केशर बदाम कतली

Deepa Gad
Deepa Gad @cook_19334649

#फ्रुट
मला व माझ्या मुलीला काजू कतली खूप आवडते. तेव्हा बदाम कतली करायची कल्पना आली आणि ती अमलातही आणली. बदाम कतली मी पहिल्यांदा गेल्यावर्षी रक्षाबंधनला बनविली होती तेव्हा सर्वांना खूप आवडली. आज तुमच्यासाठी खास......

केशर बदाम कतली

#फ्रुट
मला व माझ्या मुलीला काजू कतली खूप आवडते. तेव्हा बदाम कतली करायची कल्पना आली आणि ती अमलातही आणली. बदाम कतली मी पहिल्यांदा गेल्यावर्षी रक्षाबंधनला बनविली होती तेव्हा सर्वांना खूप आवडली. आज तुमच्यासाठी खास......

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२०-२५ मिनिटे
  1. १५० ग्राम बदाम (१ कप)
  2. १ कप पिठीसाखर
  3. १ टे स्पून तूप
  4. ३/४ कप दूध
  5. केशरमिश्रित दूध
  6. वेलचीपूड
  7. पाणी
  8. सजावटीसाठी केशर, बदाम, पिस्ता

कुकिंग सूचना

२०-२५ मिनिटे
  1. 1

    पातेल्यात पाणी गरम करून त्यात बदाम घालून १५ मिनिटे ठेवा. नंतर सहजपणे सोलून घ्या.

  2. 2

    सोललेले बदाम थंड पाण्यात १० मिनिटे ठेवा. नंतर मिक्सरमध्ये बदाम व दुध घालुन बारीक पेस्ट करून घ्या.

  3. 3

    पॅनवर तूप घालून बदामाची पेस्ट घाला. पिठीसाखर घाला.

  4. 4

    पूर्णपणे आळेपर्यंत शिजवा. शिजले की गोळा व्हायला लागेल.

  5. 5

    गोळा व्हायला लागले की बटर पेपरला तूप लावून त्यात हा गोळा घाला. थंड होवू द्या.

  6. 6

    नंतर गोळा थापून त्यावर दुसरा बटर पेपर ठेवा लाटून घ्या. डायमंड शेप मध्ये कापा. फ्रीझमध्ये १/२ तास सेट करा.

  7. 7

    केशर बदाम व पिस्त्याचे काप घाला, खायला तयार केशर बदाम कतली

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Deepa Gad
Deepa Gad @cook_19334649
रोजी

Similar Recipes