इंस्टंट उत्तपम (instant uttapam recipe in marathi)

Chetana Bhojak
Chetana Bhojak @chetnab_26657014
मुंबई

#GA4
#week1
#उत्तपम
गोल्डन एप्रिल फोर च्या पझल मध्ये Uttapam हा कीवर्ड बघून रेसिपी बनवली.
हा मूळ पदार्थ भारतातील दक्षिण भागातला फेमस असा हा नाश्त्याचा प्रकार आहे जो भारतभर सगळीकडेच खूप आवर्जून खाल्ला जातो. बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या मापाने उत्तपम तयार केले जातात दक्षिण मध्ये उत्तपम बनवण्याचे बरेच प्रकार आहे. त्यातलाच एक इन्स्टंट असा रव्याचा उत्तपम हा प्रकार आहे जो झटपट तयार होतो सकाळचा नाश्ता, रात्रीच्या जेवणात घेता येतो
तसा हा नाश्त्याचा प्रकार खूप पौष्टिक आहे
रवा, ताख ,भाज्या वापरून तयार केलेला हा उत्तपम चा प्रकार आहे . मी जेव्हा शाळेत होती तेव्हाच हा प्रकार घरच्यांना बनून खूप खाऊ घालायची तेव्हा या पदार्थाला मी उत्तपम न बोलता मी याला कुलचा असं बोलून खाऊ घालायची. मग बऱ्याच वर्षा नंतर कळले की हा तर उत्तपम चाच प्रकार आहे मी या बॅटर पासून आप्पे हि तयार करायची नवीन नवीनच तयार करायला शिकली होती तर भरपूर बनवायची आलेल्या घरातल्या प्रत्येक पाहुण्यांना बनवून खाऊ घालायची आई खूप कौतुक करून सगळ्यांना सांगायची नवीन नवीन पदार्थ शिकत आहे
तर बघा खाऊन कसे झाले, ज्यांनी हि खाल्ले त्यांनी शिकूनही घेतले . आज हे सगळं लिहिताना आठवताना मला स्वतःलाही आनंद होत आहे कि आपण किती नवीन नवीन प्रयत्न करून किती डिशेश तयार केल्या आहे
तर बघूया इंस्टंट रवा उत्तपम रेसिपी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिट
3 व्यक्ती
  1. 1-1/2 कपबारीक रवा
  2. 1-1/2 कपतांदुळाचे पीठ
  3. 500 मि.लिअमूल ताख
  4. मीठ चवीनुसार
  5. 1/2 टेबलस्पूनजीरे
  6. 1/2 टेबलस्पूनखाण्याचा सोडा
  7. 1कांदा कट केलेला
  8. 1टोमॅटो कट केलेला
  9. 2हिरव्या मिरच्या कट केलेल्या
  10. 1शिमला मिरची कट केलेली
  11. कोथिंबीर बारीक कट केलेली
  12. तेल उत्तपम तयार करण्यासाठी

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    एका पातेल्यात दिल्याप्रमाणे रवा आणि तांदळाचे पीठ टाकून घेऊ,दिल्याप्रमाणे सगळे साहित्य तयार करून घेऊ

  2. 2

    दिल्या प्रमाणे ताख पूर्ण टाकून विस्करने पीठ आणि ताक एकत्र मिक्स करून बॅटर तयार करून घेऊ, मीठ टाकून घेऊ
    पंधरा-वीस मिनिट बॅटर झाकून भिजून घेऊ

  3. 3

    बॅटर जास्त जाड वाटल्यास थोडे पाणी टाकून बॅटर तयार करून घेऊ, दिल्या प्रमाणे भाज्या टाकून बॅटर मध्ये मिक्स करून घेऊ,सोडा, जीरे टाकून बॅटर मध्ये मिक्स करून घेऊ

  4. 4

    नॉनस्टिक तव्यावर तेल टाकून तयार बॅटर खोल चमच्याने जाड टाकून उत्तपम तयार करून घेऊ
    दुसऱ्या साईड नेही उत्तप्पा शेकून घेऊ

  5. 5

    तयार उत्तप्पा हिरव्या चटणीबरोबर सर्व करू

  6. 6
  7. 7
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Chetana Bhojak
Chetana Bhojak @chetnab_26657014
रोजी
मुंबई
Cooking is an art which touches heart and lives across the globe with all mankind.Follow my page on Instagram_cuisine _culture _
पुढे वाचा

Similar Recipes