खुसखुशीत रवा -बेसन लाडू

Varsha Pandit
Varsha Pandit @cook_19678602
Satara

#goldenapron3
ओळखलेलं शब्द : rava, ghee

खुसखुशीत रवा -बेसन लाडू

#goldenapron3
ओळखलेलं शब्द : rava, ghee

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40min.
  1. 200 ग्रॅमबारीक रवा
  2. 150 ग्रॅमbesan
  3. 250 ग्रॅमसाखर
  4. 250 ग्रॅमतूप
  5. 125ml पाणी
  6. 1 टेबलस्पूनवेलदोडे जायफळ पूड
  7. 2 टेबलस्पूनबदाम आणि मनुका

कुकिंग सूचना

40min.
  1. 1

    प्रथम कढई मध्ये रवा आणि त्या नंतर बेसन कोरडेच,गुलाबीसर भाजून घ्या. त्यामुळे तूप जास्त लागत नाहीत, आणि लवकर भाजून होतात. त्यानंतर कढई मध्ये निम्म तूप घेऊन पहिले रवा छान भाजून घ्या, साधारण 10 min.भाजून झाले कि काढुन घ्या.

  2. 2

    त्याच कढई मध्ये राहिलेलं तूप घेऊन आता बेसन छान तूप सुटेपर्यंत भाजून घ्या.

  3. 3

    आता ते ही एका परातीमध्ये काढुन घ्या.

  4. 4

    आता त्याच कढई मध्ये पाक बनवण्यासाठी पाणी घ्या आणि साखर घाला.पाणी आणि साखरेचे प्रमाण योग्य ठेवा. उकळी आली कि 1 टीस्पून दूध घाला म्हणजे साखरेचे काळ वर तरंगून येईल. मग ते चमच्याने बाजूला काढा म्हणजे पाक स्वछ होऊन लाडू काळपट होणार नाहीत. आता त्यामध्ये वेलदोडे जायफळ पूड घालून एकतरी पाक झालंय कि नाही ते check करुन घ्या.

  5. 5

    पाक झाल्यानंतर गॅस बंद करुन लगेच त्यात रवा आणि बेसन घाला आणि झाकून ठेवा, चांगले 2 तास मुरू द्यायचं पाक म्हणजे लाडू छान वळता येतात. 2 तासानंतर झाकण काढुन मिश्रण चांगले हलवून लाडू बदाम आणि मुणूक नि सजवून वळून घ्या. तयार आहेत खुसखुशीत रवा बेसन लाडू.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Varsha Pandit
Varsha Pandit @cook_19678602
रोजी
Satara
I am community manager of Cookpad Marathi. I am passionate about cooking 👩‍🍳
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes