सुरमई फिश रस्सा (Surmai Fish Rassa Recipe In Marathi)

Vandana Shelar
Vandana Shelar @cook_26261725
नवी मुंबई

#ATW3
#TheChefStory
मसालेदार चवींनी तोंडाला पाणी सुटणारा महाराष्ट्रीयन पदार्थ म्हणजे फिश थाली....
फिश थाली मध्ये जर सर्वात जास्त फेमस काही असेल तर सुरमई फिश रस्सा थाली आहे. चला तर मग बघू या सुरमई फिश रस्सा कसा करायचा...

सुरमई फिश रस्सा (Surmai Fish Rassa Recipe In Marathi)

#ATW3
#TheChefStory
मसालेदार चवींनी तोंडाला पाणी सुटणारा महाराष्ट्रीयन पदार्थ म्हणजे फिश थाली....
फिश थाली मध्ये जर सर्वात जास्त फेमस काही असेल तर सुरमई फिश रस्सा थाली आहे. चला तर मग बघू या सुरमई फिश रस्सा कसा करायचा...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45 मि
4 सर्व्हिंग्ज
  1. मॅरीनेट साठी
  2. 7-8तुकडे सुरमई
  3. हळद पावडर
  4. लिंबाचा रस
  5. मीठ
  6. ग्रेव्ही साठी
  7. 1वाटी ओला नारळ
  8. 2कांदे
  9. 4 टीस्पून काळा मसाला
  10. 2चमचे धणे
  11. 1 टीस्पून काळी मिरी
  12. 2कोकम
  13. त्रिफळा
  14. 7-8लसूण
  15. 1/2 इंच आले
  16. कोथिंबीर
  17. तेल
  18. मीठ

कुकिंग सूचना

45 मि
  1. 1

    सुरमई मॅरीनेट करण्यासाठी,
    मीठ, हळद आणि लिंबाचा रस त्यामध्ये घालून व्यवस्थित चोळून लावा.
    मॅरीनेट करण्यासाठी १५ मिनिटे ठेवा.

  2. 2

    ब्लेंडरच्या भांड्यात कांदा, धणे, काळी मिरी, ताजी कोथिंबीर, घ्या.
    ओले खोबरे आणि थोडे पाणी घालून बारीक पेस्ट करा.

  3. 3

    कढईत तेल गरम करून त्यात कांदा, थोडे मीठ आणि ताजी कोथिंबीर घाला. त्यात काळा मसाला आणि मिश्रित मसाला घालून मिक्स करा. गरम पाणी घालून मिक्स करा.

  4. 4

    8-10 मिनिटे मंद आचेवर शिजवलेल्या सुरमईचे तुकडे, कोकम, त्रिफळे घालून मॅरीनेट करा. हलके ढवळावे. सुरमई रस्सा सर्व्ह करण्यासाठी तयार आहे.

  5. 5

    सुरमईचा रस्सा सुरमई मसाला फ्राय, तांदळाची भाकरी किंवा चपाती, सोलकढी, भात आणि कांदा लिंबू बरोबर सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Vandana Shelar
Vandana Shelar @cook_26261725
रोजी
नवी मुंबई
Youtuber- Vandana's RecipeHome made RecipesFood Blogger
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes