अमृतफळ (amrutphal recipe in marathi)

Aparna Nilesh
Aparna Nilesh @cook_Aparna9224
Mumbai

#shravanqueen

इटूकले पिटूकले असे हे अमृत फळ म्हणजे खरचं तोंडात टाकताच गुलाबजाम आणि जिलेबिची आठवण करून देतात... अशी ही कमी साहित्यात आणि लवकर होणारी डिश शिकविल्या बद्दल अंजली मॅडमचे आभार...

अमृतफळ (amrutphal recipe in marathi)

#shravanqueen

इटूकले पिटूकले असे हे अमृत फळ म्हणजे खरचं तोंडात टाकताच गुलाबजाम आणि जिलेबिची आठवण करून देतात... अशी ही कमी साहित्यात आणि लवकर होणारी डिश शिकविल्या बद्दल अंजली मॅडमचे आभार...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनिटे
चार जणांसाठी
  1. 10 टेबल स्पूनतांदळाचे पीठ
  2. 1 कपओल्या नारळाचा कीस किंवा पातळ काप
  3. 3/4 कपदही
  4. 1/4 टी स्पूनमीठ
  5. 10 टेबल स्पूनसाखर
  6. 4 ते 5 केशर काड्या
  7. आवडीनुसार खाण्याचा रंग
  8. 1 टेबल स्पूनसुकामेवा
  9. तूप किंवा तेल तळण्यासाठी
  10. १०० मिली पाणी
  11. 1 टी स्पूनलिंबाचा रस

कुकिंग सूचना

२० मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम मिक्सरमध्ये तांदळाचे पिठ, खोबरे किस किंवा खोबर्‍याचे बारीक काप,मीठ, खाण्याचा रंग व दही घालून वाटून घ्यावे.आवश्यकता वाटल्यास थोडे पाणी घालून भजीच्या पिठापेक्षा जरा घट्टसर वाटून घ्यावे.

  2. 2

    एकीकडे गॅस'वर साखरेचा एकतारी पाक तयार करायला ठेवावा. त्याप्रमाणे साखरेमध्ये पाणी घालावे. पाकामध्ये केशर काड्या व खाण्याचा रंग टाकावा. त्यामध्ये थोडा लिंबाचा रस घालावा चव छान लागते...

  3. 3

    दुसरीकडे कढईमध्ये तूप घालून गरम करायला ठेवावे आणि मिश्रणाचे चे छोटे गोळे करून तळून घ्यावेत. हे तळलेले छोटे गोळे पाकामध्ये सोडावे. पाच ते दहा मिनिटे हे पाकामध्ये मुरत ठेवावे. एका नारळाच्या करवंटी मध्ये किंवा एका बाउल मध्ये काढून त्यावर सुकामेवा घालून हे अमृतफळ सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Aparna Nilesh
Aparna Nilesh @cook_Aparna9224
रोजी
Mumbai
cooking makes my tummy happy🍱
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes