्व्ह करावे. सर्व्ह करताना प्लेटमध्ये कोथिंबीर घालावी
Similar Recipes
-
शिळ्या पोळ्या,भात उपमा (Left Over Polya Bhat Upma Recipe In Marathi)
#LORअन्न हे पूर्णब्रह्म रेसिपीउरलेला थोडा भात पोळ्या उरल्या दोन वेगवेगळ्या प्रकारचे करायला कंटाळा केला मग उरलेला भात पोळ्या मिक्स करून उपमा केला खुप छान झाले. Madhuri Watekar -
उरलेल्या भात-पोळींचा चिवडा (leftover bhat poli cha chivda recipe in marathi)
#GA4 #week7 #Breakfastरात्रीचा भात आणि पोळ्या उरल्या की त्यापासून सकाळच्या ब्रेकफास्टला चिवड्याची एक झटपट रेसिपी बनविता येते. सरिता बुरडे -
फोडणीचा भात.. (fodnicha bhat recipe in marathi)
#फोडणीचाभातआपल्याकडे घराघरात एक गोष्ट आवर्जून केली जाते, आणि ती म्हणजे अन्नाची नासाडी न होऊ देणे...याचे उत्तम उदाहरण म्हणजे उरलेल्या भाता पासून तयार केलेला फोडणीचा भात... हाभात प्रत्येकाला आवडतो आणि चटकन संपतो देखील....कमीत कमी साहित्य वापरून केलेला हा फोडणीचा भात नाश्त्यासाठी एक उत्तम पर्याय आहे.... 💕💃 Vasudha Gudhe -
फोडणीचा भात (phodhni bhaat recipe in marathi)
#KS3#विदर्भ स्पेशल फोडणीचा भातभंडारा,चंद्रपूर,गडचिरोली भागात भरपुर प्रमाणात तांदुळाची लागवड होत असते.जेवणात देखील भाताचे भरपुर प्रकार असतात आलटून पालटून वेगवेगळे प्रकार भाताचे केल्या जातात.... शिळा भात उरला की हा पदार्थ केल्याचं जातो...आणि 1 वाटी भात जरी असला तर बहीण भावात भांडणं देखील होतात... 😀याची चवच मस्त असते आणि झटपट होतो देखील... मी तर खास भात लावूनही हा फोडणीचा भात करते.तुम्हालाही नक्कीच आवडेल.... Shweta Khode Thengadi -
मोकळी डाळ (dal recipe in marathi)
#cooksnapआमच्याकडे सणाला किंवा कुळाचाराच्या स्वयंपाकात मोकळी डाळ आवर्जून केल्या जाते मात्र इतर वेळेस फारशी केल्या जात नाही पण देवयानी पांडे यांनी नुकतीच पोस्ट केलेली मोकळी डाळ बघून लगेच मी तयारीला लागली फक्त यावेळी चणाडाळ वापरता तूर डाळ वापरून एक नवीन सात्विक चव चाखायला मिळाली Bhaik Anjali -
फोडणीचा भात (phodhnich bhaat recipe in marathi)
मी श्वेता खोडे ठेंगाडी मॅडम ची फोडणीचा भात रेसिपी कुकस्नॅप केली.मस्त झाला भात.लिंबाच्या रसाचे मस्त चव आली. Preeti V. Salvi -
सुशीला (sushila recipe in marathi)
#ks5 मराठवाडारोजच्या पोह्यांपेक्षा वेगळं खमंग, चवदार मराठवाड्यातील लातूर येथील पारंपारिक व फेमस सुशीला. हा पदार्थ मराठवाड्यात थोडयाफार फरकांनी प्रत्येक ठिकाणी बनवला जातो. कुरमुऱ्यांपासून बनवतात. ह्याला सुशीला हे नाव का पडले असावे माहिती नाही. असं म्हणतात की सुशीला नावाच्या बाईंनी हा पदार्थ बनवला असेल. म्हणून सुशीला नाव पडलं असावं. Shama Mangale -
फोडणीचा भात (Fodnicha Bhat Recipe In Marathi)
#CSRकांदा ,लसूण ,मिरची, कोथिंबीर टाकून केलेला फोडणीचा भात अतिशय चविष्ट होतो Charusheela Prabhu -
-
शेंगदाणा कांदा भात (shengdana kanda bhaat recipe in marathi)
#bfr Peanut onion rice म्हणजेच सगळ्यांना आवडणारा व रात्री च्या भाताचा फोडणीचे भात बर का !!मोजक्याच साहीत्या तुन व खुप चविष्ट असा हा फोडणीचा भातमाझ्या मुलाला खुप आवडतो. छोका चांवल काय आणि फोडणीचा भात काय किंवा वग्रणी अन्ना काय सर्व एकच . पण चव मात्र मस्तच .... Shobha Deshmukh -
लेमन राईस (lemon rice recipe in marathi
अतिशय पटकन होणारा टेस्टी आणि पौष्टिक असा हा भात आहे Charusheela Prabhu -
फोडणीची पोळी/पोळीचा कुस्करा (Fodnicha policha kuskra recipe in marathi)
शिळ्या पोळ्या उरल्यास की त्याची फोडणीची पोळी किंवा पोळीचा कुस्करा केला की अतिशय टेस्टी व मस्त होतो Charusheela Prabhu -
ददोंजनम / कर्ड राईस. (curd rice recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7#सात्विकमानवी जीवन खूप धावपळ आणि ताणतणावने ग्रासलेले आहे. छोटे-छोटे ताणतणाव, चिंता याशिवाय बदलत्या जीवनशैलीमुळे फास्ट फूडचा वापर, जेवणाच्या अनियमित वेळा, यामुळे आम्लपित्त किंवा ॲसिडिटीचा त्रास सुरू होतो. आणि हे सर्व मिरची, मसाले तेलकट पदार्थांचे अति प्रमाणात सेवनामुळे होते.पोटातील अपचनाची मुख्य कारणे "हरी," "वरी" आणि "करी"..."हरि" म्हणजे गडबड धांदल.. "वरी" म्हणजे सतत काळजी चिंता... आणि"करी" म्हणजे तिखट मसालेदार पदार्थाचे अति प्रमाणात सेवन करणे. म्हणतात ना...जैसा खाओ अन्न, वैसा होवे मन.. गाईचे शुद्ध तूप, ताक, दही, भात, डाळीमध्ये मूग डाळ भाज्यांमध्ये दुधी, दोडके वगैरे फळभाज्या पचायला हलके आणि सात्विक असतात आणि म्हणूनच मी आज कर्ड राईस म्हणजेच दही भात केला आहे. हा कर्ड राईस साउथ इंडियन ची प्रसिद्ध आणि तेवढीच हेल्दी अशी डिश आहे. या कर्ड राईस ला आंध्रा कडे *ददोंजनम बांगलाभात* असेही म्हणतात. कुठे कुठे याला थाईरसदाम या नावाने देखील संबोधले जाते. म्हणतात ना..."एकच गहू त्याचे प्रकार बहु" तसेच काहीतरी हे.तुम्ही म्हणाल या रेसिपी मध्ये विशेष काय... खरे आहे मैत्रीणीनो.. खरंच विशेष काहीच नाही. पण कर्ड राईस वर जी फोडणी आपण घालतो.. ती जर का परफेक्ट जमली तरच कर्डराईसची मजा. कर्डराईस करताना माझे सर्व लक्ष हे फोडणी वर असते. कारण यातला मेन हिरो हि फोडणीच आहे. चला तर मग करूया सात्विक "कर्डराईस" किंवा "ददोंजनम" .... 💕💃 Vasudha Gudhe -
चित्रान्न (Chitranna recipe in marathi)
कर्नाटकात चित्रान्न प्रसादाचा एक प्रकार म्हणूनही बनवला जातो.खूपच छान लागतो.प्रसादासाठी बनवताना कांदा नाही घालत. Preeti V. Salvi -
-
शिल्लक पोळ्यांचा उपमा (policha upma recipe in marathi)
#GA4 #Week5उपमाथीम नुसार शिल्लक पोळ्यांचा उपमा बनवीत आहे.मी नेहमी वेगवेगळ्या पदार्थांचा उपमा करते., मग तो रव्याचा , शेवईचा , मक्याच्या ,दाण्यांचा ब्रेडचा असतो. शिल्लक पोळ्या राहिल्यामुळे . पण आज मी शिल्लक पोळीचा उपमा केलेला आहे. आपल्याकडे कधी कधी पोळ्या जास्त झाल्या की शिल्लक राहतात . कोणी शीळे खात नाही.त्यामुळे शिल्लक पोळ्या राहिल्या आणि त्यामध्ये काही घटक पदार्थ मिळविले उपमा खूपच चविष्ट लागतो. तर अशाच शिळ्या पोळ्यांचा मी चमचमीत उपमा मी करीत आहे. rucha dachewar -
-
पोळी व भाताचे कटलेट (poli / bhatache cutlets recipe in marathi)
सकाळी नाश्ता करणे खूप आवश्यक आहे. दिवसभर काम करायची ताकत मिळते. कधीकधी आदल्या दिवशीचे काहीतरी उरलेले असते. अनेकदा पोळी किंवा भातच असतो. फोडणीची पोळी किंवा फोडणीचा भात करण्यापेक्षा या वेळी कटलेट.#bfr Pallavi Gogte -
हिरव्या कांद्याच्या पातीचा फोडणीचा भात : (kandyachya paticha fodnicha bhaat recipe in marathi)
हिरव्या कांद्याच्या पातीचा फोडणीचा भात :#हिरव्याकांद्याच्यापातीचाफोडणीचाभात#हिरव्याकांद्याचीपात#GA4#week11मधे ग्रीन ओनीयोन (हिरव्या कांद्याची पात) हे key word वापरुन हिरव्या कांद्याच्या पातीचा फोडणीचा भात बनवीला आहे.हिरव्या कांद्याची पात खाण्यासाठी चविष्ट असतेच मात्र त्याचबरोबर त्यात अनेक पोषणतत्वे असतात. या कांद्यामध्ये सल्फरचे प्रमाण अधिक असते जे शरीरासाठी लाभदायक आहे.भात हे एक महत्त्वाचे पीक असून जगातील निम्म्यापेक्षा अधिक लोकांचे ते मुख्य अन्न आहे.तांदळाला आपल्याकडे पूर्वीपासूनच महत्त्व आहे. घरात तांदूळ असणे हे भरभराटीचे मानले जाते. सर्व धार्मिक कार्यात तांदळाचीच गरज असते. आपल्याकडे तांदळाच्या पिठाची भाकर, घावणे, आंबोळी, डोसा, इडली, लाडू असे अनेक प्रकार केले जातात,.रोजच्या जेवणात भाताचे स्थान कायम असते. हा भात आजकाल विविध पद्धतीने बनविला जातो. साधा भात, स्टीम राईस, मसाले भात, साखर भात, फोडणीचा भात, दही भात, गोळा भात, बिर्याणी, पुलाव, व्हेज फ्राईड राईस, सेझवान राईस .आपल्याकडे भात उरला कि आपण त्याचा फोडणीचा भात बनवतो खाली दिलेली कृती फोडणीच्या भाताची आहे पण हिरव्या कांद्याच्या पातीचा फोडणीचा भात आहे .थोडी वेगळी आणि सर्वांनाच आवडेल अशी आहे. Swati Pote -
दही भात (dahi bhaat recipe in marathi)
#md#दही भातआईच्या हातचा दही भात म्हणजे पर्वणी...उन्हाळ्यात गेले की नक्कीच हा बेत होत असतो....पौष्टिक अशी आईची दही भाताची रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
भात-पोळी चिवडा / चुरमा (bhaat poli chivda recipe in marathi)
#भात-पोळी चिवडा#राञीचा भात व पोळ्या शिल्लक होत्या मग बेत केला की मस्तपैकी चिवडा बनवावा. Dilip Bele -
फोडणीची पोळी (Fodnichi Poli Recipe In Marathi)
#LORकाही वेळा पोळ्या उरतात मग त्या पोळीचे काय करावे असा प्रश्न पडतो मग मी त्या पोळ्याच्या कधी मलिदा, पोळीच लाडू तर कधी फोडणीची पोळी करते. Shama Mangale -
कांदा पातीचा झुणका (zhunka recipe in marathi)
#EB2#W2#विंटर_स्पेशल_ebook_रेसिपीज झुणका..अस्सल मराठमोळा...मराठी मातीतला खमंग खरपूस पदार्थ...महाराष्ट्रात विविध ठिकाणी किती विविध पद्धतीने केला जातो..तरीसुद्धा प्रत्येक ठिकाणचा अगदी खमंग ,चविष्टच असतो..असाच एक प्रकार कांदा पात आणि चण्याच्या डाळीचा झुणका..चला तर रेसिपीकडे.. Bhagyashree Lele -
-
लेमन राईस (Lemon Rice Recipe In Marathi)
#RRRभारतातील साऊथ भागातला लेमन राईस हा सगळ्यांच्याच आवडीचा प्रकार आहे माझ्याकडे साउथ चे सगळेच पदार्थ खूप आवडीने खाल्ले जातात त्यातला लेमन राईस हा प्रकार तर सगळ्यांनाच खूप आवडतो हा लेमन राईस प्रवासातही जाताना बरोबर डब्यात तयार केला जातो दोन दिवस तरी हा भात टिकतो.करायलाही अगदी सोपा असा हा पदार्थ आहे झटपट तयार होतो यात मी मोरगापुडी या पावडरचा वापर केला आहे मोरगापोडी भातामध्ये कालून खाल्ली जाते याच्या सगळ्या प्रकारचे मसाले स्पाइसेस दाळ्या सगळं असतं लेमन राईस मध्ये टाकल्यामुळे याचा टेस्ट खूप छान येतो.तर बघू या रेसिपी Chetana Bhojak -
लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
#ccs #कुकपँडची_शाळा...#लेमन_राईस...लेमन राईस हा दक्षिण भारतातील सर्वात सामान्य पदार्थांपैकी एक आहे, जिथे ते चित्रान्ना नावाने देखील ओळखले जाते. हे सहसा एकटे किंवा रायता, दही, चटणी किंवा लोणच्या सोबत खाल्ले जाते. लेमन राईस नाश्त्याला किंवा जेवणात ही तुम्ही खाऊ शकता. खूपच झटपट होणारी आणि खूपच सोपी अशी ही लेमन राईस ची रेसिपी आहे, चला तर मग बघुया लेमन राईस कसे बनवायचे ते 😊🙌 Vandana Shelar -
लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
#दक्षिण लेमन राईस (लिंबू भात) हा पदार्थ दक्षिण भारतात खूप आवडीचा पारंपरिक ब्रेकफास्ट आहे. लेमन राईस हा चवीला खूप टेस्टी तर आहेच शिवाय थोडा आंबट लागतो आणि हेल्थी आहे Anuja A Muley -
भात व पोळी बुलेट (Left Over Bhat Poli Bullets Recipe In Marathi)
#LOR काही वेळेस भात उरतो तो फोडणीचा करतो, पोळ्या उरल्या तर फोडणीची पोळी करतो, पण नेहमी केल्यावर त्याचा ही कंटाळा येतो. तेंव्हा Left over पासुन वेगळा प्रकार उरलेल्या भात व पोळीपासून टेस्टी व हेल्दी स्नॅक्स. करुया मस्त लागते. Shobha Deshmukh -
कोकोनट पॅनकेक (coconut pancake recipe in marathi)
#पॅनकेक मराठीत म्हणायचे झाले तर पॅन केक म्हणजे दूध, अंडी,पीठ आणि साखर यांचे मिश्रणातून तयार केलेल्या फ्लॅट केक मोस्टली गोल आकाराचा.पण प्रत्येक गोष्ट प्रमाणे त्यांचे सुद्धा खूप व्हेरीएशन्स आहेत गोळ तसेच तिखट, आज मी तुम्हाला कोकोनट म्हणजे ओल्या नारळापासून पॅन केक कसे बनवतात ते सांगणार आहे, Amit Chaudhari -
पोहे (Poha recipe in marathi)
#फोटोग्राफी*पोहे*... महाराष्ट्राने भारतीय खाद्य संस्कृतीला दिलेली भेट आणि "न्याहारी" पदार्थांपैकी एक अग्रणी आणि नेहमीच डिमांडमधे असणारा पदार्थ....!, जो अनेक प्रादेशिक पारंपरिक पध्दतिने बनवला जातो. जशा याच्या रेसीपीज् भिन्न तशीच याची नावेही....भारतातील जवळपास १५ भाषांमधे *पोहे* विविध नावांनी ओळखले जातात.....पोहे (मराठी), पौवा (गुजराती), अवलाक्की (कन्नड), बाजील (तुळू), पोया (राजस्थानी),चुडा (ओरीया व मिथीली), अटुकुल्लु (तेलुगु), अवल (तामिल व मल्यालम),सीरा (आसमीस), चीरा (बंगाली), फोवूं (कोकणी), पोहा (हिंदी), चिउरा (नेपाळी व भोजपुरी) इत्यादि.म्हणतात ना..., पोहे चांगले *जमले* तर यंदा कर्तव्यही *जमतचं*... 🥰😀😀👍(©Supriya Vartak-Mohite)तर असा हा सोप्पा पदार्थ नानाविध पध्दतिने नक्की करुन पहा.... 😊😀😊 Supriya Vartak Mohite
More Recipes
टिप्पण्या