नूडल्स कटलेट (noodles cutlet recipe in marathi)

Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
नागपुर

#कटलेट #सप्टेंबर
कटलेट म्हणजे नेमके काय... करायला एकदम सोपा प्रकार.. भज्या किंवा आपल्याला आवडतील ते अन्नपदार्थ एकत्र करुन त्याचे गोळे बनवून चपटे आकार किंवा गोल लम्बोळ्के आकार देऊन ब्रेड चा चुरा,रवा, किंवा कच्या शेवया मधे घोळवून तळून किंवा आजकाल शेलो फ्राय करून केलेला पदार्थ म्हणजेच कटलेट... तर आज मी एक वेगळीच रसायन केलेय तर पाहुया काय आहे ते..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25 ते 30 मिनिटे
12 नग
  1. 1/2वडी नूडल्स
  2. 2उकडलेले बटाटे
  3. 1सिमला मिरची बारिक चीरलेली
  4. 1गाजर बारिक चिरलेला
  5. 1कांदा बारिक चिरलेला
  6. 2 टीस्पूनआल लसुण पेस्ट
  7. 1 टीस्पूनतिखट
  8. 2 टीस्पूनधणे जीरे पुड
  9. 1/2 टीस्पूनहळद
  10. 2 टेबलस्पूनब्रेड क्रंप्स
  11. 1 टीस्पूनकॉर्नफ्लोर
  12. 1 टेबलस्पूनमेथी स्प्राउट्स (ऑप्शनल)
  13. गरजेनुसार तेल

कुकिंग सूचना

25 ते 30 मिनिटे
  1. 1

    साहित्य च्या फोटो मधे मी नूडल्स ची एक वडी दाखवली आहे पण मला अर्धीच हवी आहे. तर मी अर्धी वडी तोडून जसे नेहमी नूडल्स बोइल करतो तसे करुन घ्या (मेथी स्प्राउट्स मी ह्यातच टाकले)व निथळत ठेवा. आत्ता एका बाउल मधे बटाटा स्मश करुन घ्या व त्यात बाकी साहित्य घाला जसे सिमला मिरची, गाजर, कांदा, आल लसुण पेस्ट, तिखट हळद मीठ, धणे जीरे पुड व शिजवलेले नूडल्स.

  2. 2

    आत्ता हे सगळे हातानी एकजीव करा (नूडल्स मधे ग्लूटेन असल्याने त्याला स्वथ: चा चिकटवा आहे त्यामूळे बटाटा वगळला तरी चालेल) व त्याचे गोळे करुन गोल चपटे आकार द्या व ब्रेड व कॉर्नफ्लोर मिक्स करा व त्यात ते घोळवून घ्या.असे सगळे तैय्यार करुन घ्या.

  3. 3

    गैस वर पॅन ठेऊन त्यात एक टेबलस्पून तेल घाला व गरम झाले की कटलेट ठेऊन दोन्ही कडून सोनेरी किंवा किंचीत ब्राउन रंग येई पर्यंत शेलो फ्राय करून घ्या. व पूदिना चटनी बरोबर सर्व्ह करावे गरमागरम नूडल्स कटलेट.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
रोजी
नागपुर

टिप्पण्या

Similar Recipes