पिनवील सॅण्डवीच (pinwheel sandwich recipe in marathi)

Anuja P Jaybhaye
Anuja P Jaybhaye @cook_21664622

आपल्या घरी पाहुणे आले की काही पाहुण्यांबरोबर बच्चेकंपनी सुद्धा येत असते नाही का ? तेव्हा मोठ्या पाहुण्यानं बरोबर छोट्या पाहुण्यांनाही खूष करायचं असतं हो की नाही ?
मी शनिवार ला माझ्या आईकडे गेले होते तिथे माझ्या मुलाला नेहमीप्रमाणे भेटायला त्याचे मित्र आले. लॉकडाऊन मुळे बऱ्याच दिवसांनी ह्या सगळ्यांच्या भेटीगाठी झाल्या. फिर क्या? सेलिब्रेशन तो बनता है बॉस😍😄 बच्चे कंपनी म्हटलं की त्यांना चॉकलेट आणि बिस्कीट हे अतिशय प्रिय असतात. तेव्हा त्यांना आवडेल असा झटपट होणारा बिस्किटांचा चॉकलेट केक मी केला .अगदी पंधरा-वीस मिनिटे लागतात. आणि हो या केक साठी मी स्टीलच पॉट वापरलेले आहे व केकसुद्धा ओव्हन मध्ये न करता कुकर मध्ये केलेला आहे. तिकडे आपला छोट्या पाहुण्यांचा केक बेक होईस्तोवर आपण मोठ्या पाहुण्यांच्या नाश्त्याची पण तयारी करू शकतो बर का! 😝 चला तर मग बघुया झटपट होणारा बिस्किटांचा चॉकलेट केक😍 खालील प्रोसिजर सविस्तर लिहिल्यामुळे मोठी वाटत आहे पण केक करताना अगदी झटपट होतो. केक पण मस्त स्पंजी आणि यम्मी झाला तर नक्की करून बघा. आणि केकच्या सजावटीसाठी तुम्ही तुमच्या आवडीनुसार साहित्य वापरू शकता. माझ्याकडे मुलांना खाण्याची खूप घाई होती त्यामुळे मी केकला जास्त सजवू शकले नाही😁

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

४ व्यक्तींकरीता
  1. १०-१२ ताजे ब्रेड स्लाईस (जंंम्बो ब्रेडचा वापर करावा)
  2. 2उकडलेले बीट
  3. 2उकडलेले गाजर
  4. 1/2 वाटीहिरवी चटणी (आलं, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची, मीठ मिक्स)
  5. 1/2 टेबलस्पूनलिंबाचा रस
  6. 2 टेबलस्पूनअमूल बटर
  7. चीझ स्लाईस
  8. 1 टेबलस्पूनव्हिनेगर
  9. 1/2 टेबलस्पूनकाळी मिरी पावडर
  10. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम गाजर, बीट स्वच्छ धुवून वेगवेगळे उकडून घ्यावेत. उकडल्यानंतर ते मिक्सरच्या भांड्यात वेगवेगळे अजिबात पाणी न घालता वाटून घ्यावे. बीट वाटण्यापूर्वी हलक्या हाताने वरच्यावर पुसून घ्यावे.

  2. 2

    आता पुन्हा मिक्सर च्या भांड्यात आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ आणि किंचीत पाणी घालून त्याची चटणी वाटून घ्यावी. (अगदी पातळ करु नये)

  3. 3

    एका बाऊल मध्ये बटर घेऊन त्यात काळी मिरी पावडर, व्हिनेगर, लिंबाचा रस, मीठ घालून मिक्स करून त्यातील १ टेबलस्पून पेस्ट गाजर मध्ये आणि १ टेबलस्पून पेस्ट बीट मध्ये छान मिक्स करून घ्यावी.

  4. 4

    आता ब्रेड स्लाईस घेऊन चारी बाजूने त्याच्या कडा काढून टाकून हलक्या हाताने त्यावर लाटणे फिरवून घ्यावे. आणि त्यावर प्रथम गाजर पेस्ट, हिरवी चटणी, आणि शेवटी बीट पेस्ट लावून त्यावर आता चीझ स्लाईस ठेवून हळूहळू त्या स्लाईसचा रोल करून टुथपीकच्या साहाय्याने त्याच्या कडा बंद करून घ्याव्यात आणि नंतर तो रोल बटर पेपर मध्ये गुंडाळून १५ मिनीटांसाठी फ्रिजमध्ये ठेवून द्यावा.

  5. 5

    १५ मिनीटांनंतर रोल बाहेर काढून त्यावरील बटरपेपर काढून टाकून सुरीच्या साहाय्याने त्याचे व्हील सारखे पीस करून घ्यावे.

  6. 6

    आपले पिनवील सॅण्डवीच खाण्यासाठी तयार. सॉस अथवा मेयोनीज सोबत सर्व्ह करावे. नुसते खायला देखील खुपच छान लागतात.

  7. 7

    धन्यवाद 🙏

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Anuja P Jaybhaye
Anuja P Jaybhaye @cook_21664622
रोजी

Similar Recipes