स्टफ्ड भेंडी (stuffed bhendi recipe in marathi)

Priya Kulkarni Sakat
Priya Kulkarni Sakat @cook_21066941
Pune

#स्टफ्ड भेंडी

स्टफ्ड भेंडी (stuffed bhendi recipe in marathi)

#स्टफ्ड भेंडी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिट
२_३ जणांसाठी
  1. पावशेर कोवळी भेंडी
  2. 1/2 वाटीशेंगदाणा कूट
  3. 2 चमचेगोडा मसाला
  4. दीड चमचा तिखट
  5. 1/2 चमचाहळद
  6. 1 टेबलस्पूनकोथिंबीर
  7. चवीनुसारमीठ
  8. 1 चमचाचिंच गुळ खजूर कोळ
  9. 2 चमचेतीळ
  10. 1/4 वाटीखिसलेले खोबरे
  11. 1 टीस्पूनतेल हिंग मोहरी हळद

कुकिंग सूचना

३० मिनिट
  1. 1

    भेंडी नेहमी सारखी धुवून पुसून फोटो मध्ये दाखविल्या सारखी चिरुन घेणे.

  2. 2

    भेंडीत भरण्याच्या मसाल्यासाठी सुके खोबरे आणि तिळ भाजून घेणे.

  3. 3

    भाजलेले खोबरे तीळ मिक्सरला वाटून घेणे त्यामध्ये दीड चमचा तिखट, दोन चमचे गोडा मसाला, अर्धा चमचा हळद, शेंगदाणा कूट आणि चव प्रमाणे मीठ घालावे. आवडत असल्यास थोडीशी कोथिंबीर पण घालावी

  4. 4

    आता हे सगळे एकसारखे मिक्स करून कोरडे किंव्हा थोडेसे पाणी घालून पेस्ट करून घ्यावी. आणि प्रत्येक भेंडी च्या तुकड्यात भरून घ्यावे

  5. 5

    तेलाची जिरे मोहरी हिंग हळद घालून फोडणी करून घेणे. कांदा किंवा टोमॅटो न घालता भरलेली भेंडी डायरेक्ट फोडणीत घालून दोन ते तीन मिनिट परतवून घेणे. कढईवर झाकण ठेवून पाच मिनिट वाफवून घेणे. आता राहिलेला मसाला घालून झाकण न ठेवता भेंडी शिजवून घ्यावी.

  6. 6

    भेंडी शिजत आली की एक चमचा चिंच गुळ खजुराचा कोळ भेंडीच्या बाजूने सोडावा आणि एकदा भेंडी परतवून घ्यावी. (साधारण पंधरा मिनिटात पूर्ण भाजी शिजते.)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Priya Kulkarni Sakat
Priya Kulkarni Sakat @cook_21066941
रोजी
Pune

टिप्पण्या

Priya Kulkarni Sakat
Priya Kulkarni Sakat @cook_21066941
चिंच गूळ खजूर चा कोळ नसल्यास अर्धे लिंबू चा रस पण वापरू शकता

Similar Recipes