नैवेद्य उकडीचे  मोदक (ukadiche modak recipe in marathi)

Shubhangee Kumbhar
Shubhangee Kumbhar @shubhangee_99
Sawantwadi

#रेसिपीबुक
#week3
#नैवेद्य
#पोस्ट 2
आज कोकणची खासियत ...उकडीचे मोदक केले.हा पदार्थ शिकण्यासाठी जास्त मेहनत नाही...फक्त हा पदार्थ खाण्याची आवड हवी. 😀😀 आणि मला हा पदार्थ करायला जास्त आवडते...खुप छान वाटते त्या पारीची वाटी करून त्यात सारण भरून त्याची पाकळी करून मोदक करायला...जणू एखाद्या नवजात बालकाला कुरवाळत आहे..❤❤त्याचे लाड करत आहे.

नैवेद्य उकडीचे  मोदक (ukadiche modak recipe in marathi)

#रेसिपीबुक
#week3
#नैवेद्य
#पोस्ट 2
आज कोकणची खासियत ...उकडीचे मोदक केले.हा पदार्थ शिकण्यासाठी जास्त मेहनत नाही...फक्त हा पदार्थ खाण्याची आवड हवी. 😀😀 आणि मला हा पदार्थ करायला जास्त आवडते...खुप छान वाटते त्या पारीची वाटी करून त्यात सारण भरून त्याची पाकळी करून मोदक करायला...जणू एखाद्या नवजात बालकाला कुरवाळत आहे..❤❤त्याचे लाड करत आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1तास
5  सर्व्हिंग्ज
  1. 2 कपबासमती तांदूळाचे पीठ
  2. 5 कपओल्या खोबरेचा किस
  3. 2 कपगुळ
  4. 1/2 टीस्पूनभाजलेली खसखस
  5. 1/2 टीस्पूनवेलची पूड
  6. 1/2 टीस्पूनसुंठ पावडर
  7. चिमुटभरमीठ
  8. 1 टीस्पूनतेल
  9. 2 टीस्पूनदुध
  10. 2 कपपाणी

कुकिंग सूचना

1तास
  1. 1

    प्रथम सारणासाठी तयारी करून घेणे. ओल्या खोबरे च्या किस मध्ये गुळ घालून शिजवून घ्यावे.हे शिजत आले की त्यामध्ये सुंठ, वेलची,खसखस घालून एकजीव करून घ्यावे.

  2. 2

    अशा पद्धतीने आपले सारण तयार आहे.

  3. 3

    आता पिठाची तयारी. एका ताटात 2 कप तांदूळाचे पीठ घ्यावे. एका पातेल्यात 2 कप पाणी घालून एक उकळी देणे. जेवढे पीठ तेवढं पाणी.

  4. 4

    पाण्यात मीठ,तेल,दुध घालून एक उकळी देणे. पाण्याला उकळी आली की गॅस फ्लेम बारीक करावी & पीठ एकसारखे घालून घ्यावे.याला पीठ भागवणे म्हणतात. हे पीठ मंद आचेवर 5/7 मिनिटे ठेऊन या पिठाची उकड काढून घ्यावी.

  5. 5

    ही उकड तयार. गरम असतानाच परातीमध्ये काढून घ्यावी. & तेलाचा हात लावून मळून घेणे. हाताला थोड चटका बसतो म्हणून किंचित पाण्याचा हात लावायचा. पण पीठ मऊ होईपर्यंत मळून घ्यावे.तयार पिठाचे पेढ्यापेक्षा मोठे गोळे बनवून घ्यावे.

  6. 6

    या गोळ्यांना तेलाचा हात लावून त्याची बोटांच्या मदतीने वाटी करून घ्यावी.यात एक चमचा सारण घालून बाजुने चुन्या पाडून ही वाटी हलक्या हाताने दाबत बंद करावी. छान मोदकाचा आकार येतो.

  7. 7

    आता मोदक वाफवून घ्यावेत. त्यासाठी मी कूकरमधे 2 ग्लास पाणी घालून त्यावर एक चाळण ठेवली.यात हळदीची पाने ठेऊन मोदक घालून 15 मिनिटे वाफवून घेतले.कुकरची शिट्टी & रिंग काढून घ्यावी.

  8. 8

    अशा पद्धतीने आपले उकडीचे मोदक तयार आहेत..हळदीच्या पानांमुळे मोदकाला वास छान लागतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shubhangee Kumbhar
Shubhangee Kumbhar @shubhangee_99
रोजी
Sawantwadi

टिप्पण्या

Similar Recipes