खानतोळी (barfi recipe in marathi)

Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
मुंबई

#रेसिपीबुक
#week3
#नैवेद्य
आज मी खानतोळ्या बनवल्या ज्या आम्ही कोकणात गणेश चतुर्थीला बनवितो. गणपतीला सात दिवस गोडाचा नैवैद्य असतो. मग पहिल्या दिवशी मोदक असतात आणि मग दुसऱ्या दिवशीपासून वेगवेगळ्या प्रकारचे गोड पदार्थ नैवेद्यात असतात. जसे की मालपूआ, खानतोळ्या, रव्याची खीर तर कधी शेवयांची खीर, पातोळ्या, रबडी, असे बरेच पदार्थ आम्ही बनवत असतो मग आदल्या दिवशीपासूनच दुसऱ्या दिवशी काय गोड बनवायचे त्याची चर्चा चालू असते. या खानतोळ्या थापताना हळदीच्या पानावर थापल्या तर त्याला हळदीच्या पानांचा वासही मस्त लागतो. रवा बारीक वापरायचा असेल तर पाणी कमी वापरा नाहीतर पिठासारखा लागतो. तर असा हा नैवेद्य आम्ही बाप्पाला दाखवतो...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिनिटे
६ जण
  1. १५० ग्राम जाडा रवा
  2. 1 टेबलस्पूनतूप
  3. १५० ग्राम गुळ
  4. ४००-४५० मिली पाणी
  5. 1/4 कपओलं खोबरं
  6. 1/2 टीस्पून वेलचीपूड
  7. 1/2 टीस्पून हळद
  8. सजावटीसाठी
  9. 1 टेबलस्पूनओलं खोबरं व चेरी

कुकिंग सूचना

१५ मिनिटे
  1. 1

    प्रथम एका गॅसवर पातेल्यात पाणी गरम करायला ठेवा. दुसरीकडे कढईत तूप घालून रवा चांगला भाजुन घ्या. रवा भाजला की ओलं खोबरं घालून परता.

  2. 2

    नंतर गुळ घालून गरम पाणी थोडं थोडं घालून ढवळा.(गरम पाणी घालताना मिश्रणाचे थेंब उडतात त्यामुळे सांभाळून घाला). हळद घालून एकजीव करा. झाकण ठेवून मंद आचेवर शिजू द्या.

  3. 3

    झाकण काढून बघा रवा चांगला फुललेला दिसेल मग त्यावर वेलचीपूड घाला. एकजीव करा. ताटाला तूप लावून घ्या. मिश्रण ताटात काढून पसरून पेल्याला खाली तूप लावून थापून घ्या. सुरीने वड्या कापा.

  4. 4

    प्लेट मध्ये काढून सजवा वरून खोबरं पेरा चेरीने सजावट करा. तयार आहे बाप्पासाठी गोड नैवेद्य खानतोळी...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
रोजी
मुंबई

Similar Recipes