पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)

Prachi Phadke Puranik
Prachi Phadke Puranik @cook_24245173_PP

#रेसिपीबुक #week11 पुरणपोळी हा महाराष्ट्रात बनणारा एक गोड व महत्त्वाचा खाद्यपदार्थ आहे. महाराष्ट्रात होळी, बैल-पोळा, श्रावणी शुक्रवार इत्यादी सणांच्या दिवशी पुरणपोळी करतात. याशिवाय दिवाळीच्या लक्षमीपूजनाला किंवा नवरात्रीतील नवमीला सुद्धा पुरण पोळीचे महत्त्व आहे. विशेषत: होळीला घरोघरी पुरणपोळी केली जाते. पुरणपोळी ही गुळवणी, तूप आणि दूध तसेच कटाच्या आमटीबरोबर खाल्ली जाते. धामि॔क पंरपंरेत पुरणपोळीला फार महत्त्व आहे. लहान मुले आणि वयोवृद्ध लोक सुद्धा पुरण पोळी आवडीने खातात .
तसेच गणपती बरोबर गौरी आल्या की त्यांनाही पुरणपोळी लागतेच. म्हणून खास गौरींसाठी हा पुरणपोळीचा नैवेद्य.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१ तास
3 सर्व्हिंगज
  1. पारीसाठी
  2. 1 कपकणिक
  3. 4 टीस्पूनतेल
  4. 1/4 टीस्पूनमीठ
  5. पाणी आवश्यकतेनुसार
  6. पुरणासाठी
  7. 1 कपचणाडाळ
  8. 1 कपचिरलेला गुळ
  9. 2 टीस्पूनसाजूक तुप
  10. 1 टीस्पूनवेलची पावडर
  11. 1 टीस्पूनजायफळ पावडर

कुकिंग सूचना

१ तास
  1. 1

    प्रथम चणाडाळ स्वच्छ धुवून मग पाणी घालून कुकरमधे शिजवून घ्यावी. शिजलेली चणाडाळ चांगली घोटून घ्यावी म्हणजे त्यात अख्खी डाळ राहणार नाही असे पाहावे.

  2. 2

    आता एका कढईत साजूक तुप घेऊन ते गरम झाल्यावर त्यात घोटलेली चणाडाळ घालावी आणि गुळ घालावा. मंद आचेवर मिश्रण शिजवून घ्यावे.

  3. 3

    मिश्रण मधेमधे हलवत राहावे म्हणजे ते चिकटणार नाही. गोळा होईपर्यंत परतावे. चमचा उभा राहिला की पुरण तयार. गार झाल्यावर गोळा करुन घ्यावा.

  4. 4

    आता पोळ्यांसाठी भिजवतो त्यापेक्षा सैल कणिक भिजवून घ्यावी. आणि वरून तेल घालून ठेऊन द्यावी.

  5. 5

    कणकेची लाटी घेऊन त्यात पुरण भरावे. आणि हलक्या हाताने पुरणपोळी लाटावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Prachi Phadke Puranik
Prachi Phadke Puranik @cook_24245173_PP
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes