शिळ्या पोळीचा शाही लाडू (shilya poliche shahi ladoo recipe in marathi)

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564

#cooksnap
समर्पिता पटवर्धन आणि माया घुसे या दोन्ही मैत्रिणींच्या पोळीचा लाडू ह्या रेसिपी मी पहिल्या. मी रेसिपी रीक्रीएट केली. त्यात मी माझ्या आवडीप्रमाणे थोडा बदल केला. हा लाडू करताना पोळी थोडे तूप लावून,तव्यावर कडक करून घेतली ,नंतर मिक्सरमधून फिरवली ,गुळ तूप,ड्राय फ्रूट ,खसखस घातले.त्यामुळे लाडू शाही झाला आणि ज्याप्रमाणे चुर्मा लाडू लागतो त्याप्रमाणे ह्याची टेस्ट आली.खूपच छान लागतो चवीला.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

५-७ मिनीटे
१-२
  1. 1शिळी पोळी
  2. 1/4 कपकिसलेला गुुुळ आवडी नुसार कमी जास्त
  3. 1 टेबलस्पूनड्राय फ्रुट
  4. 1/4 टीस्पूनवेलची पूड
  5. 1/2 टीस्पूनखसखस
  6. 1 टेबलस्पूनसाजुक तूप.....आवश्यकतेनुसार

कुकिंग सूचना

५-७ मिनीटे
  1. 1

    शिळी पोळी तव्यावर छान कडक करून घेतली. त्यावेळी साधारण १ टीस्पून तूप दोन्ही बाजूंनी लावून घेतले.गॅस बंद करून पोळी तव्यावराच ठेवली व पोळीवर खसखस घातली.त्यामुळे ती पण भाजली जाते.

  2. 2

    नंतर पोळीचे तुकडे करून ती मिक्सरमधून बारीक करून घेतली.

  3. 3

    पोळीचा चुरा,गुळ, ड्राय फ्रूट एकदा मिक्सरमधून फिरवले.म्हणजे पटकन मिक्स होउन लाडू वळायला सोपे जाते.

  4. 4

    तयार मिश्रण बाउल मध्ये काढून त्यात आवश्यकतेनुसार तूप घालून लाडू छान गोलाकार वळून घेतले. पोळी तुपावर भाजून मग बारीक केल्याने हा लाडू चुरमा लाडू प्रमाणे लागतो आणि त्यात खसखस,ड्राय फ्रुट घातल्याने शाही होतो.खूपच छान चव येते.खोबऱ्याचा कीस माझ्याकडे नव्हता नाहीतर त्यात लाडू घोळवला की सुरेख दिसतो. खाण्यासाठी तयार आहेत शिळ्या पोळीचे शाही लाडू.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564
रोजी

Similar Recipes