सांजा ची पोळी (sanja chi poli recipe in marathi)

Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
नागपुर

#श्रावण
श्रावणाच्या आनंदवारीत आज आला शनिवार
दीनदुखितांची करा सेवा सांगे संपत शनिवार.
उपासना करु मारूतीची शक्तिचा जागर
आवडत्या श्रावणात आला नागपंचमी सण
नागांचे करण्या रक्षण पूजा करू प्रतिकांची.
राखा सुंदर पर्यावरण शिकवण संस्कृतीची.
घरोघरी असे फुलोरा दुधलाहीचा प्रसाद भला
नागपंचमी करू साजरी उधाण आले आनंदाला.
ऊंच ऊंच झोके घेऊ खेळ खेळू आनंदात
झिम्मा फुगडी खेळू मनातल्या मनात.
आज आमच्या कडे नैवेद्यला सांजा ची पोळी करतात. तिच मी तुम्च्या साठी घेउन आली आहे

सांजा ची पोळी (sanja chi poli recipe in marathi)

#श्रावण
श्रावणाच्या आनंदवारीत आज आला शनिवार
दीनदुखितांची करा सेवा सांगे संपत शनिवार.
उपासना करु मारूतीची शक्तिचा जागर
आवडत्या श्रावणात आला नागपंचमी सण
नागांचे करण्या रक्षण पूजा करू प्रतिकांची.
राखा सुंदर पर्यावरण शिकवण संस्कृतीची.
घरोघरी असे फुलोरा दुधलाहीचा प्रसाद भला
नागपंचमी करू साजरी उधाण आले आनंदाला.
ऊंच ऊंच झोके घेऊ खेळ खेळू आनंदात
झिम्मा फुगडी खेळू मनातल्या मनात.
आज आमच्या कडे नैवेद्यला सांजा ची पोळी करतात. तिच मी तुम्च्या साठी घेउन आली आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40 मिनिट
4 सर्व्हिंग्ज
  1. 125 ग्रॅमगहू सोजी/दलिया
  2. 125 ग्रॅमकिसलेला गूळ
  3. 50 ग्रॅमसाखर
  4. 380 ग्रॅमपाणी
  5. 1 टीस्पूनजायफळ वेलची पूड
  6. पारि साठी
  7. 200 ग्रॅमकणिक
  8. 1 टीस्पूनतेल
  9. 1/4 टीस्पूनमीठ
  10. 50 ग्रॅमपाणी
  11. 2 टेबलस्पूनसाजुक तुप

कुकिंग सूचना

40 मिनिट
  1. 1

    प्रथम पारि साथी कणिके मधे तेल मिठ घालुन गोळा
    मळुन घ्या. जर्मन च्या भण्ड्यात थोडे तुप घालुन सोजी भाजुन घ्या व बाजुला काढुन ठेवा.

  2. 2

    आत्ता त्याच भण्ड्यात पाणी घेउन गरम करा व भाजलेलि सोजी घालुन ढवळुन घेउन झाकण लावुन दहा मिनिट शिजायला ठेवा पानी आटले असेल आणी सोजी नसेल शिजली तर थोडे पाणी घालू शकता व अजुन दोन मिनिट वाफ काढुन घ्या

  3. 3

    सोजी छान शिजली की त्या मधे गूळ व साखर घालावी व एकत्र करुन गूळ साखर विर्घळे पर्यंत वाफ आणावी व अधून मधून ढवळत रहावे व पाणी सुटत अस्ल्यास आणखी थोडे आटवून घ्या म्हणजे सोजी ला छान चिक्टावा येईल. नंतर गैस बन्द करुन सोजी चे मिश्रण थाळी मधे पसरून घ्यावे व जायफळ वेलची पूड घालुन एकजीव करुन घ्या.(ह्यालाच गोड सांजा असे म्हणतात)

  4. 4

    सांजा कोमट झाला की त्याचे छोटे छोटे गोळे करुन घेणे. आत्ता कणके ची पारि करुन त्यात सांजा चा गोळा भरून घेउन त्याची पातळ पोळी लाटा.

  5. 5

    ही पोळी दोन्ही बाजुनी थोडे साजुक तुप शेकून घ्या व तुपा सोबत सर्व्ह करावे गरम गरम सांजा पोळी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
रोजी
नागपुर

Similar Recipes