पेढा पोळी (pedha poli recipe in marathi)

Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
नागपुर

#रेसिपीबुक #week3
नैवेद्य
गुरुः ब्रह्मा गुरुः विष्णुः, गुरुः देवो महेश्वरा ।
गुरुः साक्षात परब्रह्मा, तस्मै श्री गुरुवे नमः
गुरूपौर्णिमा ला व्यासपौर्णिमा म्हणून पण संबोधतात. आद्य गुरु व महाभारताचे रचयीता आणि अनेक शास्त्रंचे जनक गुरु व्यास ह्यांची जन्म तिथी. आई ही आपली पाहिली गुरु जी आपल्याला ह्या जगाची ओळख करुन देते,मग वडिल जे ह्या जगात निर्भीड,ताठ मानेनी जगायला शिकवतात.मग शिक्षक,मित्र,शेजारी,ओळखीचे,सहकर्मी,नाना तर्हेने अयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती काही तरी शिकवून जाते.गुरूपौर्णिमा हा जरी गुरू ला परतफेड करण्याचा दिवस असला तरी शिष्य आपल्या ब्रम्हचर्याश्रमात असतांना आपल्या गुरूबंधूंसोबत रोजच संपूर्ण गुरूकुलासाठी भोजनाची व्यवस्था करत असत, त्यासाठी जंगलात व सभोवताली मिळेल त्या व उपलब्ध साधनांपासून ते आपला उदर्निवाह करत.चातुर्मास व पावसाळा सुरू झाल्यानंतर जंगलातील उपलब्ध भाज्या,साठवणूक केलेले धान्य यातून रोजचे पौष्टीक भोजन बनत असे, तर मग चला आपणही पावसाळ्यात चातुर्मासात आहाराचे महत्व अबाधीत ठेवत आपल्या कडे उपलब्ध व पौष्टीक भोजन बनवून तो नैवेद्य आपल्या गुरूला अर्पण करूया.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  1. 250 ग्रॅमकेशरी पेढे
  2. 1 टेबलस्पूनपिठी साखर
  3. 100 ग्रॅमकणिक
  4. 1/4 टीस्पूनमीठ
  5. 1/2 टीस्पूनतेल
  6. 1 टेबलस्पूनसाजुक तूप

कुकिंग सूचना

20 मिनिट
  1. 1

    कणकेत मिठ तेल घालुन थोडया पाण्याने नरम भिजवुन घ्या. एका बाउल मधे पेढे कुस्करून घ्यावेत अजुन गोड लागल्यास त्यात पिठी साखर मिसळून गोळे तैयार करुन घ्या (त्यात बाकी काहीही घालू नका) (पेढा मधला खवा पोळी शेकतान्ना वितळ्तो)कणकेची पारि करुन त्यात गोळा ठेऊन मोदका सारखे बन्द करावे

  2. 2

    सारण भरलेला कणकेचा गोळा आत्ता हलक्या हातानी लाटून घ्या व तव्यावर तुप घालून दोन्ही बाजुनी छान भाजुन घ्या. व गरम गरम नैवेद्य च्या ताटात वाढून गुरुंंना नैवेद्य दाखवावा..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
रोजी
नागपुर

टिप्पण्या

Similar Recipes