क्रिस्पी सुरमई-पापलेट(crispy surmai paplet recipe in marathi)

Suhani Deshpande
Suhani Deshpande @cook_20089255

#सीफूड

सीफूड चॅलेंजच्या तिसऱ्या आठवड्याची थीम आहे, फिश स्टार्टर्स. या थीम साठी मी पोस्ट केले आहेत सुरमई आणि पापलेट यांची पारंपरिक फ्राय करायची रेसिपी.

क्रिस्पी सुरमई-पापलेट(crispy surmai paplet recipe in marathi)

#सीफूड

सीफूड चॅलेंजच्या तिसऱ्या आठवड्याची थीम आहे, फिश स्टार्टर्स. या थीम साठी मी पोस्ट केले आहेत सुरमई आणि पापलेट यांची पारंपरिक फ्राय करायची रेसिपी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

४ व्यक्तींकरिता
  1. 1मध्यम आकाराची सुरमई (१२ तुकडे होतात)
  2. 1 लहानपापलेट
  3. 100 ग्रामतांदळाचे पीठ
  4. 2मोठे चमचे आलं लसूण पेस्ट
  5. 1 लहान चमचा लाल मिरची पावडर
  6. 1 लहान चमचा फिशफ्राय मसाला
  7. 1 लहान चमचा तेल
  8. 1/4 चमचाहळद
  9. 2 मोठे चमचे भरून लिंबाचा रस किंवा कोकम आगळ
  10. चवीनुसारमीठ
  11. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

  1. 1

    सुरमई आणि पापलेट स्वच्छ धुवून घ्यावेत. सुरमईचे तुकडे करून घ्यावेत आणि पापलेटवर चिरा द्याव्यात म्हणजे त्या चिरांमध्ये आतपर्यंत मसाला पोहोचतो.

  2. 2

    आलं लसूण पेस्ट, लाल मिरची पावडर, फिशफ्राय मसाला, लिंबाचा रस, तेल, हळद, चवीनुसार मीठ सर्व एकत्र फेटून मॅरीनेशन तयार करावे. स्वच्छ केलेल्या तुकड्यांना मॅरीनेशन लावून अर्धा तास ठेवावे.

  3. 3

    तांदळाच्या पिठात 1/4 चमचा लाल तिखट आणि किंचित मीठ घालून मिक्स करावे. अर्ध्या तासाने मॅरीनेट केलेले तुकडे या तांदळाच्या पिठात घोळवून तव्यावर तेल घालून मंद आचेवर दोन्ही बाजूंनी छान क्रिस्पी होईपर्यंत शॅलो फ्राय करून घ्यावेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Suhani Deshpande
Suhani Deshpande @cook_20089255
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes