कीड्स स्पेशल पनीर बर्गर (Paneer Burger Recipe In Marathi)

Anushri Pai
Anushri Pai @Anu_29184519

लहान मुलांना चीज आणि पनीर या दोन्ही गोष्टींचा आकर्षण आणि आवड असते आणि लहान मुलांच्या वयामध्ये या दोन्ही गोष्टी त्यांना खाणं आवश्यक आहे कारण त्यापासून त्यांना भरपूर प्रोटीन्स आणि ऊर्जा मिळत असते. फक्त त्यांना डोळ्यासमोर ठेवून केलेला हा बर्गर जेव्हा मी अनाथालयातल्या मुलांना खायला दिला त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद विलक्षण होता!!! बघूया आपण साधी सोपी लहान मुलांना आवडलेली रेसिपी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

पंधरा मिनिटे
  1. 4बर्गर ब्रेड
  2. 4चीज स्लाईस
  3. 4पनीर स्लाईस
  4. 4 चमचेहिरवी चटणी
  5. 4 चमचेबटर
  6. 1 चमचाकाळीमिरी पावडर
  7. 4लेट्यूस ची पानं
  8. मीठ गरजेनुसार

कुकिंग सूचना

पंधरा मिनिटे
  1. 1

    प्रथम पनीरच्या स्लाईस दोन्ही बाजूंनी बटर टाकून तांबूस परतून घ्याव्यात. परतताना त्यामध्ये थोडं मीठ वरून शिंपडून टाकावं.

  2. 2

    त्याच पॅनमध्ये नंतर बर्गर ब्रेड मध्ये कट करून दोन्ही बाजूने परतून घ्यावे.

  3. 3

    नंतर बर्गरची खालची साईड ठेवून त्यावर हिरवी चटणी लावून घ्यावी. त्यावर लेटेस्ट चे पान ठेवून वर पनीरची स्लाईस ठेवून त्यावर एक चिमटी काळीमिरी क्रश पसरून त्यावर चीज स्लाईस ठेवायची आणि वरच्या बर्गर साईडला हिरवी चटणी लावून ती चीज च्या स्लाईस वर ठेवायची आणि अशा तऱ्हेने तयार झाला आपला पनीर बर्गर !चविष्ट, सोपा, झटपट आणि लहान मुलांचा आवडता!!

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Anushri Pai
Anushri Pai @Anu_29184519
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes