कश्मिरी दम आलू (kashmiri dum aloo recipe in Marathi)

Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
नागपुर

#रेसिपीबुक
#week4
#माझे आवडते पर्यटन स्थळ
जस जसे श्रीनगर जवळ येवू लागले तस तसा हिमालयाच्या त्या बर्फाच्छादीत हिम शिखरांना पाहून मन मोहीत होवू लागले व आम्ही सायंकाळी श्रीनगर विमानतळावर उतरलो, व आम्ही आमच्या पुर्व आरक्षीत दल लेक मधील हाऊसबोट कडे रवाना झालो तोपर्यंत सुर्यदेव विसावले होते व एक लालसर निळे आकाश आम्हाला दल झील सोबत खुणावू लागले ते लालसर आकाश त्या झील च्या पाण्यात पाहतांना जणू निसर्गाने आपल्यासाठी रेड कार्पेट अंथरल्याचा अनुभव घेत कश्मीरची खासियत असणाऱ्या शिकाऱ्यातून आम्ही हाऊसबोटवर पोहचलो,कश्मीरी कलाकुसरीचा अप्रतीम नमुना असलेली ती हाऊसबोट म्हणजे जणू पाण्यावर तरंगणारे पंचतारांकीत हाॅटेलच होते बोटच्या दिवाणखान्यातील प्रत्येक वस्तू कश्मीरच्या समृध्दतेची साक्ष देत होते.आम्ही सर्वजण थोडे सेट झाल्यावर सर्वांसमोर कश्मीरी पेय काहवा आले
काहवा पिताच दिवसभरातील सर्वांचा शीण लागलीच दूर झाला व सर्व ताजेतवाने झाले, गप्पांच्या ओघातच एक दिड तासांनी आवाज आला 'साहब खाना लगा है सब आईये'
ईतक्या आत्मियतेने बोलावणे आल्यावर आम्ही डायनिंग टेबलवर जेवायला बसलो तर सर्वच थकले आहेत हे बघून त्या केअरटेकरने खुप हेव्ही जेवण न बनवता खास कश्मीरी पद्धतीने बनवलेला असा साधा च मेन्यू ठेवलापण त्यातील दम आलूची भाजी बघूनच तोंडाला पाणी सुटले होते तीचा तो सुवास पोटातील भुक वाढवत होता चला आज प्रत्येक कश्मिरी घराघरात होणारी साधी सरळ दम आलू ची रेसिप

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 ते 40 मिनिट
4 सर्व्हिंग्ज
  1. 500 ग्रॅमबटाटे
  2. 2 टेबलस्पूनबडीशोप पावडर
  3. 1 टेबलस्पूनदालचिनी पावडर
  4. 1 टीस्पूनकश्मिरी मसाला
  5. 2 टीस्पूनकश्मिरी तिखट
  6. 2 टेबलस्पूनतेल
  7. 1 टीस्पूनमसाला वेलची,वेलची,लवंग जाडसर पुड

कुकिंग सूचना

30 ते 40 मिनिट
  1. 1

    प्रथम बटाटे उकडून घ्यावे व त्याला तूथपिक नी आरपार टोचे द्यावे व तेलात छान सोनेरी तळून काढावे.

  2. 2

    बटाटे तळलेल्या तेलातच सर्व मसाला जसे जीरे हिंग, मसाला वेलची वेलची आणी लवंग ची जाडसर पुड, कश्मिरी तिखट, बडीशोप पावडर, दालचिनी पावडर, घालुन छान एकजीव करा व त्यात तळलेले बटाटे घालुन मसाल्यात परता व सगळे बटाटे कुकर मधे ओतावे व मसाला वाली कढई पाण्याने निपटून ते पाणी कुकर मधे घालावे

  3. 3

    आत्ता त्यात मिठ घालुन कुकर ला झाकण लावुन दोन शिट्टी करुन घ्या. थंड झाला की झाकण उघडून त्यात धणे पूड व कश्मिरी मसाला घालावा व लागल्यास थोडे पाणी घालुन दहा मिनिट उकळून घ्यावे व पराठा सोबत गरम गरम सर्व्ह करावे काश्मिरी दम आलू

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
रोजी
नागपुर

टिप्पण्या

Similar Recipes