बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)

बाकरवडी रेसिपी मी गुजरात पद्धतीची केली आहे.
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
बाकरवडी रेसिपी मी गुजरात पद्धतीची केली आहे.
कुकिंग सूचना
- 1
गव्हाचे पीठ 25 ग्रॅम, ग्रॅम मैदा 50 ग्रॅम, बेसन शंभर ग्रॅम हे सर्व चाळून त्यात तेल घातले चवीप्रमाणे मीठ घालून त्याचा गोळा बनवला
- 2
डेसिकेटेड कोकोनट आणि सुके खोबरे एक कप घेतले दोन चमचे साखर घातली आणि ते बारीक करून घेतले, तीळ, खसखस, बडीशेप थोडीशी भाजून बारीक करून घेतली, आले लसूण मिरची पेस्ट एक चमचा घातले, 50 ग्रॅम शेंगदाणे बारीक करून घातले लाल तिखट, हळद, मीठ, लिंबूरस एक चमचा घातले आणि हे भाकरवडी चे सारण तयार झाले
- 3
पिठाचा एक गोळा घेतला त्याची चपाती केली नंतर त्यावर साखर मिक्स केलेले पाणी पसरवले आणि त्यावर सारं एकसारखे पसरवून घेतले आणि त्याचा घट्ट रोल तयार केला
- 4
रोल तयार केल्यानंतर त्याच्या वड्या पाडून घेतल्या आणि त्या फ्राय केल्या
- 5
अशा पद्धतीने बाकरवडी तयार झाल्या
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडीबाकरवडी म्हंटलं कि पुण्याची चितळ्यांची बाकरवडी डोळ्यासमोर उभी राहते आणि जिभेवर त्याची चव रेंगाळतेच.बाकरवाडी किंवा भाकरवाडी हा पारंपारिक मराठी मसालेदार पदार्थ आहे, जो महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थानमध्ये लोकप्रिय आहे आणि पुण्याच्या बाजारपेठांमध्ये व्यापकपणे उपलब्ध आहे. नारळ, खसखस, तीळ याचा मसाला वापरून हा तयार केला जातो.मी पण मसाल्यात हे पदार्थ वापरुन पहिल्यांदाच बाकरवडी केली आहे. Prachi Phadke Puranik -
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडीबाकरवडी हा गुजरात, महाराष्ट्रातील लोकप्रिय पदार्थ आहे. अतिशय चविष्ट खुसखुशीत बाकरवडी एकदा खायला सुरुवात केली की थांबणं कठीण होतं. चविष्ट सारण आणि खुसखुशीत बाहेरचं आवरण ह्या दोन गोष्टी बाकरवडीमध्ये अत्यंत महत्त्वाच्या आहेत. ह्यात काही चुकलं तर परफेक्ट बाकरवडी होणार नाही. Sudha Kunkalienkar -
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडीबाकरवडी हा मूळचा गुजरात चा असलेला पदार्थ महाराष्ट्रात ही प्रसिद्ध आहे. विशेषतः पुण्याची चितळे भाकरवाडी खूप प्रसिद्ध आहे. कुरकुरीत आणि खमंग आंबट गोड किंचित तिखट चवीची ही बाकरवडी खूप चविष्ट लागतेच शिवाय बरेच दिवस टिकते. त्यामुळे प्रवासाला जाताना खाऊ म्हणून न्यायला बाकरवडी छान पर्याय आहे. Shital shete -
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडीबाकरवडी हा पदार्थ आमच्या कडे खूपच आवडतो. कधी तरी करीन असं म्हणत शेवटी आज घरी करण्याचा मुहूर्त लागला. पूण्याच्या चितळ्यांची बाकरवडी खुपच छान लागते. तशीच बाकरवडी घरी करण्याचा प्रयत्न मी केला आहे. खूपच छान खमंग आणि खुसखुशीत बाकरवड्या झाल्या, माझ्या घरच्यांना पण खूपच आवडल्या. याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
क्रिस्पी बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12#बाकरवडीनमस्कार मैत्रिणिनो आज मी तुमच्याबरोबर क्रिस्पी बाकरवडी ची रेसिपी शेअर करत आहे.यामध्ये तुम्ही खसखस व बारीक शेव घालू शकता माझ्याकडे ती नसल्यामुळे मी यामध्ये नाही घातलेली पण या पद्धतीने केलेली बाकरवडी खूपच खमंग आणि खुसखुशीत लागते.पुण्यामध्ये तर चितळे बाकरवडी खूपच प्रसिद्ध आहे पण आज पहिल्यांदाच मी बाकरवडी करून बघितली आणि खूपच सुंदर बनली.सर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगाDipali Kathare
-
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12#बाकरवडी बाकरवडीखरे पाहता बाकरवडी चे ओरिजीन हे गुजरात मधील बडोद्याचे आहे.बडोद्यातील जगदीश फरसाण ह्यांच्या दुकानात १९३८ पासूनच बाकरवडी ह्या पदार्थ ची सुरवात झाली व १९७० साली पुण्याचे रघुनाथराव चितळे ह्यांनी बडोद्याला भेट दिली व त्यांना बाकरवडी हा पदार्थ खूप आवडला व त्यानंतर चितळ्यांचची बाकरवडी महाराष्ट्रत आली.आज महाराष्ट्र,गुजरात, राजस्थान ह्या ठिकाणी ही बाकरवडी आवडीने खातात.थोडी आंबटगोड व तिखट चव असणार्या बाकरवडी मानाचे स्थान मिळवले.बाकरवडी चा मसाला हा सर्वत्र सारखाच असतो मात्र बाहेरच्या आवरणासाठी काही ठिकाणी नुसता मैद्याचा वापर करतात तर काही ठिकाणी बेसन,थोडा मैदा व गव्हाचे पीठ घेऊन बाकरवडी चे बाहेरील आवरण तयार करतात.चला तर मग, आज बडोद्यातील जगदीश फरसाण ह्यांच्या रेसीपी प्रमाणे बाकरवडीची रेसिपी पाहुया. Nilan Raje -
गव्हाची बाकरवडी (wheat bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडीबाकरवडी माझी खूप आवडती पण मी नेहमीच गव्हाच्या पिठाची करते. खूप छान खुशखुशीत होतात नक्की करून बघा. Monal Bhoyar -
-
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडीबाकरवडी आवडणार नाही अशी व्यक्ती निराळीच. माझ्या मुलीला बाकरवडी इतकी प्रिय आहे की. चितळ्यांच्या बाकरवडी साठी तिने अनेकदा पुणे गाठले आहे. किंवा पुणे पालथे घातले आहे. Shilpa Limbkar -
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#बाकरवडी#रेसिपीबुक #week12बाकरवडी आणि कचोरी रेसिपी2मी varsha deshpande यांचीं रेसिपी cooksnap केली आहे, खूपच सुंदर झाले आहेत बाकरवडी, पहिलाच प्रयत्न खुप छान जमली. Varsha Pandit -
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week12बाकरवडी, 'स्नॅक्स' किंवा आपल्या 'फराळ' वर्गातील एक स्टार, नव्हे सुपर स्टार पदार्थ. इथे मुंबई आणि विरारमध्ये राहिलेल्या माझ्यासारख्या मुलीला अगदी आता काही वर्षांपूर्वी पर्यंत पुण्याच्या बाकरवडीचे फॅसिनेशन होते. कुणी पुण्याहून येणार असले म्हणजे आठवणीने बाकरवडी घेऊन येण्याचा निरोप जायचा. आता तोच सेम ब्रॅन्ड गल्लोगल्ली उपलब्ध झाल्यावर कुणीतरी खास वेळ काढून, रांगेत उभे राहून, आपल्यासाठी ती बाकरवडी आणली आहे ही भावनाच हरवली. कुकपॅडची बाकरवडीची थीम आली आणि एका नव्या फॅसिनेशनचा जन्म झाला. स्वतः बाकरवडी बनविण्याचा! मग सुरु झाला शोध, अनेक उपलब्ध रेसिपींमधुन पारंपारीक आणि त्याच जुन्या खुसखुशीत बाकरवडीच्या रेसिपीचा शोध. वेगवेगळ्या रेसिपींच्या मदतीने तयार झाली ही रेसिपी. मी ही रेसिपी अक्षरशः साजरी केली. फोटो पाहून तुम्हाला याचा अंदाज येईलच. त्या जुन्या पारंपारिक चविच्या खूप जवळ जाता आले याचा आनंद आहे. तो आनंद तुम्हा सर्वांसोबत शेअर करते आहे... Ashwini Vaibhav Raut -
-
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडीप्रत्येक शहराची एक अस्मिता असते, एक मानबिंदू असतो. खाण्याच्या बाबतीत बोलायचं झालं, तर या मानबिंदूला `खानबिंदू` असं म्हणता येईल. कोल्हापूरची मिसळ किंवा तांबडा-पांढरा रस्सा, मुंबईची भेळ, नागपूरचा वडाभात, खानदेशी भरीत, लोणावळ्याची चिक्की, तशी पुण्याची बाकरवडी. पुण्यात अनेक मिसळीही प्रसिद्ध आहेत, पण त्यांना मानबिंदू वगैरे म्हणणं जरा धाडसाचं ठरेल. पुण्याच्या बाकरवडीला मात्र पर्याय नाही. पुणेकरांकडे राहायला आलेल्या पाहुण्यांना एकदातरी या बाकरवडीची चव चाखायची असते. माझी बाकरवडी बनवण्याची हि पहिलीच वेळ. त्याची रेसिपी आज मी शेअर करतेय. स्मिता जाधव -
-
-
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12रेसिपी-1 #बाकरवडीबाकरवडी सर्वांना आवडणारी.आधी एकदा मी मिनी भाकरवडी बनवली होती. आता दोन्ही प्रकारे केली. Sujata Gengaje -
-
मल्टिग्रेन बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडीजसे वेगवेगळ्या धान्याचे पीठ वापरून चपात्या पोळ्या बनवतो, तसेच वेगवेगळे धान्याचे पीठ करून बाकरवडी बनवण्याचा प्रयत्न केला Swayampak by Tanaya -
-
-
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडीमी बाकरवडी घरी कधीच केली नव्हती पण आज cookpad मुळे करून पहिली. Mansi Patwari -
-
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12#बाकरवडी पुणे महाराष्ट्र स्पेशल पदार्थ रजनी शिगांंवकर (आईच्या रेसिपीज) -
-
-
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडीपहिल्यांदा बनवून पाहली. माझ्या मुलींना तर खूप आवडली आंबट तिखट आणि गोड खायला टेस्टी दुसऱ्यांदा मी नक्की बनवणार कूक पॅड मुळे मी नवीन नवीन रेसिपी शिकत आहे. Jaishri hate -
-
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडी बाकरवडी खायला अप्रतिम लागते . बाकरवडी महाराष्ट्राबरोबर गुजरात मध्ये खूप फेमस आहे. खुसखुशीत आणि खमंग अशी बाकरवडी चहासोबत सहज खाण्यासाठी खूप छान स्नॅक आहे. Najnin Khan -
More Recipes
टिप्पण्या