बाकरवडी (दावध स्पेशल) (bakarvadi recipe in marathi)

Nisha Pawar
Nisha Pawar @cook_23567711

#रेसिपीबुक #week 12
#बाकरवडी नाव काढले की मला गुजरात ट्रीप ची आठवण आलीच पाहिजे आम्ही जेव्हा दावध ला गेलो होतो तेव्हा तिथे नाष्टा साठी खमंग जिलेबी व भाकरवडी असे दिले होते आज ही चव ओठांवर येते तशी बरेच दा करून पाहिली पण तशी थोडी वेगळी आहे पण 70% दावध प्रमाणे च जमली आहे टेस्ट खुपच सुंदर झाली आहे आणि क्रिस्पी देखील

बाकरवडी (दावध स्पेशल) (bakarvadi recipe in marathi)

#रेसिपीबुक #week 12
#बाकरवडी नाव काढले की मला गुजरात ट्रीप ची आठवण आलीच पाहिजे आम्ही जेव्हा दावध ला गेलो होतो तेव्हा तिथे नाष्टा साठी खमंग जिलेबी व भाकरवडी असे दिले होते आज ही चव ओठांवर येते तशी बरेच दा करून पाहिली पण तशी थोडी वेगळी आहे पण 70% दावध प्रमाणे च जमली आहे टेस्ट खुपच सुंदर झाली आहे आणि क्रिस्पी देखील

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मि
2-3 सर्व्हिंग्ज
  1. 100 ग्राममैदा
  2. 100 ग्रामरवा
  3. बाकरवडी साठी
  4. 100 ग्राममुगदाळ
  5. 1 टेबलस्पूनबेसन
  6. 2 टीस्पूनधने
  7. 2 टीस्पूनजिरे
  8. 2 टीस्पूनबडीशेप
  9. 1 छोटातुकडा दालचिनी
  10. 2 टीस्पूनपांढरे तिळ
  11. 1 टीस्पूनगरम मसाला
  12. 1 टीस्पूनहळद पूड
  13. 1/2 चमचालिंबाचा रस
  14. 10 ग्रामगुळ
  15. 100 ग्रामबारीक शेव
  16. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

20 मि
  1. 1

    मैदा रवा मीठ घालून थोडे थोडे पाणी घालून घट्टसर मळून घेतला 1चमचा तेलाचे मोहन पण घातले

  2. 2

    जिरे धने बडीशेप व दालचिनी तुकडा मिक्सर मधून बारीक दळून घेतले व थोडे क्रश पण ठेवले हा मसाला तयार झाला

  3. 3

    मुगदाळ शिजवून घेऊन त्यात भाजून घेतलेले बेसन घालून वरुन हळद गरम मसाला टाकून उकळी आल्यावर त्यात मीठ गुळ व तयार मसाला घालून मिक्स केले व वरुन थोडे क्रश बडीशेप धने घालून लिंबाचा रस घालून एकजीव करावे आशा पद्धती ने सारण भाकुर तयार झाला

  4. 4

    थोडे ओलसर राहू द्यावे हे मिश्रण कारण थंड झाल्यावर ते घट्ट होते आणि त्यामुळे मिश्रण तळताना बाहेर पडत नाही व आतिल मसाला करपत पण नाही

  5. 5

    मैद्याची पारी लाटुन घेतली आयता कृती आकारत व त्यावर भाकुर पसरवून घेतला तिळ आणि शेव स्पेड करून खाली दाखवलेल्या प्रमाणे रोल केला

  6. 6

    रोल करताना हाताला अरारोट पावडर वापरली तयार रोल चे छोटे छोटे काप केले.

  7. 7

    ते काप गरम तेलात सोनेरी होईपर्यंत तळून घ्यावेत मस्त कुरकुरीत होतात व ते 15 दिवस आरामशीर टिकतात हवा बंद डब्यामध्ये.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Nisha Pawar
Nisha Pawar @cook_23567711
रोजी

Similar Recipes