अमृतफळ (amrutphal recipe in marathi)

Sampada Shrungarpure
Sampada Shrungarpure @cook_24516791
India

#shravanqueen
#Post3 #BhaikAnjaliRecipe
अमृतफळ

ही रेसिपी मी आज केली. खूप सोप्पी आहे करायला. सगळ्यांना खूप आवडली. त्याची चव जिलेबी सारखीच लागते.

अमृतफळ (amrutphal recipe in marathi)

#shravanqueen
#Post3 #BhaikAnjaliRecipe
अमृतफळ

ही रेसिपी मी आज केली. खूप सोप्पी आहे करायला. सगळ्यांना खूप आवडली. त्याची चव जिलेबी सारखीच लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 ते 20 मिन
4 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपतांदळाचे पीठ
  2. 1 कपओल्या नारळाचा चव
  3. 3/4 कपदही
  4. 1 पिंचमीठ
  5. 1 कपसाखर
  6. 1 कपपाणी
  7. 4 ते 5 केशर काड्या
  8. आवडीनुसार खाण्याचा रंग
  9. 1 टी स्पूनसुकामेव्याचे काप
  10. साजूक तूप तळणीसाठी

कुकिंग सूचना

15 ते 20 मिन
  1. 1

    सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये तांदळाचे पिठ, ओला नारळ चव,मीठ, नखभर खाण्याचा रंग व दही घालून सरबरीत वाटून घ्यावे.आवश्यकता वाटल्यास थोडे पाणी घालून भज्याच्या पिठापेक्षा थोडे घट्टसर वाटून घ्यावे

  2. 2

    एकीकडे गॅसवर साखरेचा पाक तयार करायला ठेवावा.आपल्याला एकतारी पाक तयार करायचा आहे. त्यानुसार साखरेमध्ये तसे पाणी घालून पाक तयार करावा. पाकामध्ये केशर काड्या व खाण्याचा नखभर रंग ऍड करावा.

  3. 3

    दुसरीकडे कढईमध्ये तूप घालून गरम करायला ठेवावे व वाटलेल्या मिश्रणाचे चे छोटे-छोटे भज्या सारखे खमंग तळून घ्यावेत व हे तळल्यानंतर पाकामध्ये सोडावे. साधारण पाच ते दहा मिनिटात हे पाकामध्ये मुरल्यानंतर एका बोल मध्ये काढून त्यावर सुकामेवा घालावा, अमृतफळ तयार आहेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sampada Shrungarpure
Sampada Shrungarpure @cook_24516791
रोजी
India
Passionate about cooking. Like to learn more innovative recipes ...
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes