दाण्याच्या कुटाचे लाडू(danyachya kutache ladoo recipe in marathi)

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564

संध्याकाळच्या वेळी पटकन तोंडात टाकण्यासाठी खाऊच्या डब्यात काहीतरी आपण भरून ठेवत असतो.त्यापैकी एक शेंगदाण्याचा कुटाचे लाडू. दाणे भाजून कुट करून ठेवलेले असतेच बरेचदा. गुळही बरेचदा मी किसून ठेवते. त्यामुळे हे लाडू तर अगदीच पाच मिनिटात होतात.गोष्टी तयार नसतील तरी १५-२० मिनिटांच्या वर वेळ लागत नाही. भरपूर प्रमाणात आयर्न असणारे हे पौष्टीक असे लाडू.......

पुढे वाचा
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

१-२
  1. 1/2 कपभाजलेल्या शेंगदाण्याचे कूट
  2. 1/4 कपकिसलेला गुळ
  3. 2 टीस्पूनसाजुक तूप
  4. 1/4 टीस्पूनवेलची पूड..आवडत असल्यास

कुकिंग सूचना

  1. 1

    साहित्य घेतले.

  2. 2

    सर्व साहित्य एकत्र केले.मी वेलची पुढे घातली नाही.आणि हातानेच एकत्र करून लाडू वळले.पण पटकन होण्यासाठी सगळे मिश्रण मिक्सर क्या भांड्यात घालून मिक्सर बंद उघड करत ३-४ वेळा फिरवला की लाडू लगेच वळले जातात.

  3. 3

    तयार लाडू प्लेट मध्ये सर्व्ह केले. एवढ्या साहित्यात तीन मध्यम आकाराचे लाडू तयार होतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

टिप्पण्या

यांनी लिहिलेले

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564
रोजी

Similar Recipes