दही के अंगारे (dahi angare recipe in marathi)

Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
नागपुर

#GA4
week1
Post 1..Golden Apron ह्या puzzle मधून मी yogurt हे की वर्ड निवडले.....
नाव वाचून चकीत झालात ना? कारण दोन विपरीत गुणवैशिष्टे एकत्रपणे कसे ?दही तर थंड आणि नाव आहे दही के अंगारे हे कसे असा आपल्याला प्रश्न पडला असेल तर मी म्हणेन "नावात काय आहे, जे आहे ते चवीतच आहे ".
दुधा पासून बनलेले दही हे शरीरासाठी अत्यंत शामक असते,आणि त्या थंड गुणधर्म असलेल्या दह्यामध्ये थोडा हाॅट मसाला तडका मारला तर त्याला काही वेगळीच चव येईल!नाही हं आजचा पदार्थ त्याच्या नावाप्रमाणे दोन शब्दांईतका साधा व सोपा पण नाही आहे.
दही के अंगारे वरून जरी साधा वाटत असला तरी चवीला अप्रतीम आहे,वरून कुरकुरीत व आतून लोण्यासारखा मऊ,दिसायला जरी गरम असला तरी शरीरासाठी शामक आहे.आता या दही के अंगारे चे ईतके कौतूक ऐकून तर तुमची उत्सुकता नक्कीच वाढली असणार ती उत्सुकता मी अधिक ताणणार नाही आहे, चला शिकुया ही नवीन रेसिपी दही के अंगारे.
.......

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिट
5 नग
  1. 200 ग्रॅमगोड दही
  2. 2उकडलेले बटाटे
  3. 4 टेबलस्पूनब्रेड क्रंप्स
  4. 2 टेबलस्पूनकॉर्नफ्लोर
  5. 2 टेबलस्पूनबारिक चिरलेला कांदा
  6. 1/2 टीस्पूनचाट मसाला
  7. 1 टीस्पूनमीठ
  8. 1बारीक चिरलेली हिरवी मिरची
  9. 1/2 टीस्पूनकोथंबीर
  10. 1/4 टीस्पूनजीरे पुड
  11. 1 टीस्पूनपिठी साखर
  12. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    पारि साठी प्रथम उकडलेले बटाटे स्मश करुन घ्या व त्या मधे तीन टेबलस्पून ब्रेड क्रंप्स,एक टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर, व चवीनुसार मीठ घालुन छान गोळा बनवून घ्या.

  2. 2

    इथे जितके दही सांगितले तितके दही घेऊन कपड्यात बांधून घ्या व किमान अर्धा तास पाणी निथळत ठेवा म्हणजे असा हा चक्का तय्यार होईल. आत्ता तो चक्का एका बाउल मधे घेउन त्या मधे कांदा,चैट्स मसाला, मिर्ची, कोथिम्बीर(मी पुदिना वापरला),जीरे पूड,पिठी साखर,मिठ घालुन एकत्र करा जास्त नका फेटू नाहितर मिश्रणाला पाणी सुटेल.

  3. 3

    बटाट्याच्या मिश्रणातून एका छोटा गोळा घेउन त्याला वाटी सारखा आकार द्या व त्या मधे एक चमचा चक्का चे मिश्रण घाला व पारि बन्द करुन गोल करुन ब्रेड क्रंप्स व कॉर्नफ्लोर च्या कोरड्या मिश्रणात घोळवून एका प्लेट मधे ठेवा असे सगळेच करुन घ्या.

  4. 4

    गैस वर कढईत तेल गरम करा व मोठ्या आचेवरच एक एक करुन सगळे गोळे तळून घ्या व आपल्या आवडत्या डिप सोबत सर्व्ह करा गरमा गरम दही के अंगारे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
रोजी
नागपुर

Similar Recipes