डाळिंबाची बर्फी (dalimba barfi recipe in marathi)

Ashwini Vaibhav Raut
Ashwini Vaibhav Raut @ashwinivraut_81284
virar

#रेसिपीबुक
#week14

आपली संपूर्ण खाद्यसंस्कृती ही पदार्थांची पौष्टिकता आणि त्याच्या उत्तम चवीच्या सुवर्णमध्यावर आधारित आहे. या सुवर्णमध्यावरचा तोल जराही ढळू न देता पदार्थांची चव आणि पौष्टिक गुणवत्ता दोन्ही वाढवायच्या म्हणजे तारेवरची कसरत. या साठी दोन आरोग्यवर्धक पदार्थांच्या संयोगातून नवा पदार्थ बनवायचे ठरविले.

यातील पहिला पदार्थाचा मान दिला दुधाला. गायीला माता आणि दुधाला अमृत मानणारी आपली संस्कृती. दुध आणि दुग्धजन्य पदार्थ यांचे फायदे सर्वश्रुत आहेतच. या दुधाची बर्फी बनविताना त्यात दुसरा आरोग्यवर्धक पदार्थ निवडला तो म्हणजे डाळिंब. आरोग्यदायी आणि औषधी गुणधर्म युक्त डाळिंबाचे कौतुक ते काय करावे. चवीला चुरचुरीत गोड. दिसायला सुंदर. डाळिंबाचे लालचुटुक रसाळ दाणे, रस, फुल अगदी फळाचे सालही विविध आजारावर औषध म्हणून वापरले जाते. अशा डाळिंबाच्या ताज्या रसाचा वापर करून ही 'डाळिंबाची बर्फी' साकारली. खाणाऱ्यांनी मनसोक्त दाद दिली आणि सुवर्ण मध्यावरची ही तारेवरची कसरत फळास आली याची पावती मिळाली...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२०-३० मिनिटे
5-6 सर्विंग
  1. 1/2 कपदूध
  2. 1/2 आणि 1/4 कपमिल्क पावडर
  3. 1/2 कपपिठीसाखर
  4. 1/4 कपताजा डाळिंबाचा रस
  5. 3 टेबलस्पूनआवडीनुसार काजू,बदाम,पिस्ता तुकडे
  6. 1/4 कपतूप

कुकिंग सूचना

२०-३० मिनिटे
  1. 1

    प्रथम साहित्य चित्रात दाखविल्याप्रमाणे घ्यावे. डाळिंबाचे दाणे एका गाळणीमध्ये घेऊन ते क्रश करून त्याचा रस काढावा. आता मिल्कपावडर मध्ये थोडे दुध घालून त्याची पेस्ट बनवून घ्यावी. गुठळ्या होऊ देऊ नयेत.

  2. 2

    एका pan मध्ये तूप घेऊन त्यात १/२ कप मधील शिल्लक राहिलेले दुध घालावे. मिश्रण एकजीव झाल्यावर त्यात तयार मिल्कपावडर ची पेस्ट घालावी. व्यवस्थित मिक्स करून घ्यावी. आता त्यात साखर घालून नीट एकत्रित करावी. मिश्रण घाटत राहावे. १० मिनिटांनी मिश्रण थोडे घट्टसर होईल.

  3. 3

    आता त्यात १/४ कप डाळिंबाचा ताजा काढलेला रस घालावा. मिश्रण घट्ट होईपर्यंत सतत घाटत राहावे. एका डिशला बटर पेपर लावून तुपाने ग्रीस करून घ्यावे. तयार मिश्रण त्यावर पसरवावे. वरून कापलेले काजू,बदाम, पिस्त्याचे तुकडे लावावेत. सेट झाल्यानंतर त्याचे काप करून सर्व करावी - डाळिंबाची बर्फी !!!

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Ashwini Vaibhav Raut
Ashwini Vaibhav Raut @ashwinivraut_81284
रोजी
virar

Similar Recipes