सरगुंडे (sirgunde recipe in marathi)

Jaishri hate
Jaishri hate @cook_22865448
यवतमाळ

#सरगुंडे आज मी सरगुंडे ची रेसिपी पोस्ट करत आहे खूप दिवसापासून बनवून ठेवले पण पोस्ट करायला वेळच मिळत नव्हतं आज म्हटलं नक्की वेळ काढून लिहिते . सरगुंडे तयार करायला वेळ तर खूप लागतो पण खायला पण तशी स्वादिष्ट सरगुंडे रसासोबत खायला सुंदर लागतात पण ते पावसाळ्यात उन्हाळ्यात हिवाळ्यात पण आपण मॅगी बनवून खाऊ शकतो मॅगी मसाला टाकायचा होममेड मॅगी तयार चला तर कसे बनवायचे सरगुंडे ते सांगते.

सरगुंडे (sirgunde recipe in marathi)

#सरगुंडे आज मी सरगुंडे ची रेसिपी पोस्ट करत आहे खूप दिवसापासून बनवून ठेवले पण पोस्ट करायला वेळच मिळत नव्हतं आज म्हटलं नक्की वेळ काढून लिहिते . सरगुंडे तयार करायला वेळ तर खूप लागतो पण खायला पण तशी स्वादिष्ट सरगुंडे रसासोबत खायला सुंदर लागतात पण ते पावसाळ्यात उन्हाळ्यात हिवाळ्यात पण आपण मॅगी बनवून खाऊ शकतो मॅगी मसाला टाकायचा होममेड मॅगी तयार चला तर कसे बनवायचे सरगुंडे ते सांगते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 किलोओल्या गावाचे पीठ
  2. 1/2 टीस्पूनमीठ
  3. भिजवण्यासाठी पाणी
  4. 2 टीस्पूनतेल

कुकिंग सूचना

  1. 1

    ओल्या गव्हाचे पीठ कसे तयार करायचे ते मी प्रथम तुम्हाला सांगते एक किलो गहू साफ करून सायंकाळी पाण्यामध्ये दोन मिनिट धून ओल्या फडक्याने मध्ये झाकून रात्रभर ठेवा आणि दुसऱ्या दिवशी दळून घेऊन या त्याची जाडसर कणीक येते ते आपण रव्याच्या चाळणीने चाळून घ्यायची नंतर मैद्याच्या चाळलेले चाळायची तर झाले आता ओल्या गव्हाचे पीठ तयार.

  2. 2

    आता आपण सरगुंडे तयार करायला सुरुवात करू त्यासाठी आपल्याला दिवसभरात किती होऊ शकते आपल्याला त्या परीने कणिक घ्यायची मी अर्धा किलोचे करते त्यामुळे मी दोन ग्लास भिजवते कनिकमध्ये मिठ घालून थोडीशी पातळ पण नाही आणि घट्ट भिजवून तयार करा दोन तास झाकुन ठेवा.

  3. 3

    लांब गोल का ल्या घ्या त्याला सर असे म्हणतात. सरांना तेल लावा हाताला पण तेल लावा आणि थोडीशी कणकेचा गोळा घेऊन सरांना गोल गोल गुडून तयार करा.

  4. 4

    सराला गुंडाळलेली कनिक थोडावेळ तशीच ठेवायची वाळुंन झाल्यानंतर त्याला हळूच काढून घ्या आणि उन्हामध्ये वाळत ठेवा वाढल्यानंतर तुम्ही ते डब्यामध्ये भरून ठेवू शकता.

  5. 5

    गंजाम मध्ये पाणी गरम करायला ठेवा अर्धा लिटर पाणी उघडल्यानंतर तुम्हाला पाहिजे तेवढे सरगुंडे उकळत्या पाण्यामध्ये टाका आणि दोन मिनिटे परतून घ्या व चाळणी मध्ये पाणी मिथुन टाका वरून थंड पाणी सोडा त्यामुळे सरगुंडे मोकळे होतील.

  6. 6

    घरी आपण आमरस करतो. पण सरगुंडे आमरस सोबत खायला रुचकर लागतात

  7. 7

    सरगुंडे आमरस सोबत खायला तयार झाले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Jaishri hate
Jaishri hate @cook_22865448
रोजी
यवतमाळ

टिप्पण्या (4)

Varsha Pandit
Varsha Pandit @cook_19678602
वा खरंच खूप मस्त आहे रेसिपी आणि खरंच खूप कष्ट घ्यायला लागतात असे दिसतेय या रेसिपी ला, खरच छान बनवली

Similar Recipes