उपवासाचे मेदूवडे (upwasache medu vada recipe in marathi)

Prachi Manerikar
Prachi Manerikar @cook_21120435

#रेसिपीबुक week3
#नैवेद्य
उपवास म्हटलं की साबुदाण्याची खिचडी किंवा वरी तांदूळ फार फार तर बटाट्याची भाजी हेच माहीत असत पण सध्या यु ट्यूब मुळे बरेच नवीन प्रकार बघायला आणि शिकायला मिळतात त्यातलाच हा एक प्रयोग सुफळ संपन्न

उपवासाचे मेदूवडे (upwasache medu vada recipe in marathi)

#रेसिपीबुक week3
#नैवेद्य
उपवास म्हटलं की साबुदाण्याची खिचडी किंवा वरी तांदूळ फार फार तर बटाट्याची भाजी हेच माहीत असत पण सध्या यु ट्यूब मुळे बरेच नवीन प्रकार बघायला आणि शिकायला मिळतात त्यातलाच हा एक प्रयोग सुफळ संपन्न

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
5 जण
  1. 2 कपप्रत्येकी साबुदाणा पीठ,वरी तांदूळ पीठ
  2. 1 कपदही
  3. 1 कपउकडलेला बटाटा किस
  4. आवडी नुसार तिखट मीठ आणि साखर
  5. 1लिंबू रस
  6. 1 चमचाजिर
  7. तळायला तेल
  8. चटणी साठी
  9. 1नारळ
  10. आवडीनुसार कोथिंबीर, मिरची,मीठ,साखर

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    प्रथम दोन्ही पीठ एकत्र करावी त्यात सर्व साहित्य घालून एकत्र करावे जितके पीठ असेल त्यापेक्षा एक कप जास्त पाणी घेऊन तयार मिश्रण पाण्यात घालून एक वाफ काढावी

  2. 2

    वाफ काढून घेतल्यावर मिश्रण परातीत घेऊन पूर्ण थंड करावे तोपर्यंत खोबऱ्याची चटणी करून घ्यावी

  3. 3

    मिश्रण थंड झल्यावर त्यात बटाटे किसून घालावे आणि मिश्रण एकत्र करावे तुपाचा हात घेऊन वडे थापून घेऊन गरम तेलात किंवा तुपात तळावे तळताना तेल कडक गरम करून घ्यावे वडे सोडताना गॅस पूर्ण मंद आचेवर करावा वडे सोडून 5 मिनिटे झाल्यावर परतावे लगेच चमचा लावू नये कढईत चिकटतात त्यामुळे सांभाळून तळावे गरमागरम वडे चटणी सोबत सर्व्ह करावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Prachi Manerikar
Prachi Manerikar @cook_21120435
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes