व्हेज मोमोज (veg momos recipe in marathi)

Amrapali Yerekar
Amrapali Yerekar @cook_22715046
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

45 मिनिट
4 सर्व्हिंग्ज
  1. कव्हरसाठी साहित्य:
  2. 1.5 कप मैदा
  3. 1/2 टिस्पून मिठ
  4. 2 टिस्पून तेल
  5. सारण:
  6. 1 टेस्पूनतेल
  7. 1/2 कपकोबी
  8. 1/2 कपगाजर
  9. 1भोपळी मिरची
  10. 7-8लसूण पाकळ्या
  11. 1/2 इंचआल्याचा तुकडा
  12. 3हिरवी मिरची - एकदम बारीक चिरून घ्यावे
  13. 1/4 टिस्पून मिरपूड
  14. 1 टिस्पून सोया सॉस
  15. चवीपुरते मिठ

कुकिंग सूचना

45 मिनिट
  1. 1

    कव्हर बनवून घ्यावे. त्यासाठी मैदा, मिठ, तेल एकत्र करून पाणी घालून पीठ मळून घ्यावे. झाकण ठेवून १५-२० मिनिटे ठेवावे.

  2. 2

    सारण बनवण्यासाठी कढईत तेल गरम करावे. त्यात लसूण आले आणि मिरची परतून घ्यावी. सर्व भाज्या एकत्र घालाव्यात.

  3. 3

    मोठ्या आचेवर १-२ मिनिटे परताव्यात. त्यात मिठ, मिरपूड आणि सोया सॉस घालावा. तयार सारण एका वाडग्यात काढून घ्यावे.

  4. 4

    भिजवलेल्या मैद्याचे १ इंचाचे छोटे गोळे करावे. त्याची पातळ पोळी लाटून घ्यावी. मध्यभागी १-२ चमचे सारण ठेवावे. एक कड हातात घेउन मध्यभागी आणावी. छोट्या-छोट्या चुण्या करून पहिल्या चुणीच्या मागे चिकटवाव्यात. अशाप्रकारे गोल पूर्ण करावा.

  5. 5

    तसेच करंजीच्या आकारातही मोमोज बनवता येतात. तयार झालेले मोमोज पिळून घेतलेल्या ओल्या कपड्याखाली ठेवावेत. सर्व मोमोज बनवून घ्यावेत.

  6. 6

    इडली पात्रात पाणी उकळवत ठेवावे. इडली स्टॅंडला तेलाचा हात लावावा. त्यावर मोमोज ठेवून १०-१२ मिनिटे वाफवून घ्यावे. ५ मिनिटांनी इडली पात्र उघडून मोमोज काढावेत.

  7. 7

    गरमागरम मोमोज चिली सॉस किंवा शेजवान सॉस बरोबर सर्व्ह करावेत.

प्रतिक्रिया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

टिप्पण्या

यांनी लिहिलेले

Amrapali Yerekar
Amrapali Yerekar @cook_22715046
रोजी

Similar Recipes