बदामाचा शिरा (badamacha sheera recipe in marathi)

नुतन
नुतन @cook_19481592
पुणे

बदामाचा शिरा (badamacha sheera recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिट
2 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपरवा
  2. 4 टीस्पूनतूप
  3. 1 टीस्पूनवेलदोडे ची पूड
  4. 1/2 कपसाखर
  5. 2 कपपाणी
  6. 10/12बदाम
  7. चिमूटभरलाल रंग

कुकिंग सूचना

20 मिनिट
  1. 1

    प्रथम 30 मिनिट आधी बदाम पाण्यात भिजत घातले, आणि नंतर त्याची साल काढुन घेतले.

  2. 2

    मिक्सर मध्ये बदाम ची पेस्ट करून घेतली.(मी इथे बदाम ची पेस्ट वापरली, कारण मी हि रेसिपी खास माझ्या लहान मुली साठी केली आहे, जेणे करून तिला खाताना जाडसर तुकडे लागणार नाही. तुम्ही इथे बदाम ची जाडसर पावडर किंवा मोठे काप वापरू शकता)

  3. 3

    आता कढई मध्ये तुप घालून रवा भाजून घेतला, दुसरीकडे पाणी गरम करायला ठेवले.

  4. 4

    रवा चांगला भाजून झाला कि त्यात गरम पाणी ओतुन 5 मिनिट परतून घेतले.

  5. 5

    आता त्यामध्ये बदाम पेस्ट, साखर, वेलदोडे ची पूड घातली, लालरंग घातला आणि पुन्हा 5 मिनिट परतून घेतले.

  6. 6

    आता बदाम शिरा तयार आहे गरम गरम सर्व्ह केला.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
नुतन
नुतन @cook_19481592
रोजी
पुणे

टिप्पण्या

Similar Recipes