शेंगदाणे कतली (shengdanychi katali recipe in marathi)

Arati Wani
Arati Wani @cook_24234333
Aurangabad

#रेसिपीबुक #week3
एकादशीच्या दुसऱ्या दिवशीही आमच्याकडे देवाला नैवेद्य दाखवतात .आज ही शेंगदाणे कतली करून बघितली अगदी सोपी आणि पटकन होते.

पुढे वाचा
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

१५ मिनिटे
४/५
  1. १०० ग्राम शेंगदाणे भाजून साल काढलेले
  2. ५० ग्राम साखर
  3. ३-४ टेबलस्पून मिल्क पावडर
  4. पाणी आवश्यकतेनुसार
  5. सजावटीसाठी चांदीचा वर्ख

कुकिंग सूचना

१५ मिनिटे
  1. 1

    प्रथम साल काढलेले शेंगदाणे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे. नंतर शेंगदाणे कूट आणि मिल्क पावडर मिक्स करून ठेवावे.

  2. 2

    नंतर कढईत साखर घेऊन त्यात साखर भिजेल इतपतच पाणी टाकावे.नंतर दोन तारी पाक होऊ द्यावे. त्यात लगेचच वरील मिश्रण टाकून द्यावे. गोळा होईपर्यंत परतून घ्यावे.थोडे थंड होईपर्यंत कढईत च राहू द्यावे.

  3. 3

    नंतर सारण थोडे कोमट असतानाच प्लास्टिक पिशवीला थोडा तूपाचा हात लावून गोळा लाटुन त्यावर चांदीचा वर्क लावून वड्या पाडावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

टिप्पण्या (4)

Anita Desai
Anita Desai @cook_20530215
मी पण करुन बघणार तुमची रेसीपी

यांनी लिहिलेले

Arati Wani
Arati Wani @cook_24234333
रोजी
Aurangabad

Similar Recipes