टेकोज मेक्सीकाना (mexican tacos recipe in marathi)

Girija Ashith MP
Girija Ashith MP @cook_22351709

टेकोज मेक्सीकाना (mexican tacos recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटे
2-3 सर्विंग
  1. 500 ग्रॅमचिकन बोनलेस
  2. 2 चमचेकाळीमिरी पावडर
  3. 4तयार मलबार पराठा
  4. 2 चमचेआलं लसूण मिरची कोथिंबीर पेस्ट
  5. 1 चमचाहळद
  6. 1 कपमयोनेस
  7. 1 चमचाकश्मीरी चिल्ली पोवडर
  8. 3 चमचेटोमॅटो केचप
  9. 7 -8 चमचे बटर
  10. 1 कपबारीक चिरलेली कोथिंबीर
  11. 2 चमचेमीठ

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    प्रथम तयार केरला मलबार पराठा तव्यावर गरम करून घ्यावे.

  2. 2

    बोनलेस चिकन ला लिंबू, काळीमिरी पावडर आले-लसूण पेस्ट, मीठ व तेलाने 15 ते 20 मिनिटे मॅरिनेट करून घ्यावे. तोपर्यंत लाल बेडगी मिरची व आलं लसून याची पेस्ट करुन घ्यावे. तव्यावर थोडेसे बटर टाकून त्यामध्ये बनवलेले आले लसूण पेस्ट घालुन नीट दोन मिनिटे परतून घ्यावे.

  3. 3

    तोपर्यंत त्याच्या मधली फिलींग म्हणजेच सालासा. आजचा बनवण्यासाठी कांदा टोमॅटो कोथिंबीर काळीमिरी पावडर व मायोनेस झालं नीट फिरवून घ्यावे व बाजूला ठेवावे.

  4. 4

    कांद्याच्या फिलिंग साठी तव्यावर थोडेसे बटर घालून त्यावर कांदा परतून घ्यावे. बाजूला एका प्लेटमध्ये काढून घ्यावे.

  5. 5

    त्याच्याकडे पुन्हा थोडेसे बटर घालून त्यामध्ये बनवलेली आलं लसून पेस्ट, बोनलेस मिन्सिड चिकन घालून पाच ते दहा मिनिटे वाफ येऊ द्यावी, त्यानंतर थोडेसे पाणी घालून पाणी पूर्णपणे निघून जाईल इतके वाफवून घ्यावे, वर्तन थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.

  6. 6

    आता या ताकोज प्लेटिंग साठी पराठ्याला टोमॅटो सोस लावून घ्यावे, त्यावर थोडेसे परतून घ्यावे कांदा घालून स्प्रेड करावे, त्यावरती शिजवलेले चिकन घालावे, त्यावरती चीज स्लाईस ठेवावी. आणि दुसऱ्या बाजूने पराठा बंद करावे. त्याने चीज वितळून जाईल.

  7. 7

    दोन्ही बाजूने कुरकुरीत भाजून घेतल्यावर त्याच्या मध्यभागी ने सरळ ठेवून दोन ते तीन मिनिटे गरम करून घ्यावे. त्यांने टकोज ला मस्त आकार येतो. आपले हे गरमागरम टाकोज मेक्सीकाना खायला रेडी आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Girija Ashith MP
Girija Ashith MP @cook_22351709
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes