चिकन स्टिम रोज मोमोज (chicken rose momos recipe in marathi)

Purva Prasad Thosar
Purva Prasad Thosar @Purvithosar_999
Jogeshwari East , Mumbai.

#मोमोज #सप्टेंबर

चिकन स्टिम रोज मोमोज (chicken rose momos recipe in marathi)

#मोमोज #सप्टेंबर

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. सारण बनवण्यासाठी साहित्य
  2. 250 ग्रॅम चिकन खिमा
  3. 1 टेबलस्पूनजीरा पावडर
  4. 1 टेबलस्पूनधने पावडर
  5. 2 टेबलस्पूनलाल तिखट किंवा आवडीनुसार
  6. 1 टेबलस्पूनचिकन मसाला
  7. 1/2 टीस्पूनहळद
  8. 2 टेबलस्पूनआलं लसून पेस्ट
  9. आवडीनुसार कोथंबीर
  10. आवडीनुसार कांद्याची पात
  11. चवीनुसारमीठ
  12. पीठ तयार करण्यासाठी साहित्य
  13. 1 कपमैदा
  14. 2 टेबलस्पूनतेल
  15. 1/2विनेगर
  16. चवीनुसार मीठ
  17. कोबीची पाने स्टीमर मध्ये ठेवण्यासाठी

कुकिंग सूचना

45 मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम आपण पीठ मळून घेऊया.त्यासाठी एका भांड्यामध्ये मैद्याचा पिठ घेऊन त्यामध्ये मीठ व व्हिनेगर टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या त्यानंतर त्यामध्ये तेल टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या त्यानंतर थोडे थोडे पाणी टाकून घट्टसर पीठ मळा. पीठ घट्ट मळलं गेलं पाहिजे. आता हे पीठ पंधरा ते वीस मिनिट साईटला ठेवून द्या तोपर्यंत आपण आपलं सारं तयार करू.

  2. 2

    सारण तयार करण्यासाठी सर्वप्रथम आपण एका छोट्या कढईमध्ये किंवा पॅनमध्ये थोडे तेल घेऊन त्यामध्ये सर्वप्रथम आले लसून पेस्ट टाकावी व दोन मिनिटात ते चांगले परतून घ्यावे त्याचा कट्टप्पणा निघून गेला की त्यामध्ये आपले सर्व सुखे मसाले व मीठ टाकावे व परतून घ्यावे आता मसाले आपण चिकन खिम्यामध्ये टाकणार आहोत.

  3. 3

    चिकन खिमा स्वच्छ धुऊन घ्यावा. त्यानंतर त्यामध्ये हे मसाल्याचे मिश्रण टाकून घ्यावे. त्यानंतर त्यामध्ये कोथंबीर कांद्याची पात टाकावी. सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यावे आता आपलं सारण तयार आहे

  4. 4

    आपण सर्वात प्रथम पोळी लाटून घेऊ आता आपल्याला तीन प्रकारचे वाट्या किंवा डब्याची झाकणं हवी आहेत. जी एकमेकांमध्ये बसतील अशी (9 इंच × दुसरं हे 8.3 इंच × 7.3 इंच) अशी घ्यावीत. असे कटर घेतल्याने गुलाबाच्या पाकळ्या फार सुंदर येतात. पण त्या पोळी वरती या तिने कटरने कट करून घेऊ. त्यानंतर त्या प्रत्येक छोट्या पुरीसारख्या पोळीला दोन्ही साईडने सुकं पीठ लावून घेऊन.

  5. 5

    आता आपल्याला त्या पुऱ्या एका रांगेत लावायचे आहेत मोठ्या पुरी मध्यभाग पकडून दोन नंबरची पुढे ठेवायची आहे त्यानंतर दोन नंबरच्या पुरीच्या तीन नंबरची पुरी ठेवायची आहे. एका लाईनीत या पुऱ्या आल्या पाहिजेत. आता त्यावर आपल्याला आहेस सारंण ठेवायचं आहे. त्यानंतर या पुऱ्या बंद करून घ्यायचे आहेत.

  6. 6

    आता आपण त्यांना फोल्ड करायचा आहे ते कशाप्रकारे करायचं तर लाईनीत फोल्ड करत जायचं आहे शेवटच्या टोकाला थोडासा पाणी लावून ते चिटकवून टाकायचं जेणेकरून ते ओपन होणार नाही.

  7. 7

    आता आपला रोज तयार झाला आहे पण आपल्याला अजून त्याच्या पाकळ्या ओपन करायचे आहेत हाताने एकेक पाकळी ओपन अशाप्रकारे आपलं रोज तयार होईल अशाप्रकारे सगळे रोज तयार करून घ्यावे

  8. 8

    एका टोपामध्ये पाणी गरम करायला ठेवावे त्यामध्ये चाळण ठेवावी चाळणी मध्ये आपल्याला कोबीची पानं ठेवायचे आहेत त्यावरती हे मोमोज ठेवायचे. त्यानंतर झाकण ठेवून ते 20 ते 25 मिनिटे स्टीम करून घ्यायचे.

  9. 9

    अशाप्रकारे तयार होतील आपले स्टीम मोमोज मी त्यांना थोडंसं ॲट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी वरून फूड कलर लावला आहे त्यासाठी थोडासा कलर पाण्यामध्ये भिजवून गुलाबांच्या वरच्या कडांना थोडसं ब्रशने रेड कलर लावून घ्यावा. त्यामुळे आपले मोमोज फार सुंदर दिसतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Purva Prasad Thosar
Purva Prasad Thosar @Purvithosar_999
रोजी
Jogeshwari East , Mumbai.

Similar Recipes