ज्वारी मक्का मुठीये (jwariche makka muthiye recipe in marathi)

Sarita B.
Sarita B. @cook_23569819

लोकडाऊन असल्यामुळे घरगुती साहित्य वापरून काहीतरी पौष्टिक आणि नवीन पदार्थ घरच्यांना खाऊ घालायची बरीच इच्छा होती. कमी वेळात आणि झटपट तयार होणारी ही माझी पहिलीच रेसिपी आहे. चलातर मग बनवूया ज्वारी मक्का चे मुठीये.

ज्वारी मक्का मुठीये (jwariche makka muthiye recipe in marathi)

लोकडाऊन असल्यामुळे घरगुती साहित्य वापरून काहीतरी पौष्टिक आणि नवीन पदार्थ घरच्यांना खाऊ घालायची बरीच इच्छा होती. कमी वेळात आणि झटपट तयार होणारी ही माझी पहिलीच रेसिपी आहे. चलातर मग बनवूया ज्वारी मक्का चे मुठीये.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20-25 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 1 वाटीमक्याचे दाणे
  2. 1 वाटीज्वारीचं पीठ
  3. 1/2 वाटीकणिक
  4. 2हिरव्या मिरच्या
  5. 2 ते 3 चम्मच तिखट
  6. 1/2 चम्मचहळद
  7. चवीनुसारमीठ
  8. 1 चम्मचधणे जिरेपूड
  9. 2 चम्मचतेल
  10. चिमूटभरखाण्याचा सोडा
  11. 2 चम्मचलोणचे रसा
  12. फोडणीसाठी
  13. 1 चम्मचमोहरी
  14. 2 चम्मचतेल
  15. 2लाल मिरच्या
  16. 1 चम्मचतीळ

कुकिंग सूचना

20-25 मिनिटे
  1. 1

    प्रथम मिक्सरमधून मक्याचे दाणे वाटून घ्या. त्यात ज्वारीचं पीठ, कणिक टाकून मिक्स करून घ्या. आता त्यात तेल, तिखट, मीठ, हळद, धणेजिरे पूड, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, लोणच्याचा रस्सा, चिमूटभर खाण्याचा सोडा घालून मिक्स करून घ्या.

  2. 2

    आता एक प्लेटला तेल लावून त्यामध्ये तयार केलेले मिश्रण हाताने पसरवून स्टीमर किंवा कूकर मध्ये वाफवून घ्या आणि कापून घ्या.

  3. 3

    एका कढई मध्ये तेल घालून त्यात मोहरी, लाल मिरच्या, तीळाची फोडणी द्या आणि फोडणी मध्ये ज्वारीचे वाफविलेले काप घालून मिक्स करून घ्या. तयार आहे आपले स्वादिष्ट ज्वारी-मक्का मुठीये. सॉस किंवा चटणी सोबत गरमागरम सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sarita B.
Sarita B. @cook_23569819
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes