सुका  मेवा  बर्फी (suka meva barfi recipe in marathi)

Rohini Kelapure
Rohini Kelapure @cook_25511830
पुणे

#अन्नपूर्णा #दिवाळी फराळ_४ मध्ये पहा #बेसन #केशर #सुका मेवा #बर्फी. फराळ म्हटलं की गोडाचा पदार्थ म्हणजे बेसन लाडू, अगदी सर्वांचा आवडता. पण या वर्षी मी थोडासा वेगळ्या फॉर्म मध्ये म्हणजेच बर्फी या स्वरूपात करायचं ठरवलं.
चला तर पाहूया बेसन बर्फीची पाककृती.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१ तास
10-12 सर्व्हिंग्ज
  1. 4 वाट्याबेसन
  2. 3 वाट्यासाखर
  3. १½ वाटी साजूक तूप
  4. 10काजू
  5. 10बदाम
  6. 10पिस्ते
  7. 1/2 चमचावेलचीपूड
  8. २०-२५ केशराच्या काड्या

कुकिंग सूचना

१ तास
  1. 1

    साजूक तुपात बेसन परतावे. आधी घट्ट होईल मग तूप सुटेल. नंतर बेसनाचा खमंग वास येईल तसंच छान सोनेरी रंग येईल. आत त्यात दुधाचा हबका द्यावा म्हणजे बेसन छान फुलून येईल. बेसनाचा रंगही सुंदर सोनेरी होईल.

  2. 2

    दुसऱ्या पातेल्यात साखर घालावी. मग साखर बुडेल एवढे पाणी घालून सतत ढवळत राहावे. दोन तारी पाक झाला की गॅस बंद करून त्यात वेलचीपूड घालावी. मग बेसन घालून चांगले वरखाली करून नीट एकत्र करावे.

  3. 3

    एका ट्रेला तुपाचा हात लावून त्यावर बर्फाचे मिश्रण ओतावे. वरून केशर, काजू - बदाम - पिस्त्याचे काप सजवून लावावे. ५-६ तास कोमट होऊ द्यावे. मग सुरीने बर्फाचे तुकडे पाडून अगदी गार होऊ द्यावे. नक्की करून पहा #बेसन #सुका मेवा #केशर #बर्फी. अगदी तोंडात विरघळते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Rohini Kelapure
Rohini Kelapure @cook_25511830
रोजी
पुणे

टिप्पण्या

Similar Recipes