दाल तडका (daal tadka recipe in marathi)

Vasudha Gudhe
Vasudha Gudhe @vasudha_sg

#लंच
#दालतडका
दाल तडका ही भारतीय रेस्टॉरंट मध्ये मिळणारी डिश.... कधीही, केव्हाही, कोठेही... इझीली अवेलेबल...
उत्तर असो वा दक्षिण दाल तडका इज ऑलवेज हिट...
पौंढान पासून ते लहान पर्यत,सर्वांची पहिली पसंती... *दाल तडका*💃 💕

दाल तडका (daal tadka recipe in marathi)

#लंच
#दालतडका
दाल तडका ही भारतीय रेस्टॉरंट मध्ये मिळणारी डिश.... कधीही, केव्हाही, कोठेही... इझीली अवेलेबल...
उत्तर असो वा दक्षिण दाल तडका इज ऑलवेज हिट...
पौंढान पासून ते लहान पर्यत,सर्वांची पहिली पसंती... *दाल तडका*💃 💕

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटे
चार व्यक्ती साठी
  1. 1/2 कपतूरीची डाळ
  2. 4-5हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
  3. 1/2 टेबलस्पूनधनेपावडर
  4. 1/2 टेबलस्पूनजिरापावडर
  5. 1/2 टीस्पूनहिंग
  6. 1/2 टीस्पूनहळद
  7. 1/2 टीस्पूनमोहरी
  8. 1/2 टीस्पूनजीरे
  9. 5-6कढीपत्त्याची पाने
  10. 1/4 कपकोथिंबीर
  11. 1/4 कपपातीचा कांदा बारीक चिरलेला
  12. 1मोठा टोमॅटो बारीक चिरलेला
  13. 1 टेबलस्पूनआले लसुण पेस्ट
  14. 1 टेबलस्पूनगोंडा मसाला
  15. 5-6 टेबलस्पूनतेल
  16. 4-5सुक्या लाल मिरच्या
  17. मीठ चवीनुसार
  18. पाणी आवश्यकतेनुसार

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    तुरीची डाळ स्वच्छ पाण्याने दोन-तीन वेळा धुऊन घ्यावी. कुकरला दोन तीन शिट्ट्या देऊन डाळ शिजवून घ्यावी.

  2. 2

    पॅनमध्ये तेल घालावे. तेल गरम झाले की त्यात, जीरे, मोहरी, कढीपत्ता, आले लसून पेस्ट, बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून नीट परतून घ्यावे. त्यानंतर त्यात धने पावडर, जिरापावडर, हळद घालावी व एक मिनिट होऊ द्यावे.

  3. 3

    शिजवलेली डाळ यात घालावी. डाळीमध्ये थोडे पाणी घालून चांगले मिक्स करून घ्यावे. त्यानंतर त्यात टमाटर व पातीचा कांदा घालावा. एक मिनिट होऊ द्यावे. गरम मसाला व मीठ घालून डाळीला उकळी काढून घ्यावी. कोथिंबीर घालावी. व गॅस बंद करावा.

  4. 4

    तडका पॅनमध्ये तेल घाला. तेल चांगले गरम झाले की, त्यामध्ये जीरे, मोहरी, हिंग,हळद, लाल सुक्या मिरच्या घालाव्यात. चांगले होऊ द्यावे. व हा तडका डाळी वरती घालावा.

  5. 5

    कोथिंबीर घालून गरमागरम दाल तडका भातासोबत किंवा चपाती सोबत सर्व्ह करावा.. 💃 💕

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Vasudha Gudhe
Vasudha Gudhe @vasudha_sg
रोजी

Similar Recipes