मेथीचे लाडू (methiche ladoo recipe in marathi)

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564

#लाडू
अतिशय पौष्टिक मेथीचे लाडू थंडीत आवर्जुन केले जातात.पावसाळ्यात वातावरणात थंडावा असताना , बाळंतीण ,स्त्रियांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असे लाडू आहेत.

मेथीचे लाडू (methiche ladoo recipe in marathi)

#लाडू
अतिशय पौष्टिक मेथीचे लाडू थंडीत आवर्जुन केले जातात.पावसाळ्यात वातावरणात थंडावा असताना , बाळंतीण ,स्त्रियांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असे लाडू आहेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१०-१५ मिनीटे
८-१०
  1. 1/4 कपमेथीदाणे
  2. 1 कपतूप...आवश्यकतेनुसार कमी जास्त
  3. 1 कपगव्हाचे पीठ
  4. 1/4 कपफुललेला डिंक
  5. 1/4 कपखारीक पावडर
  6. 1/4 कपड्राय फ्रुट चे तुकडे
  7. 1/2 कपगूळ
  8. 4 टेबलस्पूनखसखस
  9. 1/4 कपकिसलेले खोबरे

कुकिंग सूचना

१०-१५ मिनीटे
  1. 1

    साहित्य घेतले.

  2. 2

    मेथीदाणे भाजून त्याची पूड करून तुपात रात्रभर भिजत ठेवली.डिंक तळून घेतला, कुस्करून घेतला.खसखस परतून घेतली.

  3. 3

    ड्राय फ्रुट थोड्या तुपात परतले,खोबरं किसून परतून घेतलं.गव्हाचे पीठ छान खमंग परतले.थोडे थोडे तूप घालून सोनेरी रंग येईपर्यंत परतले.त्यात खारीक पावडर घालून परतले.

  4. 4

    गुळ वितळवून घेतला, खसखस,खोबरं,ड्राय फ्रुट मिक्सर मधून बारीक केले.सगळे मिश्रण एकत्र करून आवश्यकतेनुसार तूप घालून छान मिक्स केले.

  5. 5

    सगळं मिश्रण एकत्र करून त्याचे छान लाडू वळून घेतले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564
रोजी

Similar Recipes