दाल तडका (daal tadka recipe in marathi)

Tejashree Jagtap
Tejashree Jagtap @cook_24883861

आज मी दाल तड़का बनवले ती रेसिपी मी तुम्हाला शेअर करते. काही जणांना, दाल तडका आणि दाल फ्राय वेगवेगळे वाटते. पण दाल तडकामध्ये, डाळ बनवून वरून फोडणी घालतात. या फोडणीत लसूण आणि कढीपत्ता घातल्याने तेलाचा सुगंधित तवंग डाळीवर राहतो. दाल फ्रायमध्ये आधी फोडणी तयार करून त्यात कांदा, टोमॅटो परतून त्यावर डाळ फोडणीस घालतात. दाल तडक्याप्रमाणे दाल फ्रायमध्ये वरून फोडणी घालत नाहीत.दोन्ही प्रकार खुपच चविष्ट लागतात तसेच दोन्हीमध्ये अगदीच थोडा फरक आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनीटे (शिजवलेली डाळ तयार असल्यास)
3-4 सर्व्हिंग्ज
  1. 1/4 कपतूर डाळ
  2. 1/4 कपमसूर डाळ
  3. 2छोटे टोमॅटो बारीक चिरुन
  4. 1कांदा बारीक चिरुन
  5. 4लसुण पाकळी बरीक काप करुन
  6. 4/5कढीपत्ता पान
  7. 2सुक्या लाल मिरच्या
  8. 1हिरवी मिरची बारीक चिरून
  9. 1/2 इंचआले बारीक चिरून
  10. कोथिंबीर बारीक चिरलेली
  11. 2 टिस्पून साजूक तूप
  12. 2 टिस्पून तेल
  13. 1 टिस्पूनजिरे
  14. 1 टिस्पून लाल मिरची पावङर
  15. तडक्यासाठी
  16. 3 टिस्पून साजूक तूप
  17. 1 टिस्पून लाल मिरची पावडर
  18. 1/4 टिस्पून हिंग
  19. 1/2 टिस्पून जिरे
  20. 4/5कढिपत्ता पान
  21. 2लाल मिरच्या

कुकिंग सूचना

15 मिनीटे (शिजवलेली डाळ तयार असल्यास)
  1. 1

    प्रथम तूरडाळ आणि मसूर डाळ धूवून प्रेशर कूकरमध्ये 3 ते 4 शिटया करून मऊसर शिजवून घ्यावी. व्यवस्थित शिजली कि घोटून घ्यावी.

  2. 2

    मग कढ़ाई मध्ये 2 टिस्पून साजूक तूप, 2 टिस्पून तेल टाकून गरम झाल्यावर त्यात जिरे हिरवी मिरची, आल आणि लसुण बारीक केलेले आणि 2 सुक्या लाल मिरच्या, बारीक चिरलेला कांदा घालावा. गोल्डन ब्राऊन रंगावर परतावा. टोमॅटो घालून मऊसर होईस्तोवर परतावे. 1 टिस्पून लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ टाकुन परतुन घ्या.

  3. 3

    नंतर घोटलेली डाळ घालावी. कोथिंबीर आणि गरजेपुरते पाणी घालावे. दाल तडका थोडा घट्टसरच असतो त्यामुळे पाणी बेताचे घालावे. उकळी येऊ द्यावी.

  4. 4

    डाळ सर्व्हींग बाउलमध्ये काढावी. कढल्यात 3 टिस्पून तूप गरम करावे त्यात 1 टिस्पून जिरे, 2 लाल मिरची, 1/4 टिस्पून हिगं, 4/5 कढीपत्ता पान ह्या सगळ्या जिन्नसाचा तडका द्यावा आणि हा तडका तयार डाळीवर घालावी. गरम गरम जिरा राईस वर सर्व्ह करावा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Tejashree Jagtap
Tejashree Jagtap @cook_24883861
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes