व्हेज कटलेट (veg cutlet recipe in marathi)

Deepali Surve
Deepali Surve @cook_25901385

# कटलेट #सप्टेंबर- कटलेट हा असा पदार्थ आहे की तो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खूप आवडतो. हा खूप छान खुसखुशीत होतो आणि चविष्ट पण लागतो

व्हेज कटलेट (veg cutlet recipe in marathi)

# कटलेट #सप्टेंबर- कटलेट हा असा पदार्थ आहे की तो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खूप आवडतो. हा खूप छान खुसखुशीत होतो आणि चविष्ट पण लागतो

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45 मिनिटे
4 व्यक्तींसाठी
  1. 1/2 कपमैदा
  2. 1 कपपाणी
  3. 3 ब्रेड
  4. 3बटाटा
  5. 1/4 वाटीकोबी
  6. 1/4 वाटीटोमॅटो
  7. 1/4 वाटीकॉर्न
  8. 1/4 वाटीसिमला मिरची
  9. 1/4 वाटीवाटाणा
  10. 1/4 वाटीफ्लॉवर
  11. चवीप्रमाणे मीठ
  12. 1/2 चमचाहळद
  13. 1/2 चमचाधने जिरे पावडर
  14. 1 चमचा लाल तिखट
  15. 1 चमचातेल
  16. 1/4 वाटीबीट

कुकिंग सूचना

45 मिनिटे
  1. 1

    प्रथम पॅनमध्ये एक चमचा तेल घातले नंतर त्यात वाटाणा, फ्लावर, टोमॅटो, सिमला मिरची, बीट, कॉर्न मी सर्व भाज्या चिरुन घातल्या आणि चांगल्या परतून झाल्यावर त्यामध्ये धने-जिरे पावडर, हळद चवीप्रमाणे मीठ, लाल तिखट घालून हे सर्व शिजवून घेतले नंतर त्यामध्ये तीन बटाटे मिक्स केले आणि भाजी तयार केली

  2. 2

    तयार केलेल्या भाजीचे छोटे छोटे गोळे बनवून घेतले आणि त्याचे कटलेट बनवले.

  3. 3

    अर्धा वाटी मैदा मध्ये एक कप पाणी घालून बॅटर तयार करणे. 3 ब्रेड स्लाईस चे ब्रेडक्रम्स बनवून घेतले

  4. 4

    तयार झालेल्या मैद्याच्या बॅटर मध्ये कटलेट बुडवून नंतर ते ब्रेडक्रम्स मध्ये घोळवून मध्यम आचेवर कटलेट तळून घेतले

  5. 5

    याप्रमाणे व्हेज कटलेट तयार केले हे खूप खुसखुशीत होतात आणि छान आहे लागतात

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Deepali Surve
Deepali Surve @cook_25901385
रोजी

Similar Recipes