पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)

Archana Pawar
Archana Pawar @cook_24574830

फॉझिटीविटी #पुरणपोळी
कॅप्शन वाचून कदाचित थोडे वेगळे वाटेल पण ते कसे..... कोणताही सण असो पुरणपोळी चा मान पहिला!
पुरणपोळी या शब्दात च इतकी एनर्जी आहे की आजही कित्येक स्त्रिया पुरणपोळी बनवायची म्हटले की लवकर उठतात 😆
पण हल्ली काहींना पुरणपोळी बनवायच्या आधीच धाकधूक असते पुरण पातळ होईल का, करताना फुटेल का, आज मैैदा घालून पहाते...
असे असंख्य निगेटिव्ह विचार करून शेवटी बेत फसतो 😳
ज्या प्रमाणे प्रसादाचा शिरा उत्तमच बनतो का, तर तो सोपा आहे म्हणून नव्हे ,तर तो बनवताना सात्विक विचार मनात असतात.
पुरणपोळी पोळी करताना फसण्याची थोडीफार भिती वाटत असेल तर मस्त मोबाईल वर आराध्य देवतेचे नामावली लावा छान वातावरण निर्मिती होईल मन प्रसन्न होईल व कधी मउ लुसलुशीत पुरणपोळी बनतील कळणार देखील नाही ☺प्रत्येक गोष्ट आधी मनाने स्विकीरली ना की पुढचे सगळे सोपे होऊन जाते
(कदाचित कोणाला हे पटणार नाही 👆)
असो...बर ही पुरण पोळी गुणकारीही तितकीच बरका !!
शुद्ध तुपासोबत खाल्ली,की वातदोष व पित्तदोष शमविते.
पण फास्ट फूड च्या जमान्यात आपले पारंपरिक पदार्थ बनवा, खाउ घाला, व पुढच्या पिढीलाही शिकवा 🙏
फक्त गव्हाच्या पुरणपोळी च्या काही टिप्स् ...
पीठ ० नंबर च्या चाळणीने चाळून घ्यावे
पीठ सैलसर १० मिनिटे मळून मळून घ्यावे १ तास झाकून ठेवा
मैद्याच्या तुलनेत यात ग्लूटेन चे प्रमाण फार कमी असते जास्त वेळ मळलेल्याने पिठाला एकप्रकारे चिकटपणा येतो
उंड्यात पुरण भरण्यापूर्वी पारीला आतून तूप लावा म्हणजे पुरण सर्वत्र पसरते
पोळी बनण्यापूर्वी पीठाला तेल व मीठ लावून मऊ करा, काहीही करून पोळी फाटतच असेल तर १ , २ तास पीठ फ्रिजला ठेवा
गव्हाची पोळी नाजूक बनते सावकाश लाटा व हळुवार पलटा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१ तास
३जणांसाठी
  1. गव्हाचे पीठ, पाणी, तेल, गुळ, तूप, वेलची, चणाडाळ

कुकिंग सूचना

१ तास
  1. 1

    ३/४ तास चणाडाळ भिजवा व मऊ शिजवा गुळ,वेलची घालून सुके होईपर्यंत परता व बारीक वाटून घ्या पूरण तयार

  2. 2

    गव्हाचे पीठ, मीठ घालून १० मिनिटे सैलसर मळून १ तास झाकून ठेवा १ तासाने पुन्हा ३ च. तेल २ चिमूट मीठ घालून पीठ मऊ करा

  3. 3

    पीठाची पारी बनवून आतून तूपाचा हात लावा पुरण भरून पोळी सावकाश लाटा सारखी पलटी न करता तुपावर भाजा पुरणपोळी तयार

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Archana Pawar
Archana Pawar @cook_24574830
रोजी

Similar Recipes