एप्पल पुडिंग (apple pudding recipe in marathi)

Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
नागपुर

#दुध
रेसिपी 1
!!दुध, दुध, दुध, दुध पियो ग्लास्स ऑफ़ फुल दुध!! आठवली ही अमूल दुध ची ऐडवर्टाइज़. आणी हे वाचतांना माझ्या सारखेच गुणगुणू लागलेत ना. दुध कसे स्वच्छ शुभ्र निर्मळ पौष्टिक असे सर्वच वयोगटातील लोकांना आवडणारे किंवा नसेल आवडत तरी दुग्धजन्य पदार्थ तर नक्किच आवडतात. दुधाचा मुळ धर्मच थंड... दुध हे कॉलशीयम चे एक मोठे स्रोत आहे. तसे नुसते दुध पिणार्यान्ची संख्या कमीच, दुधा मधे काही तरी मिक्स किंवा त्यावर काही प्रक्रिया केली जात नाही तो पर्यंत बर्याच झण्णाना दुध प्यायचा कन्टाळा येतो..
माझे ही तसेच व माझ्या मुलीचे ही.. दोघींना पण दुध जास्त आवडत नाही मग काय दूधावर प्रयोग करुन वेगवेगल्या रेसिपी करत असते त्यातलीच ही एक रेसिपी तुमच्या साठी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25 मिनिट व 2 तास फ्रीज़ मधे
4 सर्व्हिंग्ज
  1. 1/2 लीटरदुध
  2. 2 टेबलस्पूनकस्टर्ड
  3. 4 टेबलस्पूनमिल्कमेड
  4. 1 टीस्पूनवनिला ईसेंस
  5. 2मोठे सफरचंद
  6. 2 टीस्पूनशहद
  7. 1 टीस्पूनदालचीनी पावडर
  8. 1 टीस्पूनविलायची पावडर

कुकिंग सूचना

25 मिनिट व 2 तास फ्रीज़ मधे
  1. 1

    प्रथम सफरचंद धूउन घेउन सोलून घ्या व बारिक चिरुन घ्या आत्ता पॅन गरम करुन त्यात हे चिरलेले सफरचंद घाला व दोन मिनिट परता (लागल्यास एक टेबलस्पून पाणी घालू शकता) व नरम झाले की त्या मधे शहद दालचीनी पावडर व विलायची पावडर घालुन पुन्हा नरम होई पर्यंत परता.

  2. 2

    सफरचंद छान नरम झालेत की थंड होण्यास बाजुला ठेवावे. एकिकडे दुध गरम करण्यास ठेवावे व एक उकळी आली की मिल्कमेड घालुन ढवळुन घेणे. दोन तीन उकळी आणुन घ्या.

  3. 3

    आत्ता थोड्या दुधा मधे कस्टर्ड एकत्र करुन घ्या व उकळलेल्या दुधा मधे मिक्स करुन घेणे व एक उकळी आणुन गैस बन्द करुन घ्या. (पिठल्या सारखे घट्टसर येते)आत्ता ज्या बाउल मधे सर्व्ह करायचे असेल त्या बाउल मधे प्रथम शिजवलेले सफरचंद चे तुकडे घालावे.

  4. 4

    आत्ता त्या सफरचंदच्या तुकड्यांवर कस्टर्ड घाला. व दोन तास करिता फ्रीज़ मधे थंड करण्यास ठेवावे. दोन तासांनी कडून छान थंड सर्व्ह करावे एप्पल पुडिंग.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
रोजी
नागपुर

टिप्पण्या

Similar Recipes