रोज मोमोज (rose momos recipe in marathi)

हर प्लाटर हीस शटर
हर प्लाटर हीस शटर @cook_25209464
मुंबई

#मोमोज #सप्टेंबर

व्हॅलेंटाईनसाठी योग्य कृती. गुलाबाच्या शेपचे हे मोमोज खूप सुंदर दिसतात, मन मोहित करतात. मोमोज सोया सॉस किंवा मोमो सॉस किंवा आपल्या आवडीनुसार सॉस बरोबर खाऊ शकता.

रोज मोमोज (rose momos recipe in marathi)

#मोमोज #सप्टेंबर

व्हॅलेंटाईनसाठी योग्य कृती. गुलाबाच्या शेपचे हे मोमोज खूप सुंदर दिसतात, मन मोहित करतात. मोमोज सोया सॉस किंवा मोमो सॉस किंवा आपल्या आवडीनुसार सॉस बरोबर खाऊ शकता.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45 मिनिटे
3 सर्व्हिंग्ज
  1. कणिक मळण्यासाठी
  2. 1 कपमैदा
  3. 1/2 टेबलस्पूनसाखर
  4. 2 थेंबगुलाबी रंग
  5. 2 टेबलस्पूनदही
  6. 1/2 टीस्पूनमीठ
  7. आवश्यकतेनुसार पाणी
  8. 1 टीस्पूनतेल
  9. सारणासाठी:
  10. 1 टेबलस्पूनतेल
  11. 1/2 कपकोबी बारीक कापून घ्या
  12. 1/4 कपकॅप्सिकम बारीक कापून घ्या
  13. 1/4 कपगाजर किसलेले
  14. 1 टीस्पूनमिरपूड पावडर
  15. 1 टीस्पूनमीठ

कुकिंग सूचना

45 मिनिटे
  1. 1

    1 कप मैद्याचे पिठ घ्या, त्यात साखर, मीठ, दही घालून मिक्स करा. त्यात आवश्कतेप्रमाणे पाणी घालून मळून घ्यावे. 1 टेबलस्पून तेल घालून पुन्हा चांगले मळून घ्यावे.आता पिंक कलरचे दोन थेंब टाका आणि पिठाला चांगला गुलाबी रंग येई पर्यंत मळून घ्यावे.पीठ मळताना थोड घट्ट ठेवा.मळलेले पिठ15 मिनीटे विश्रांतीसाठी ठेवा.

  2. 2

    सारणासाठी
    एका पॅनमध्ये, 1 टीबीएसपी तेल घाला, त्यात आता कॅपसिकम्स घाला आणि एक मिनिट सौंटे करा. त्यानंतर कोबी आणि गाजर घाला आणि पुन्हा एक मिनीट सौंटे करा.

  3. 3

    आता मीठ आणि मिरपूड घाला आणि 2-3 मिनिटे सौंटे करा.एकदा भाज्या शिजल्यावर ज्योत बंद करा आणि भाज्यांचे मिश्रण थंड होऊ द्या.
    तयार मिश्रण बाजूला ठेवा.

  4. 4

    मोमोज बनविण्यासाठी.आता पिठाचे गोळे करून घ्यावे.चपातीच्या साइज इतके लाटून घ्या, पण पातळ लाटाकुकी कटर किंवा वाटीच्या सहायाने छोटे पुरी इतके गोलाकार कापून घ्या. जास्तीचे पिठ साइडला ठेवा.

  5. 5

    आता फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे, तीन पुऱ्या एका रांगेत ठेवा.एक साइडला पाणी लावा, आणि मिश्रण फोटो दाखवल्या प्रमाणे भरून घ्यावे.

  6. 6

    आणि पुऱ्या बंद करून घ्या. आता डाव्या बजुपासून उजव्या बाजूला फोल्ड करा. आणि शेवटच्या टोकाला पाणी लावून चांगले चिकटवून घ्या.

  7. 7

    अश्याप्रकारे रोज आकाराचा मोमोज तयार होईल. आता बाकीचे मोमोज तयार करून घ्या.एका चाळणीवर तेल लावून, त्यात मोमोज ठेवा. आणि 10-15 मिनिटे वाफवून घ्या.

  8. 8

    मोमोज गरम गरम सर्व्ह करााावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
हर प्लाटर हीस शटर
रोजी
मुंबई
नमस्कार, मी दीपिका. माझा जन्म महाराष्ट्रीयन कुटुंबात झाला असून, लग्न मात्र गुज्जू जैन मुलाशी केले. मी एचआर कर्मचारी म्हणून काम करत होते. मी आणि माझे पती खूपच खवय्ये आहोत. डिलिव्हरी नंतर मला जॉब सोडावा लागला. मी नेहमी वेगवेगळ्या रेस्टॉरंट्समध्ये किंवा मुंबईच्या रस्त्यावर खूप सारे पदार्थ खाल्ले, परंतु स्वतःहून ते तयार करण्याचा प्रयत्न कधीही केला नाही. अलीकडे लॉकडाउनमुळे, जेव्हा सर्व काही बंद होते. आम्ही आमचे क्रेविंगस पूर्ण करू शकलो नाही, तेव्हा मी घरी अनेक रेसिपी करण्यास सुरुवात केली. आणि माझ्या नवऱ्याने मी जे जे बनवते त्याचे छायाचित्र टिपण्यास सुरवात केली .. म्हणून अशाप्रकारे आम्ही आमचा instapage सुद्दा तयार केले आहे ..
पुढे वाचा

Similar Recipes